Maharashtra Breaking News LIVE: नांदेडमध्ये लक्ष्मण हाके यांची गाडी फोडली, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी

तेजश्री गायकवाड Thu, 07 Nov 2024-9:19 pm,

निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Maharashtra Breaking News Today LIVE Updates:  निवडणूक आणि राज्यातील सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी...

Latest Updates

  • नांदेडमध्ये लक्ष्मण हाके यांची गाडी फोडली

    नांदेडमध्ये लक्ष्मण हाके यांची गाडी फोडली
    गाडी अडवून मराठा आंदोलकांची घोषणाबाजी 
    कंधार तालुक्यातील बचोटी येथील घटना 
    ओबीसी कार्यकर्त्यांचीही घोषणाबाजी 
    ओबीसीचे उमेदवार चंद्रसेन पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते लक्ष्मण हाके

     

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे हटवणार : राज ठाकरे

    आम्ही सत्तेत नसताना लोकांचे प्रश्न सोडवले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांचे सरकार होते. त्यावेळी जर सरकारने साथ दिली असती तर एकाही मशिदीवर भोंगा दिसला नसता. माझ्या हातात सत्ता दिली तर मशिदीवरील भोंगे हटवणार असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मुंबईकर फक्त समस्या सहन करतोय : राज ठाकरे 

    संपूर्ण मुंबई शहराचा विचका झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर फक्त समस्या सहन करतोय. मनसेमुळे राज्यातील 65 टोलनाके बंद झाले. यावर मनसेला कुणीही श्रेय दिलं नाही. अनेक विषय सत्तेत नसताना देखील आम्ही पूर्ण केलेत, असं राज ठाकरे यांनी म्हणाले. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी

    बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची काँग्रेसमधून 6 वर्षासाठी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: मनोज जरांगे पाटलांचा राज ठाकरेंना इशारा 

    तुम्ही माझ्या लफड्यात पडू नका आणि माझ्या नादी लागू नका असं म्हणत मनोज जरांगे यांनी राज ठाकरेंना इशारा दिलाय. उपोषणावेळी आरक्षण मिळू शकत नाही असं जरांगे यांची भेट घेऊन राज ठाकरेंनी सांगितलं होतं असं जाहीर भाषणात राज ठाकरेंनी उल्लेख केला होता. त्यावर जरांगे यांनी राज ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतलाय. आमचा वर्ग तुम्हाला माणणारा आहे. मात्र तुम्ही आरक्षणावर काही बोलू नये. समाजाचं अस्थित्व आणि आरक्षण कसं मिळवायचं ते मी पाहतो.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार 

    राणेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. उद्धव ठाकरे 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी 3 वाजता कणकवली, संध्याकाळी 5 वाजता कुडाळ तर संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या सिंधुदुर्गात जाहीर सभा होतील. आता राणेंच्या बालेकल्ल्यात उद्धव काय बोलणार याकडे  सर्वांचं लक्ष लागलंय. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतलाय. संविधान सिर्फ बहाना है लाल पुस्तक को बढ़ाना है अस व्टिवट महाराष्ट्र भाजपनं केलंय. काँग्रेसला भारताचे संविधान कोरं करायचे आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले सर्व कायदे, अनुच्छेद वगळायचे आहेत. म्हणूनच राहुल गांधींनी मध्यंतरी आरक्षण रद्द करणार ही भविष्यवाणी केली होती, असं ट्विट भाजपनं केलंय. 

  • अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट

    प्रकाश आंबेडकर यांच्या तब्येतीची केली विचारपूस

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    काही दिवसापूर्वी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली होती

    आज आंबेडकरांच्या निवासस्थानी जाऊन अजित पवारांनी घेतली भेट 

    विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवारांनी भेट घेतल्याने चर्चांना उधाण

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: EVM हॅक करुन जिंकून देण्याचं आमिष देणारा गजाआड

    EVM हॅक करुन वसंत गीतेंना जिंकून देणाऱ्या आरोपीला नाशिकमध्ये अटक करण्यात आलीये. भगवानसिंग चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीते यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला चव्हाण यानं EVM हॅक करुन गीतेंना जिंकून देण्याचं आमिष दाखवलं होतं. त्याबदल्यात 42 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये तात्काळ द्या उरलेले नंतर द्या असं सांगितले होते. प्रोग्रामिंगवाले ओळखीचे आहेत. त्यामुळे पैसे न दिल्यास गीतेंना पराभूत करण्याचीही धमकी या आरोपीनं दिली.

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: शिंदे गटानंतर शिवसेना ठाकरे गटाचा मनसेला धक्का

    मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे यांचा थोड्याच वेळात मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश होणार आहे. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व इथून मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.  तृप्ती सावंत यांना बाहेरून शेवटच्या क्षणी  मनसेकडून उमेदवारी दिल्यामुळे नाराजी होती. अखिल चित्रे यांनी २०१९ मध्ये वांद्रे पूर्व इथून मनसेकडून निवडणूक लढवली होती त्यांना जवळपास ११ हजार मत मिळाली होती. मनसेच्या टेलिकॉम सेनेचे अखिल चित्रे हे कार्याध्यक्ष आहे. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पवारांबाबत वादग्रस्त विधानानंतर सदाभाऊ खोत यांच्याकडून दिलगिरी व्यक्त 

    आधी शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान केल्यानतंर आता सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून सदा भाऊ खोत यांची सभा उधळवून लावण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलीय. माझ्या विधानामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो असं खोत म्हणाले. 

  • Maharashtra Breaking News Today LIVE Updates: पुण्यात सदाभाऊ खोतांविरोधात जोडेमारो आंदोलन

    पुण्यात सदाभाऊ खोतांविरोधात महाविकास आघाडीचं जोडेमारो आंदोलन. शरद पवारांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध.

  • वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का

    वरळी मध्ये शिवसेना शिंदे गटाला धक्का मिळाला आहे. वरळी मधील शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी थोड्याच वेळात मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. 

  • उद्धव ठाकरे घेणार सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर सभा! 

     

    उद्धव ठाकरे 13 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाहीर सभा घेणार आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात उद्धव ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. दुपारी 3.00 वाजता कणकवली, संध्याकाळी. 5.00 वाजता कुडाळ तर संध्याकाळी. 7.00 वाजता जाहीर सभा होतील.  रानेंच्या बालेकिल्ल्यात येऊन उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळचे लक्ष असेल. 

  • नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासाठी महाविकास आघाडीची सभा 

    पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार दुनेश्वर पेठे यांच्यासाठी  महाविकास आघाडीची सभा सुरू आहे. या सभेला शरद पवार,अनिल देशमुख, काँग्रेस आमदार विकास ठाकरे, अभिजीत वंजारी,छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल असे महाविकास आघाडीचे  नेते उपस्थित आहे. 

  • शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पुण्यात सदाभाऊ खोतांविरोधात आंदोलन

     

    पुण्यात शरद पवारांविरोधात सदाभाऊ खोत यांनी केलेल्या  वादग्रस्त वक्तव्याविरुद्ध जोडेमारो आंदोलन सुरू आहे. पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील भाजप मीडिया सेंटरच्या जवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे हे आंदोलन सुरु आहे. या मीडिया सेंटर मध्ये सदाभाऊ खोत आज घेणार होते पत्रकार परिषद मात्र ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. 

  • आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

     

    सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायालयात २२ अनुक्रमांकावर सुनावणी होणार आहे.  शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून आव्हान देण्यात आले आहे. 

  • पुण्यात उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची होणार जाहीर सभा

     

    वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार हुलगेश चलवादी यांच्या प्रचारासाठी बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची सभेसाठी येणार आहेत. येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालय मैदानावर १७ नोव्हेंबरला ही सभा होणार आहे.

  • श्रीकांत शिंदे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर!

     

    Shrikant Shinde: श्रीकांत शिंदे  हे आज रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघात  कार्यकर्त्यांशी ते संवाद  साधणार आहेत. राजापूर, रत्नागिरी आणि गुहागरमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या बैठका होतील. तिन्ही मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढाई आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर श्रीकांत शिंदे यांचा हा दौरा आहे. 

  • ईव्हीएम हॅककरून जिंकून देण्याचं आमिष दाखवणारा गजाआड

    EVM Machine Hack: महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत गीतेंना विजयी करून देण्याचे आमिष दिले होते. ४२ लाख रुपयांपैकी ५ लाख आत्ता द्या, माझे प्रोग्रामिंगवाले ओळखीचे असल्याचे सांगितले होते. पैसे न दिल्यास पराभूत करण्याचीही संशयित आरोपी भगवानसिंग चव्हाण याने दिली होती धमकी होती. चव्हाण मूळचा राजस्थानचा, गेल्या १५ दिवसांपासून म्हसरूळमध्ये मार्बलच्या दुकानात काम करत होता. मुंबई नाका पोलिस ठाण्यातील तक्रारीनंतर नाशिकच्या गुन्हे शाखेकडून ४ तासांत कारवाई करण्यात आली. 

  • Vardha: वर्ध्याच्या भुगांव येथे स्फोट, 23 जण जखमी

     

    वर्ध्याच्या भुगांव येथे असलेल्या इवोनिथ स्टील कंपनीमध्ये स्लॅक मटेरियलचा स्फोट झाला आहे. यामध्ये 23 जण जखमी झाले आहेत. या जखमींना 30 ते 40 टक्के भाजल्याची माहिती मिळाली. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link