Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले `हे` आदेश

Swapnil Ghangale Fri, 04 Oct 2024-1:49 pm,

Maharashtra Breaking News LIVE: राज्याबरोबरच देशभरातील प्रमुख घडामोडींचे सर्व अपडेट्स अगदी संक्षिप्त स्वरुपात जाणून घ्या; दिवसभरातील ताज्या घडामोडींनी धावा आढावा...

Latest Updates

  • पुणे बलात्कार प्रकरण : गृहमंत्री फडणवीसांचा पोलीस आयुक्तांना फोन; दिले 'हे' आदेश

    पुण्यातील तरुणीवर बलात्कारप्रकरणी उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून तपास करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिस तसेच क्राईम ब्रांच अशी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून आरोपींचे स्केच तयार करून युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे, अशी माहिती गृह विभागाने दिली आहे.

  • मंत्रालयामध्ये संरक्षण जाळीवर उडी मारणाऱ्या आमदारांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट

    मंत्रालयाच्या इमारतीमध्ये मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर नरहरी झिरवळांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत असलेल्या आदिवासी आमदारांनी उड्या मारल्यानंतर त्यांना या संरक्षण जाळीवरुन बाहेर काढण्यात आलं आहे. झिरवळांबरोबर राजेश पाटील आणि इतर दोन आमदारांनाही त्यांच्याबरोबर उडी मारली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने या आमदारांची भेट घेऊन त्यांच्याशी त्यांच्या मागण्यांबद्दल चर्चा केली. सरकार आमच्या मागण्या ऐकण्यास तयार नसेल तर आमचा प्लॅन बी तयार असल्याचं आंदोलक आमदारांनी सांगितलं आहे.

  • नरहरी झिरवाळांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन मारली उडी

    नरहरी झिरवाळांनी मंत्रालयाच्या इमारतीवरुन उडी मारली. त्यांनी मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी उडी मारली. आज सकाळपासून आदिवासी आमदारांचं मंत्रालयामध्ये आंदोलन सुरु आहे. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही या आमदारांनी आडवलं होतं. आदिवासी आरक्षणाअंतर्गत धनगरांना आरक्षण देऊ नये अशी या आंदोलनकर्त्या आमदारांची मागणी आहे.

  • शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करतोय; हर्षवर्धन पाटलांची घोषणा

    शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. या पक्षप्रवेशाआधी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीचा संदर्भ दिला. शरद पवार आणि सुप्रिया सुळेंनी आमच्या पक्षात या असा आग्रह धरला. आमच्या कार्यकर्त्यांनाही निवडणूक लढवायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं. आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी निर्णय जाहीर केला.

  • शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करायचा की नाही? हर्षवर्धन पाटलांचा समर्थकांना सवाल

    इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सिल्वर ओकला बोलवलं बैठक झाली. सविस्तर चर्चा झाली. तालुक्यातील बऱ्याच लोकांचा आग्रह आहे तुम्ही विधानसभेचे निवडणूक लढवा. तुम्ही भाजपमध्ये आहात तुमच्या जनतेचा आग्रह असेल तर तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही निर्णय घेतल्यानंतर बाकीच्या गोष्टीची जबाबदारी माझी राहील, असं शरद पवार म्हणाल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे. हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित समर्थकांना प्रश्न विचारला, तुम्हाला प्रवेश करायचा आहे की नाही? त्यावर समर्थकांनी होय असं एका सूरात उत्तर दिलं. "मलाही राम कृष्ण हरी वाजवा तुतारी असा आवाज आला," असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

  • आजच्या कॅबिनेटमधील चर्चेचे विषय

    आजच्या कॅबिनेटच्या अजेंड्यामध्ये मागील बैठकीच्या इतीवृत्तांताला मान्यता देण्याबरोबरच राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याच्या विषयावर चर्चा होईल असं सांगितलं जात आरहे. तसेच 'लडकी बहीण योजने'चा विभागवार आढावाही घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे पुणे आणि कोकणात कायमस्वरूपी नवी एसडीआरएफची टीम कायमस्वरूपी तैनात करण्याबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे. धरणांवरील जलविद्युत प्रकल्प बीओटी तत्त्वावर देण्याबाबत चर्चा होईल असं सांगितलं जात आहे.

  • हर्षवर्धन पाटलांनी बोलावली समर्थकांची बैठक

    हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाच्या प्रांगणात ही बैठक होणार आहे.  या बैठकीत हर्षवर्धन पाटील आपली भूमिका जाहीर करणार आहेत. हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याचं जवळपास निश्चित आहे.

  • शरद पवार आणि नितीन गडकरी एकाच मंचावर

    शरद पवार आणि नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावरराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आज दिवसभर सांगली दौऱ्यावर आहेत. विविध कार्यक्रम आणि उद्घाटन शरद पवारांच्या हस्ते पार पडणार आहेत. दुसरीकडे भाजपानेते व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार हे दोघे सांगलीतील मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमा निमित्ताने एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील भाजपा नेते एका मागून एक शरद पवारांच्या पक्षात दाखल होत असून काल सांगलीत शरद पवारांनी दाखल होताचं भाजपाला धक्का देत भाजपाचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना आपल्या पक्षात दाखल करून घेतले आहे .त्यामुळे भाजपाला खिंडार पाडत असताना भाजपा नेते नितीन गडकरी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर असल्याने सगळ्यांचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागून राहिले आहे.

  • मद्यपान करुन बाईकला धडक देत दोघांचा जीव घेतला; गुन्हा दाखल

    सोलापूर महामार्गावरील बुधोडा ते पेठ या महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघे जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कार चालक दारू पिऊन गाडी चालतवत होता. त्या गाडीत एकूण 5 जण होते. रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांना कट मारणे, शिवीगाळ करणे, आरडाओरडा करुन कार वेडीवाकडी चालविणे असे प्रकार सुरु होते. त्यानंतर या दुचाकीलाही त्या कारने कट मारली. यावेळी दुचाकीवरून जाणाऱ्या सादिक शेख यांनी विचारपूस केली असता कारमधील चार-पाच जणांसोबत बाचाबाची झाली. त्यानंतर दुचाकीस्वार दोन चिमुकल्यासह पती-पत्नी घेऊन त्या ठिकाणाहून लातूरकडे निघाला. दुचाकी पुढे गेल्यानंतर पाठीमागून या कारने पाठलाग करून दुचाकीवरून जाणाऱ्या या कुटुंबाला जोरदार धडक. यामध्ये इकरा सादीक शेख, नादिया शेख हे जागीच ठार झाले. तर सादीक आणि मुलगा आहाद हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाशी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून औसा पालीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

  • ...तर मराठीला मेहरबानीची गरज नाही : संजय राऊत

    "लोकसभेत आम्हाला हरवलं म्हणून तुम्हाला हा मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देत असेल असा जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी तर या मेहरबानीची मराठी भाषेला गरज नाही. ही शूराची भाषा आहे. मर्दांची भाषा आहे. शयराची भाषा आहे. ही संतांची भाषा आहे आणि महाराष्ट्रात ही सगळी परंपरा शौर्यांची आणि संतांची फार महान आहे," असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

  • मी जिवंत राहिलो तर...; अशोक चव्हाणांचे कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य

    "मी उद्या राजकीय क्षेत्रात राहिलो नाही तर तुम्ही बोलणार कोणावर, मी जिवंत राहिलो तर तुम्हीपण जिवंत रहाल, मीच जर संपलो तर तुम्हीपण संपाल", असं वक्तव्य माजी खासदार अशोक चव्हाण यांनी केलं. भोकर मतदार संघातील शेलगाव येथील एका कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. भोकर मधून यावेळी त्यांच्या कन्या श्रीजया चव्हाण विधानसभा लढणार आहेत. श्रीजया चव्हाण यांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मतदार संघ पिंजून काढत आहेत. सातत्याने टीका होत असल्याने त्यांनी विरोधकाना उद्देशून भाष्य केले.

  • राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला अधिक बळ मिळेल : सतेज पाटील

    राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे काँग्रेसला नक्कीच अधिक बळ मिळेल असं काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र हा भाजपचा गड राहिला नसून त्याची नट बोल्ट निखळत निघालेत अशी टीका देखील सतेज पाटील यांनी केलीय.

  • अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांना सूचक संकेत

    उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर होते. कार्यकर्त्यांचा बूथ कमिटीच्या बैठका त्यांनी घेतल्या यावेळी त्यांनी मी जो उमेदवार देईल त्याला आपण निवडून द्यावे असे म्हणत विधानसभेच्या निवडणुकीतून अजित पवार आता माघार घेणार आहेत की काय असे संकेतच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. 

  • मराठीसंदर्भातील निर्णय फक्त जुमला ठरू नये : नाना पटोले

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात घेतलेला निर्णय फक्त जुमला ठरू नये अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

  • पालघरमध्ये दिसली संशयित बोट; पोलिसांचा सतर्कतेचा इशारा

    पालघरच्या घोलवड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित बोट दिसून आल्याने खळबळ उडाली आहे. घोलवडजवळील चिखले वडकतीपाडा येथील समुद्रात संशयित बोट मध्यरात्रीच्या सुमारास दिसून आल्याची माहिती समोर आली आहे. समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या काही तरुणांना बघून ही बोट पुन्हा माघारी फिरल्याची पोलीस प्रशासनाला माहिती मिळाली आहे. त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील सर्व पोलीस ठाण्यांसह नागरिकांना पालघर जिल्हा पोलीस प्रशासनाच सतर्कतेच आवाहन केले आहे. पोलिसांनी परिसरात संशयित हालचाली दिसून आल्यास त्वरित पोलिसांना खबर देण्याच आवाहनही केलय. जिल्ह्यातील मासेमारी बोटींपेक्षा वेगळी बोट असल्याची तरुणांची पोलिसांना माहिती दिली आहे.

  • राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार

    राज्यातील 29 हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. लांबणीवर पडलेल्या राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. राज्यातील जवळपास 29 हजार 443 सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार अ वर्गातील 42, ब वर्गातील 1716 , क वर्गातील 12250, आणि ड वर्गातील 15435 अशा संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे जिल्ह्यात आणि शहरात मिळून 3038 सहकारी संस्था आहेत. 

  • मराठी भाषेला अभिजात दर्जा : CM शिंदेंनी मानले मोदी-शाहांचे आभार

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृतातें ही पैजा जिंके॥ समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!! अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलंय. 

  • त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना डिस्चार्ज

    अक्षय शिंदे चकमक प्रकरणात उपचारासाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले पोलीस अभिजित मोरे आणि संजय शिंदे या दोघांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अक्षय शिंदेने केलेल्या गोळीबारात जखमी झालेले पोलीस अधिकारी निलेश मोरे अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. लवकरच त्यांना देखील डिस्चार्ज दिला जाणार आहे. 

  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: मोदींनी व्यक्त केला आनंद

    मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आनंद व्यक्त केला आहे. "मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल," असं मोदी म्हणाले. 

     

  • अपल्पवयीन गुन्हेगारीसंदर्भातील वयोमर्यादा 18 वरुन 14 करण्याचा विचार

    राज्यात बाल गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. वयोमर्यादा 18 वर्षांऐवजी 14 वर्षे करण्याचा निर्णय हा केंद्र सरकारशी निगडित आहे त्यामुळे अमित शहा यांच्याशी चर्चा करण्यात येणार असल्याचे समजते.

  • राहुल गांधी आजपासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर

    काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी शुक्रवार 4 ऑक्टोबर  व शनिवार 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत.  कसबा बावडा येथील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link