Breaking News LIVE UPDATES :वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जण ताब्यात, ताम्हिणी घाटात केली कारवाई
Breaking News LIVE UPDATES : राज्यासह देशातही कुठे काय घडतंय? राजकीय वर्तुळा कोणाची हवा? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग...
Breaking News LIVE UPDATES : हवामानाच्या स्थितीपासून महागाई आणि राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील बातम्या आणि स्थानिक घडामोडींसह देशभरातील महत्त्वाच्या घटना एका क्लिकवर.
Latest Updates
वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जणांना घेतलं ताब्यात
वनराज आंदेकर खून प्रकरणी 13 जणांना ताम्हिणी घाटातून घेतलं ताब्यात
पुणे क्राईम ब्रँच आणि रायगड पोलिसांच्या मदतीने 13 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे
जेवण्यासाठी हे सगळे जणं ताम्हिणी घाट परिसरात थांबले होते
जेवण झाल्यानंतर तामिनी घाटातून पुढे मार्गस्थ होण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना घेतलं ताब्यात
दोन दिवसांपूर्वी वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबार करत कोयत्याने करण्यात आला होता हल्ला
समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, कमळ सोडून फुंकली तुतारी
कामावर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटकाव करणाऱ्या संपकऱ्यावर FIR दाखल करण्याचे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले गेले आहेत. तसेच या घटनेचे पुराव्यासाठी चित्रिकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अमृत भारत स्टेशन अंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार
केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या स्टेशन डेव्हलप आणि आधुनिकीकरण करण्यात येत आहेत
अमृत भारत स्टेशन अंतर्गत राज्यातील 132 रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्यात येणार आहे.
यामध्ये सर्वात अधिक खर्च म्हणजे 1813 कोटी रुपये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा कायापालट करण्यासाठी केला जाणार आहे.
त्या संदर्भातील फोटो आणि माहिती केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून उपलब्ध झाली आहे
पंप स्टोरेजचे राज्यात विक्रमी करार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार
आज एकूण 35,240 मे.वॉ.चे वीजनिर्मिती करार.
यात एकूण गुंतवणूक : 1,88,750 कोटी रुपये
रोजगार निर्माण : 62,550आतापर्यंत एकूण पंप स्टोरेजचे करार: 40,870 मे.वॉ.
एकूण गुंतवणूक : 2,13,381 कोटी रुपये
एकूण रोजगारनिर्मिती : 71,950राज्याची एकूण स्थापित क्षमता : 46,000 मे.वॉ.
त्यातून 40,870 मे.वॉ.चे पंप स्टोरेज क्षेत्रात वीजनिर्मिती करार झाल्याने ग्रीन एनर्जी क्षेत्रात मोठे पाऊल.
यापूर्वीही राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत सुद्धा लक्षणीय पुढाकार.
ऐतिहासिक पाऊल : 2030 पर्यंत राज्यातील 50 टक्के वीजनिर्मिती ही नैसर्गिक साधनांतून होणार.आज जे करार झाले, त्यात एनटीपीसी, वेल्सपुन न्यू एनर्जी लि, एनएचपीसी, रिन्यू हायड्रो, टीएचडीसीआयएल आणि अदानी पॉवरचा समावेश.
मुंबई गोवा महामार्गावरून 5 सप्टेंबर पासून अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी. गणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमन्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे शासनाचे आदेश.
आदित्य ठाकरेंनी घेतली आयुक्तांची भेट
आयुक्तांची आज भेट घेतली मागच्या वेळेस वरळीतील आणि इतर विषय होते आज देखील महत्त्वाचे तीन विषय होते... जे मागच्या वेळी जे प्रश्न मांडले होते ते विषय त्यांनी तातडीने सोडवायला घेतल्या त्यामुळे मी त्यांचे आभार देखील मानायला आलो होतो... डीलाय रोडचा ब्रिज असेल किंवा वरळी स्मशानभूमीचा प्रश्न असेल तो देखील त्यांनी सोडवायला घेतला आहे...
आजचे तीन महत्त्वाचे विषय होते महानगरपालिकेच्या वतीने लिपिक पदासाठी भरती काढली आहे त्याच्यामध्ये दोन-तीन जाचकाठी ठेवल्या आहेत त्या शिथिल करावे अशी विनंती आम्ही केली आहे... कुलाबा मधील मुंबादेवी मंदिर याच्या मागे जी जागा आहे ती पार्किंग बांधणे सुरू केला आहे... त्यात तिथे पार्किंग आहे ती हलवून तिथे भक्त निवास झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे... तिथे कचऱ्याचा मोठा ढिगारा झाला आहे... तू तिथून बाजूला झाला पाहिजे कारण येता नवरात्र मध्ये तिथे मोठ्या प्रमाणात भंडारा लागतो त्याला अडचण होऊ शकते म्हणून हा निघाला बाजूला काढावा...
एसटी संपावर कोणताही तोडगा नाहीच
उद्योगमंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीतील बैठक निष्फळ, सूत्रांची माहिती
एसटी संपावर कोणताही तोडगा बैठकीत निघाला नाही
ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांची गैरसोय नको यासाठी उदय सामंत यांनी केली विनंती
मात्र जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर संपावर ठाम अशी एसटी कर्मचारी संघटनांची भूमिकाकृती समितीकडून संप सुरुच ठेवण्याचा निर्धार
उद्या संध्याकाळी सह्याद्री अतिथिगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कृती समिती चर्चा करणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष
पुढील २४ तासांसाठी कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
एसटी कर्मचारी समिती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची बैठक
एसटी कर्मचारी संघटनेची कृती समिती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यात बैठकीला सुरुवात
कृती समितीकडून बैठकीत विविध मागण्या ठेवण्यात येणार
सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे ही प्रमुख मागणी
एक्सप्रेस टावरमधील एमआयडीसीच्या कार्यालयात बैठकीला सुरुवात
Breaking News LIVE UPDATES : कोल्हापुरात पुन्हा एक मोठी राजकीय घडामोड
भाजपचा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई शरद पवारांच्या भेटीला. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी राहुल देसाईसुद्धा इच्छुक. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचा दुसरा मोहरा देखील शरद पवारांच्या गळाला? जिल्ह्यात एकच चर्चा. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई याचे चिरंजीव. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याची एकत्रित घेतली भेट. राधानगरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे के पी पाटील, ए वाय पाटील यांच्या नंतर आता राहुल देसाई हेही शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.
Breaking News LIVE UPDATES : जयदीप आपटेला लूक आऊट नोटीस
जयदीप आपटेला लूक आऊट नोटीस. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार आहे.गेल्या आठ दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत आहेत,मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी अखेर त्याच्या विरूद्ध लूक आऊट नोटीस जारी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील कोसललेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार असून त्याचा पोलिसांना ठावठिकाणा लागला नाही. जयदीप आपटेच्या शोधासाठी सिंधुदुर्ग पोलिसांनी सात पथके तयार केली आहेत. त्यातील दोन पथके तांत्रिक विश्लेषणासाठी आणि पाच पथके मुंबई, कल्याण, ठाणे, कोल्हापूर आणि गोवा येथे तपासासाठी रवाना केली आहेत. परंतु अजूनही जयदीप आपटे सापडत नाही आहे. बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटकही झाली. तो सध्या ५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत आहे. परंतु जयदीप आपटे फरार आहे.
Breaking News LIVE UPDATES : स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश
स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश. सिद्धार्थ खरात यांनी 1 जुलै रोजी मंत्रालयीन सहसचिव असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला. मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता सिद्धार्थ खरात ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे. सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून कामे केली आहेत.
Breaking News LIVE UPDATES : आता गणपतीनंतरच सर्वकाही; मविआत मोठा निर्णय
इथं जागावाटपाची समीकरणं अद्यापही अनुत्तरित असतानाच आता महाविकास आघाडीच्या जागावाटप संदर्भातील संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपसंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपसंदर्भातील दोन बैठका झाल्यानंतर आता पुढील बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची सूत्रांची माहिती. गणेशोत्सव झाल्यानंतर सुरुवातीला मुंबईतील जागावाटपा संदर्भात निर्णय घेतला जाणार असून त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील जागा वाटप बाबत निर्णय घेतला जाणार आहे.
Breaking News LIVE UPDATES : एसटी महामंडळाच्या कामगार संघनटनेशी मुख्यमंत्री करणार चर्चा
ऐन सणवारांच्या दिवसांमध्ये एसटी महामंडळानं विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या धर्तीवर अखेर शासनाकडूनही एक पाऊल पुढे टाकण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. अधिकृत माहितीनुसार 4 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कामगार संघटनांच्या कृती समितीला त्यांच्या मागण्यांबाबत बैठकीस बोलावलं आहे. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन सणासुदीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होईल, अशा प्रकारे कोणतीही कृती करू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळनं केलं आहे.
Breaking News LIVE UPDATES : शिक्षकाने मुलीची छेड काढल्याचा आरोप, नातेवाईकांनी केली क्लासेसची तोडफोड
नांदेड शहरातील एका खाजगी कोचिंग मध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीची शिक्षकाने छेड काढल्याचा प्रकार नांदेड शहरात घडला असून संतप्त नातेवाईकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केली. या तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणात शिक्षकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपी नागेश जाधव असे शिक्षकाचे नाव असून भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. चैतन्य नगर परिसरातील कॅनॉल रोडवर खाजगी क्लासेस आहे. इयत्ता अकरावी मध्ये शिकणारी मुलगी या क्लासेसमध्ये स्पोकन इंग्लिश शिकत होती. मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलवून शिक्षकाने विनयभंग केला अशी तक्रार मुलीने केलीये. पोलिसांनी फिर्यादी मुलीचा जबाब घेतला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विनयभंग, पाक्सो आणि एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आलाय
Breaking News LIVE UPDATES : लालपरी संपावर! काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन.
2018 ते 2024 पर्यंतच्या वाढीव महागाई भत्त्याची थकबाकी देणे बाबत.
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे घरभाडे भत्ता आणि वार्षिक वेतनवाढ करावी.
58 महिन्यांच्या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची थकबाकी द्यावी.
57 महिन्यांच्या कालावधीचा घरभाडे भत्त्याची थकबाकी द्यावी
Breaking News LIVE UPDATES : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी लांबणीवर
राजकीय वर्तुळा अनेकांचं लक्ष लागून राहिलेली शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आणखी लांबणीवर पडली आहे. मंगळवारी होणारी ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता ही सुनावणी गुरुवारी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे, सरन्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे सुनावणी पुढे ढकलल्याचं कारण समोर येत आहे.
Breaking News LIVE UPDATES : शिर्डी एसटी डेपोतील कर्मचारी संपावर
राज्यातील एसटी कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेलेत. वेतनवाढीच्या मागणीसह खाजगीकरण बंदीसह विविध मागण्याकरिता ST कर्मचरी संपावर गेले आहेत. त्यामुळे शिर्डीत येणाऱ्या भाविक प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
Breaking News LIVE UPDATES : गुहागर, दापोली, खेड डेपो शंभर टक्के बंद; ST कामगारांचं आंदोलन गंभीर वळणावर
कोकणात देखील एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अनेक भागात प्रवाशांचे मोठे हाल होताना दिसतायत. सकाळपासून बस डेपो मधून गाड्या न सुटल्यामुळे विद्यार्थ्यांचेही हाल होताना दिसतायत. गुहागर ,दापोली, खेड डेपोमध्ये शंभर टक्के बंद असल्याचे पाहायला मिळतंय तर चिपळूण मध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
Breaking News LIVE UPDATES : स्वारगेट बस स्थानकात बाहेरगावी जाणाऱ्या सर्व बस बंद
स्वारगेट बस स्थानकातून बाहेर गावी जाणाऱ्या सर्व एसटी बस बंद. नाईटसाठी आलेल्या बस फक्त बाहेर पडणार असल्याची माहिती. ड्रायव्हर, कंडक्टर आणि वर्कशॉपमधील जवळपास 500 च्या वर कर्मचारी संपात सहभागी होणार. स्वारगेट बस स्थानकात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.
Breaking News LIVE UPDATES : खा. धैर्यशील पाटील, जयंत पाटील यांच्यात वादाची ठिणगी
शेतकरी कामगार पक्ष सोडून भाजपमध्ये जावून नुकतेच राज्यसभेचे खासदार झालेले धैर्यशील पाटील यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना चांगलंच डिवचलय. आपले 24 सदस्य असताना ज्यांनी 12 सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिलं, ज्यांना 12 अधिक की 24 अधिक हे कळलं नाही त्यांनी माझ्या खासदारकीची काळजी करू नये, असा टोला धैर्यशील पाटील यांनी लगावलाय. धैर्यशील पाटलांची खासदारकी अवघ्या 17 महिन्याची आहे असं जयंत पाटील म्हणाले होते. त्यावर बोलताना माझी खासदारकी 2 वर्षांची आहे या काळात असं काम करीन की मीच धैर्यशीलला भाजप मध्ये पाठवलं असं तुम्ही म्हणाल, अशी कोपरखळी खासदार पाटील यांनी लगावलीय.
Breaking News LIVE UPDATES : ऐन गणेशोत्सवाच्या दिवसात एसटी कर्मचाऱ्यांची संपाची हाक
ST महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे तसेच जुलै 2018 ते जानेवारी 2024 या काळातील महागाई भत्ता देण्यात यावा या आणि अशा विविध मागण्यांसाठी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ST कर्मचारी संघटनाकडून काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पहिला दिवस आहे. मुंबई सेंटर येथील ST बस डेपो मध्ये या आंदोलनाचा थेट फटका प्रवाशांवर होताना पाहायला मिळत आहे.
Breaking News LIVE UPDATES : राष्ट्रवादीत खलबतं; कोण सोडणार पक्ष? पाहा मोठी बातमी
अजित पवार गटाचे माजी आमदार के पी पाटील शरद पवारांच्या भेटीला. के पी पाटील शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक. उमेदवारी मिळत असेल तरच शरद पवार राष्ट्रवादी पक्षात के.पी पाटील प्रवेश करण्याची शक्यता. के पी पाटलांचे मेहुणे ए वाय पाटील हे देखील राधानगरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक.
Breaking News LIVE UPDATES : मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील परीक्षा 23 ऑक्टोबरपासून
मुंबई विद्यापीठाने द्वितीय सत्रांतर्गत (हिवाळी सत्र 2024) घेतल्या जाणाऱ्या चारही विद्याशाखा अंतर्गतच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. तसेच अभियांत्रिकी, वास्तुकला, फार्मसी आणि एमसीए या अभ्यासक्रमांच्याही विविध सत्रांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या सर्व परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक हे मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.
Breaking News LIVE UPDATES : मुंबईतील पाणीसाठा 97 टक्के, पावसामुळे यंदा धरणे काठोकाठ
जुलै महिन्यातील दमदार पाऊस आणि ऑगस्ट महिन्यात अधूनमधून येणाऱ्या सरींमुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांच्या पाणीसाठ्यात यंदा भरघोस वाढ झाली असून सात धरणात मिळून ९७ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
Breaking News LIVE UPDATES : पुणे फ्लॅश वनराज आंदेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक
पुणे फ्लॅश वनराज आंदेकर खून प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली असून, गोळीबार आणि कोयत्याने वार करून खून केल्याप्रकरणी मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाडही गजाआड. या प्रकरणात आंदेकर यांच्या मेहुना जयंत कोमकार आणि गणेश कोमकार यांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, तर या खून प्रकरणात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
Breaking News LIVE UPDATES : अबब..... कोथिंबीर 450 रुपये प्रति जुडी
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत काल रात्री झालेल्या लिलावात चक्क कोथंबरीला प्रतिजुडी 450 भाव मिळालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कोथिंबीरीला एवढा भाव मिळालाय. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची सतत धार सुरू आहे. काल सकाळपासूनच नाशिक शहरा सह जिल्ह्यात पावसाची सतत धार सुरू होती आणि यामुळे अनेक पालेभाज्या खराब झाल्या तर काही भाजीपाला बाजार समितीत पोहोचलाच नाही.