Maharashtra Breaking News LIVE: दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय

Thu, 05 Sep 2024-7:48 pm,

Maharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणानंतर आता राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. तसंच, राज्यात पावसाचा जोरही वाढला आहे. बाप्पाच्या आगमनाचीही तयारी जोरात सुरू आहे. देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घेऊया लाइव्ह ब्लॉगमधून 

Latest Updates

  • दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात आणण्यासाठीच्या प्रकल्पाला कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. पश्चिमी वाहिनी आणि उल्हास खोऱ्यातील वाहून जाणारे 55 टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. तसेच वॉटर ग्रीड प्रकल्पाच्या डीपीआरसाठी ६१.५२ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत वाद 

    राज्य सरकारने आणलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सध्या महायुतीत वाद सुरु झाला आहे. अजित पवार गटाने केलेल्या जाहिरातीवर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला आहे. कॅबिनेट बैठकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:   लालबागचा राजा फर्स्ट लूक 

  • बदलापूर रेल्वे स्थानकात ऐन गर्दीच्यावेळी गोळीबाराची घटना घडली आहे. आरोपीने एका व्यक्तीवर गोळीबार करत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ऐन गर्दीच्यावेळी घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

  • ऐन गणेशोत्सव काळात रायगडमध्ये सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. काल रात्रीपासूनच सी एन जी चा तुटवडा आहे. वाहतूक कोंडीमुळे  सीएनजी घेवून येणारी वाहने वेळेत पोहोचू शकली नाहीत. यामुळे माणगाव ते खेड पर्यंत सर्वच सी एन जी केंद्रांवर खडखडाट आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय 

    गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांची गैरसोय. रायगडमध्ये काल रात्रीपासून CNG संपल्याने चाकरमान्यांना मनस्ताप. वाहतूक कोंडीमुळे CNG घेवून येणारी वाहने वेळेत पोहोचू शकली नाहीत. त्यामुळे माणगाव ते खेड पर्यंत सर्वच CNG केंद्रांवर खडखडाट. 

  • Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजनेसाठी पूर्ण वर्षभराची आर्थिक तरतूद : एकनाथ शिंदे

    लाडकी बहीण योजने बंद करण्यासाठी विरोधकांनी कितीही प्रयत्न केला किंवा खोट्या अफवा पसरवल्या आणि कुठेही कोर्टात गेले तरीसुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही कायम सुरू राहील अशा प्रकारचा निर्णय कॅबिनेटमध्ये झाला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. 

  • मुंबईतील माजी नगरसेविका ऋतुजा तारे यांचा शिंदे गटात प्रवेश

    शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईतील माजी नगरसेविका ऋतुजा तारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  दिव्यांगांना एसटीच्या सर्व बसेसमध्ये कायमस्वरूपी आरक्षण

    दिव्यांग प्रवाशांना यापुढे एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्यात आले असून, ते कोणत्याही थांब्यावर चढल्यास त्यांना त्यांचे आरक्षित आसन उपलब्ध करून देण्याचे जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. त्यामुळे दिव्यांगाचा प्रवास यापुढे अधिक सुखकर व आरामदायी  होणार आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी

    मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर शिल्पकार जयदीप आपटे याला काल पोलिसांनी अटक केली आहे. आता जयदीप आपटेला 10 सप्टेंबरपर्यंत  पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  • भरधाव खासगी बस ट्रकला धडकून हॉटेलमध्ये घुसली, 4 जणांचा मृत्यू 

    नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात भरधाव ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार ठार झाले असून 15 हून अधिक जण जखमी झाले आहे. उमरेड-भिवापूर मार्गावर तास गावातील बसस्टॅन्ड जवळ हा अपघात झाला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी यांच्या हस्ते पतंगराव कदम यांच्या स्मारकाचे अनावरण

    स्वर्गीय पतंगराव कदम लोकतीर्थ स्मारक उदघाटन सोहळ्यासाठी विरोधी पक्षनेते राहुल गांधी सांगलीत आले आहेत. आज राहुल गांधी यांच्या हस्ते पंतगराव कदम यांच्या स्मारकाचे अनावरण करण्यात आले आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: बदलापूर अत्याचार प्रकरणः अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ

    दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने एसआयटीच्या पथकाने  अक्षयचा मोबाईल मिळत नसल्याचे सांगत  दोन दिवसाची एसआयटीच्या कोठडी देण्याची विनंती केली होती या नंतर कल्याण स्पेशल कोर्टाने अक्षयला दोन दिवसांची कोठडी सुनावली होती. आज ती कोठडी पूर्ण होत असून  त्याला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते. अक्षय शिंदेच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ झाली आहे. 

  • Maharashtra Breaking News LIVE: एसटीची वाट पाहत बसलेल्या दोन शाळकरी मुलांचे अपहरण

    नाशिक जिल्ह्यातील येवल्यात तर चक्क शाळेत गेलेली मुलं एसटी बंद असल्याने हरवल्याचा प्रकार घडला आहे. येवला तालुक्यातील राजापूर जवळ असलेल्या भवरी येथील चेतन वसंत गायकवाड व कार्तिक संभाजी गायकवाड हे दोन शाळकरी मुले बेपत्ता झाली आहे. भवरि येथून राजापूर येथील शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती. मात्र एसटीचा संप असल्याने एका अज्ञात वाहनाने त्यांना गाडीत बसून घेत राजापूर येथे न थांबता थेट नगर जिल्ह्यात राहुरी येथे घेऊन गेले.

  • Maharashtra Breaking News LIVE: अटल सेतूवरून 35 वर्षीय तरुणांची आत्महत्या, तिसरी  आत्महत्या

     पुण्यातील एका 35 वर्षीय बँकरने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आलेय

  • Maharashtra Breaking News LIVE: राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन

    राज्यात शक्ती कायदा लागू व्हावा या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिलांचे व्हेरायटी चौक नागपूर येथे आंदोलन सुरु आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी घेतले ताब्यात 

    कडेगाव येथील राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देणारे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हाके व त्यांचे समर्थक आज कडेगाव येथे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात गांधी यांना काळे झेंडे दाखवणार होते.

  • Maharashtra Breaking News LIVE: हिंगोली जिल्ह्यात शेती पिकांचे अतोनात नुकसान

    हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अति मुसळधार पावसाने शेतीच मोठ नुकसान झालय, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काही भागात शेतकऱ्यांच्या सुपीक शेतात अक्षरशः भल्ली मोठी दगड वाहून आलीयेत

  • Maharashtra Breaking News LIVE: जयदीप आपटेला मालवण पोलिस स्थानकात आणले

    जयदीप आपटेला सिंधुदुर्ग पोलीस कल्याणवरून ताब्यात घेऊन मालवण पोलीस स्थानकात दाखल

  • Maharashtra Breaking News LIVE:  गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बसचा अपघात

    गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या दोन बस कंटेनर वर धडकल्या आहेत. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आहेत. सुदैवाने कोणतीही दुखापत नसून दोन्ही बसचे मात्र नुकसान झाले आहे. या दोन्ही बसमध्ये एकूण 80 प्रवासी होते. 

  • Maharashtra Breaking News LIVE:  कोयना धरणातून विसर्ग वाढणार

    कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाची रिपरिप सुरूच असल्याने धरणाच्या सहा वक्र दरवाजे 4 फुटांपर्यंत उघडून 37,500 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे.धरणाचा पायथा वीज गृहातुन 2100 क्युसेक सुरू असून कोयना नदी पात्रता एकूण 39600 क्युसेक विसर्ग होत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

    काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज नांदेडचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. खासदार वसंतराव चव्हाण यांचे 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते.

  • Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात गणेशोत्सवात चोख बंदोबस्त सात हजार पोलिस असणार तैनात 

    गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित घटना घडू नयेत यासाठी पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.सुमारे सात हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. 

  • Maharashtra Breaking News LIVE: सोन्याची तस्करी करणारे दोघे नागपूर विमानतळावर अटक, 61 लाखांचे सोने जप्त 

    नागपूर विमानतळावर 61 लाख किमतीचे सोने जप्त दोघांना अटक.  सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट आणि एअर कस्टम युनिटची कारवाई

  • Maharashtra Breaking News LIVE: काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगली जिल्हा दौऱ्यावर 

    लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.. कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या तिन्ही मतदारसंघात काँग्रेसच्या विचाराची उमेदवार निवडून आल्याने राहुल गांधी आजच्या दौऱ्यात कशा प्रकारचे भाषण करतात हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूककोंडी

    सलग दुसऱ्या दिवशी ठाणे शहरात वाहतूककोंडी आहे.   घोडबंदरवरून ठाणे गाठायला तब्बल 3 तास लागत आहेत. ठाण्यामधे सलग दुसऱ्या दिवशी अभूतपूर्व वाहतूक कोंडी आहे. माजिवडा, घोडबंदर रोडवरून ठाणे शहराच्या दिशेेने तुफान कोंडी झालीय.

  • Maharashtra Breaking News LIVE: ग्रेटा थनबर्गला अटक, कोपनहेगन पोलिसांची कारवाई

    स्वीडनमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी ग्रेटा थनबर्गला पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ ग्रेटा थनबर्गनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

  • Maharashtra Breaking News LIVE: प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवची आज ईडी चौकशी

    सोमवारी एल्विश यादवला लखनऊ येथील ईडी ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी जबाब नोंदवण्यासाठी येण्यास असमर्थता दर्शवून तीन दिवसांची मुदत मागितली होती.यासंदर्भात ईडीने एल्विश यादवला 5 सप्टेंबरची वेळ दिली होती.

  • Maharashtra Breaking News LIVE: वक्फ विधेयकाप्रकरणी गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची आज बैठक 

    आज वक्फ विधेयकाप्रकरणी गठित करण्यात आलेल्या संयुक्त सांसदीय समितीची बैठक आहे. संयुक्त सांसदीय समितीची ही तिसरी बैठक आहे. महाराष्ट्रातून ठाकरे गटाचे अरविंद सावंत, शिंदे गटाचे नरेश म्हस्के, शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे आणि भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी बैठकीत सहभागी होतील. संयुक्त सांसदीय समिती वक्फ विधेयकावर विचारविनिमय करुन आपला अहवाल संसदेला सादर करेल

     

  • Maharashtra Breaking News LIVE: पुणेकरांनो लक्ष द्या; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

    पुण्यातील गणेशोत्सवात मध्य भागातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार आज पासून अवजड वाहनांना पुणे शहरात बंदी असणार आहे. शहरातील मध्य भागात ५ ते १८ सप्टेंबर या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. विशेषत: व्यापारी पेठेत माल घेऊन येणारी जड वाहने शहराबाहेर उतरावीत. त्यानंतर छोट्या वाहनातून साहित्य मध्य भागात आणावे. जड वाहनचालकांनी मध्य भागात वाहने आणू नयेत. वाहतूककोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे

  • Maharashtra Breaking News LIVE: समाधानकारक पावसामुळे धरणांमध्ये वाढला जलसाठा

    राज्यात यावर्षी समाधानकारक पाऊस झाला असून, धरणे तुडुंब भरली आहेत. राज्यातील १३८ मोठ्या धरणांतील सरासरी पाणीसाठा ९० टक्के झाला आहे. २६० मध्यम प्रकल्प ७१ टक्के भरले असून, २५९९ लघु प्रकल्पांत ४७ टक्के साठा झाला आहे. आजच्या घडीला विविध प्रकल्पांत मिळून ४०८१३.९७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link