Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी, पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ

Mon, 15 Jul 2024-7:59 pm,

Breaking News LIVE Updates : आजचा दिवस पावसाचा! असंच एकंदर चित्र आणि पावसाचे तालरंग पाहता म्हणावं लागेल. याव्यतिरिक्त आजच्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या? पाहा एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates : राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळत असून, त्याचा परिणाम रस्ते, रेल्वे आणि विमान वाहतुकीवर होताना दिसत आहे. मागील 24 तासांपासून कोकण रेल्वेवर पावसाचा सर्वाधिक परिणाम झाल्याचं पाहायला मिळत असून पुढील काही तास आता पाऊस नेमकं कोणतं रुप दाखवतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 


दरम्यान, पावसाव्यतिरिक्त राज्यात इतरही कैक घडामोडी आणि घटना घडत असून, इथं तुम्हाला पाहता येतील सर्व अपडेट्स एका क्लिकवर... 

Latest Updates

  • Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील बळीराजासाठी आनंदाची बातमी

    केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत येत असलेल्या शेतकऱ्यांना पीकविमा भरण्याची मुदत वाढवली

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    31 जुलै पर्यंत पीकविमा भरण्याची दिली मुदतवाढ

    राज्य सरकारने केंद्राकडे मुदत वाढवण्याची केली होती मागणी

  • कोकण रेल्वे मार्गावरील दरड हटवली, 25 तासानंतर मांडवी एक्स्पेस रवाना

     

  • Breaking News LIVE Updates: निवडणुकीनंतर शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, 6 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

    शरद पवार महाराष्ट्राच्या सहा दिवस दौऱ्यावर.‌

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आजच शरद पवार पुण्याला रवाना. दुपारी तीन वाजता पुणेसाठी रवाना झाले. 

    परवा शरद पवार यांचा पुणे येथे बालगंधर्व येथे कार्यक्रम. 

    शरद पवारांची प्रकृती बरी असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

  • Breaking News LIVE Updates: येणारी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार - अजित पवार
     

    येणारी विधानसभा आम्ही महायुती म्हणूनच लढणार. 
     महायुतीचा चेहरा एकनाथ शिंदेच राहणार. 
    बारामतीत अजित पवार लढणार की पार्थ पवार? 
    अजित पवार म्हणाले पक्षांतर्गत बैठकीत हा निर्णय ठरवला जाणार.
    या लोकसभेला  भारतीय जनता पक्षाने सर्व केले होते. 
    यंदा आम्ही देखील सर्वे करणार आहोत. 
    भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) बैठकीत प्रत्येक पक्ष आपला सर्वे समोर ठेवेल. त्यानंतर निर्णय घेतले जातील

  • Breaking News LIVE Updates: विशाळगड प्रकरणी खासदार शाहू छत्रपती यांची भूमिका 

    विशाळगड प्रकरणी खासदार शाहू छत्रपती यांची भूमिका 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट हटवण्यात यावी , कोणताही दुजाभाव करू नये 

    उद्या घटनस्थळी पाहणी करणार

    -----------

    विशाळगड येथील अतिक्रमणे हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार आमच्या मनाला प्रचंड वेदना देणारा असून घडलेल्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना घडली, हे अत्यंत क्लेशदायक आहे.
    यासंदर्भात प्रशासनाने विशाळगड प्रश्न गांभीर्याने घेऊन माजी खासदार संभाजीराजे व मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांना या घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु, राज्यशासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य ती खबरदारी गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळे ही घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे. राज्यसरकारने रविवारी अतिक्रमण काढण्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला जे आदेश दिले तेच आदेश या पूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी.
    माजी खासदार संभाजीराजे यांनी याप्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला, त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात तीव्र निषेध करतो.
    हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले, त्यांना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काही केले नाही, तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल.
    उद्या (मंगळवारी) आम्ही घटनास्थळी भेट देवून पाहणी करणार आहोत. कोणत्याही समाजघटकांवर अन्याय होत असेल तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे.
    विशाळगडावरील अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई प्रशासनाने तातडीने करावी. त्या संदर्भात कोणताही दुजाभाव केला जाऊ नये.

  • Breaking News LIVE Updates : हवामान विभागाकडून अलर्ट जारी

    ठाणे, मुंबई जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट.  
    रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याने दिला रेड अलर्ट.
    पुणे सातारा जिल्ह्यालाही हवामान खात्याचा रेड अलर्ट. 
    कोल्हापूर, संभाजीनगर, जालना परभणी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी.

     

  • Breaking News LIVE Updates : कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प

    रत्नागिरी - कोकण रेल्वे तब्बल 21 तासांहून अधिक काळ ठप्प

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    रुळावर आलेली माती काढण्याचे काम सुरुच

    एक ते दिड तासांनी रेल्वे मार्ग सुरु होईल

  • Breaking News LIVE Updates : महायुतीत विधानसभा जागा वाटपासंदर्भात लवकरच चर्चा 

    सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा जागा वाटपासंदर्भात लवकरच महायुतीत चर्चा होणार आहे. जागा वाटपाबाबत तिन्ही नेत्यांमध्ये एकमत आहे. जागावाटप झाल्यानंतर आपापले उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्यात येणार आहेत. लोकसभेत उमेदवार उशिराने जाहीर केल्यामुळे  महायुतीला फटका बसला होता. 

     

  • Breaking News LIVE Updates :  कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी कणकवलीतून एसटीच्या 17  गाड्या

    कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एसटीच्या 17 गाड्या कणकवली स्टेशनवरून सोडण्यात आल्या आहेत.कणकवली रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी पुढील प्रवासासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून एसटीच्या 17 गाड्या सोडण्यात आल्या. वृद्ध,अपंग आणि आजारी प्रवाशांसाठी एका स्लीपर बसचीही सोय करण्यात आली आहे. मंगलोर एक्स्प्रेस पहाटे पासून कणकवली स्थानकात थांबून आहे.अखेर ही ट्रेन रद्द करण्यात आली.सहा सात तासांनंतर अडकलेले प्रवासी बसने मुंबईच्या दिशेने रवाना. प्रवाशांना दिलासा मिळाला असून त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • Breaking News LIVE Updates :  शरद पवारांसोबतची भेट नेमकी कशासाठी? छगन भुजबळ म्हणाले... 

    राज्यात आरक्षणांच्या मुद्द्यांवर बिघडलेल्या परिस्थितीवर भाष्य केलं. ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणप्रश्नीसुद्धा चर्चा केली, असं म्हणज छगन भुजबळ यांनी अखेर शरद पवार यांची भेट ता घेतली, यासंदर्भातील हेतू समोर आणला. राज्यात शांतता पाहिजे आणि ही तुमची जबाबदारी असल्यामुळं तुम्ही पुढाकार घेतला पाहीजे, असं भुजबळांनी या भेटीदरम्यान पवारांना सांगितलं. 

  • Breaking News LIVE Updates : पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु 

    पूजा खेडकरांच्या कुटुंबाचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध सुरु आहे. पूजा खेडकर यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याचं पुणे पोलिसांचं म्हणणं आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या खेडकर कुटुंबातील सात जणांचा शोध घेण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथकं तयार केलीत. पौड पोलिसांच्या मदतीने खेडकर कुटुंबाचा शोध घेतला जातोय. या सर्वांचे मोबाईल फोनही स्वीच ऑफ असल्याचं पोलीसांचं म्हणणंय. पुणे पोलिसांनी रविवारी खेडकर कुटुंबाच्या पुण्यातील बाणेर भागातील बंगल्यात जाऊन तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र बंगल्याचं गेट बंद असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी या बंगल्याचं चित्रीकरण केलं.

  • Breaking News LIVE Updates : छगन भुजबळ वेटिंगवर 

    शरद पवार यांची भेट घेण्यासाठी छगन भुजबळ सिल्वर ओक इथं पोहोचले खरे. मात्र शरद पवारांनी तिथं त्यांना वेटिंगवर ठेवल्याचं म्हटलं जात आहे. जवळपास अर्धा ते पाऊण तासापासून छगन भुजबळ वेटिंग वर... आता पुढे काय? 

  • Breaking News LIVE Updates : भुजबळ-पवार भेट सामाजिक, विकासाच्या मुद्द्यांवर असू शकते

    भुजबळ-पवार भेट सामाजिक, विकासाच्या मुद्द्यांवर असू शकते, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलंय. भुजबळ महायुतीतील महत्त्वाचे नेते आहेत. महायुती डॅमेज होईल असे भुजबळ निर्णय घेणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर भेटीचं कारण छगन भुजबळच सांगू शकतील, अशी प्रतिक्रिया मंत्री दादा भुसे यांनी दिली. 

  • Breaking News LIVE Updates : परदेशातून शेयर मार्केटमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक

    परदेशातून भारतातील नागरिकांना शेयर मार्केट ट्रेडिंगमध्ये जास्त नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडणाऱ्या सायबर चोरट्यास नवी मुंबई सायबर पोलीसांनी सुरत विमानतळवरून अटक केलेय. कौशिककुमार इटालिया असे या सायबर चोरट्याचे नवं असून तो मूळचा सुरत येथील रहिवाशी आहे. कौशिककुमार हा दुबईवरून भारतातील नागरिकांशी संवाद साधून त्यांना जास्त नफ्याचे आमिष दाखवून शेयर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडत होता. नवी मुंबईतील एका व्यक्तीला 1 कोटी 23 लाख रुपयांना गंडा घातल्याच्या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी आरोपी विरोधात लुकआऊट नोटीस काढली होती. याच दरम्यान आरोपी सुरत विमानतळावर आल्यावर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. नवी मुंबई सायबर पोलिसांनी सुरत विमानतळवरून आरोपी कौशिककुमारला अटक केली असून त्याचा देशभरातील 60 सायबर तक्रारीमध्ये सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर. 

  • Breaking News LIVE Updates : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला 

    राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी. छगन भुजबळ शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती असून, भुजबळ -पवार भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे. या भेटीत मराठा आरक्षण, ओबीरी आरक्षण की आणखी कोणत्या मुद्द्यावर होणार चर्चा? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

    बारामतीमधील महामेळाव्यात छगन भुजबळांनी नाव न घेता शरद पवारांवर आरोप केले. बारामतीतून फोन आला आणि विरोधकांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याचं भुजबळ म्हणाले. त्याला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी उत्तर दिलंय. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकार स्वत:च्या ट्रॅपमध्ये अडकलं असून आता त्यांना विरोधकांची आठवण येत असल्याचं म्हटलंय. तर सरकार बहुमतात असून निर्णय घेऊ शकतं असंही वडेट्टीवार म्हणालेत. 

  • Breaking News LIVE Updates : विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर

    विशाळगड परिसरात जाळपोळ , वाहनांची आणि घराची  तोडफोड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल. पुण्याचे रवींद्र पडवळ, बंडा साळोखे याच्यावर गुन्हा दाखल. संभाजी राजे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला गालबोट लावल्या प्रकरणी कोल्हापूर पोलीस ऍक्शन मोडवर. शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये 500 हून अधिक लोकाच्यावर गुन्हा दाखल. रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आल्याची माहिती. कलम  132,  189 ( 2), 190, 191 (2) , 191 (3),323, 298, 299 (49), 189 (5 ) यासह  पोलीस अधिनियम 37 (1) उल्लघन 135  या नुसार गुन्हा दाखल.

  • Breaking News LIVE Updates :  पूजा खेडकर परिवाराकडून पंकजा मुंडेसाठी देवीला मुकुट अर्पण 

    वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून नगर जिल्ह्यातील मोहटा देवीला दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करण्याचा नवस केला होता आणि त्यानुसार हा चांदीचा मुकुट 22 मार्च रोजी अर्पण करण्यात आला होता. पंकजा मुंडे यांच पक्षकडून पुनर्वसन व्हावं आणि त्यांना पद मिळावं अस साकडं खेडकर यांनी देवीला घातलं हाकत भाजप कडून पंकजा यांना राज्यसभे ऐवजी लोकसभेची उमेदवारी मिळाली तरी देखील खेडकर यांनी चांदीचा मुकुट देवीला अर्पण केला. नंतर काही दिवसांनी दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली.

  • Breaking News LIVE Updates :  अलिबाग पेण मार्गावर एसटीचा अपघात 

    अलिबाग पेण मार्गावर कार्लेखिंड इथं एस टी बसला अपघात झाला. अवघड वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी एका बाजूला बॅरीगेटवर कलंडली. बसमधील प्रवाशांना सुखरूप खाली उतरवून पोलीस व अन्य यंत्रणांच्या सहाय्याने गाडी सरळ करण्यात आली. ही बस अलिबाग हून पनवेलकडे निघाली होती. सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झाले नाही. या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू आहे.

  • Breaking News LIVE Updates : पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता

    वादाच्या भोवऱ्याच अडचलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता. पूजा खेडकर यांचं दिव्यंग आणि ओबीसी प्रमाणपत्र तपासलं जाण्याची शक्यता असून, त्यांचं दिव्यंग प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची ही होणार चौकशी. थेट पीएमओ कार्यालयाने घेतली दखल. 

  • Breaking News LIVE Updates : पुण्यात झिका रुग्णांची संख्या वाढली

    पुण्यात झिका रुग्णांची संख्या 23 वर; तर राज्यात 25 रुग्णांची नोंद. कोल्हापूर आणि संगमनेरमध्ये झिकाचं सावट आणखी गडद होताना दिसत असून, दोन्ही शहरात प्रत्येकी एक रुग्ण तर एकट्या पुणे जिल्ह्यात 23 रुग्ण आहेत. महिला, पुरुष आणि तरुणांचा रुग्णांमध्ये समावेश मात्र लहान मुलांना धोका नसल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये गर्भवती स्त्रियांना धोका कायम, बाळाचा मेंदू लहान होण्याची शक्यता आणि मुदतपूर्व प्रसूतीचीदेखील भीती असते असं सांगितलं जात आहे. 

     

  • Breaking News LIVE Updates : पुण्यात आता मुंबई प्रमाणे येणार डबल डेकर बस

    पीएमपी संचालकांच्या बैठकीत बस खरेदीस मान्यता मिळाल्यानंतर आता पुण्यात मुंबई प्रमाणे डबल डेकर बस येणार आहे. यासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून, पीएमपी आणखी 100 नवीन इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्यात 20 डबल डेकर बस असतील असं सांगण्यात येत आहे. 

  • Breaking News LIVE Updates : सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवाशी सुरू आहे खेळ

    राज्याच्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडत आहेत पुणे जिल्ह्यातही सध्या जोरदार पाऊस बरसत असून पुणे नाशिक महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असं म्हणण्याची वेळ सध्या आली आहे कारण पुणे नाशिक महामार्गावरील खेड बायपास घाट सुरू होऊन चार वर्ष झाली मात्र जो डोंगर फोडून हा बायपास घाट बनवला त्या डोंगराला कुठली संरक्षक भिंत किंवा जाळी मारलेली नाही त्यामुळे या परिसरात जर पावसाचा जोर आजून वाढला तर हा डोंगराचा तुटलेला भाग कधी हि खाली येऊन मोठी दुर्घटना होऊ शकते मात्र याकडे महामार्ग प्राधिकरणाने सर्रास दुर्लक्ष केलं आहे. 

  • Breaking News LIVE Updates : लोणावळ्यात मागील 24 तासांत 169 मिलीमीटर पावसाची नोंद

    लोणावळ्यात मागील 24 तासांत 169 मिलीमीटर पावसाची नोंदझाली आहे. लोणावळ्यात मुसळधार पाऊस दोन दिवसांपासून सुरु आहे, मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याचा आनंद घेण्याची जणू काही पर्वणी मिळाली आहे. मात्र या पावसामुळे लोणावळ्यातील अनेक धरणातील पाणलोट क्षेत्रात वाढ झाली असून टाटा धरण भरू लागले आहे. मागच्या आठवड्यात येथील पाणीसाठा खालावला होता.

  • Breaking News LIVE Updates : मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत  

    गोरखपूर एक्सप्रेसला ब्रेक लायनरला आग लागल्यामुळं कल्याण -मध्य रेल्वे विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्टेशन जवळील घटनेमुळं मध्य रेल्वेसेवा विस्कळीत. 

  • Breaking News LIVE Updates : राज्यात पावसाचे अलर्ट खालीलप्रमाणं लागू... 

    रत्नागिरी - रेड अलर्ट
    रायगड -  ऑरेंज अलर्ट 
    सिंधुदुर्ग - ऑरेंज अलर्ट 
    पुणे -  ऑरेंज अलर्ट 
    कोल्हापूर -  ऑरेंज अलर्ट 
    सातारा  - ऑरेंज अलर्ट 
    परभणी -  ऑरेंज अलर्ट 
    हिंगोली -  ऑरेंज अलर्ट 
    अमरावती -  ऑरेंज अलर्ट 
    वर्धा -  ऑरेंज अलर्ट 
    यवतमाळ -  ऑरेंज अलर्ट 
    मुंबई - यलो अलर्ट 
    ठाणे -  यलो अलर्ट

  • Breaking News LIVE Updates : कोकण रेल्वे अजूनही ठप्पच 

    अनेक तास उलटूनही कोकण रेल्वे अजूनही ठप्पच. रविवारी रात्रीपासून कोकण रेल्वे ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत. दिवाणखवटीत रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या मुंबईकडे जाणा-या आणि मुंबईहून येणा-या सर्व गाड्या रखडल्या आहेत. त्यामुळे तेजस, तुतारी, कोकणकन्या विविध स्थानकांवर थांबवण्यात आल्या आहेत. ट्रेन रखडल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरच झोपून रात्र काढण्याची वेळ आलीय. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link