Breaking News LIVE: राज्यात तुफान पाऊस; उद्या सकाळी 8.30 वाजेपर्यंत मुंबईला रेड अलर्ट

दक्षता ठसाळे-घोसाळकर Wed, 25 Sep 2024-8:29 pm,

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभातील सर्व घडामोडी एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर सर्वांचं लक्ष राहणार असून, विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर कोणते राजकीय बदल होतात हे पाहणंसुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Latest Updates

  • मुंबईत मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकल 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. 

  • मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील त्यांचं उपोषण स्थगित केले आहे. उपोषणाच्या नवव्या दिवशी त्यांनी स्थिगीतीची घोषणा केली आहे. पाणी पिऊन जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. 

  • बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी नेमण्यात आलेल्या CID पथकाने घेतली पुन्हा मुंब्रा पोलिसांची भेट घेतली आहे.  ठाण्यातील मुंब्रा बायपास मार्गावर घडलेली घटना मुंब्रा पोलीस स्थानकात नोंदवण्यात आली आहे .

  • मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित 

    नवव्या दिवशी उपोषण स्थगित 
    कोर्टाने उपचार घ्यायला सांगितलं - जरांगे 
    संध्याकाळी 5 वाजता अधिकृत घोषणा करणार 

     

  • मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित 

    मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित 
    नवव्या दिवशी उपोषण स्थगित 
    सलाईन लावून उपोषण करणं आवडत नाही 

     

  • जरांगेंची प्रकृती खालावली, उपोषणाचा 9 वा दिवस

     पृथ्वीराज चव्हाणांनी जरांगेंच्या प्रकृतीची चिंता 
    मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून गंभीर पावलं उचलावीत 
    जरागेंनी दिलेला शब्द मोडला 

  • स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या 91 वी जयंती निमित्त  माथाडी कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाज आणि माथाडी कामगार वर्गावर भाष्य केलं. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    *  आमच्या माथाडी कामगार करीता अण्णासाहेब यांनी संघर्ष केला 
    * या कामगारांच काय होईल, असा प्रश्न त्यांच्या मनात होता. त्यामुळे अण्णासाहेब यांनी लढा उभारला यामुळे कामगारांना कायदा मिळाला. 
     माथाडी कामगारांचे प्रश्न आम्ही  सोडवू , अण्णासाहेब पाटील यांनी मराठासाठी बलिदान दिले.  या समाजाला प्रतिनिधीत्व मिळालं पाहिजे , आर्थीक निकषावर मागास समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे.  यासाठी चळवळ अण्णासाहेब पाटील यांनी सुरू केली, अजून अनेक अडचणी आहेत , मी मुख्यमंत्री असे पर्यंत ते सर्वच्च  न्यायालयात पर्यंत टिकलं ,मात्र नंतर ते टिकलं नाही ,पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 10 टक्के आरक्षण दिले, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

    मराठा समाजाला आरक्षण  मिळायला हवे 

    आपण  मागच्या  काळात ,इतका मोठा समाज आहे. सगळ्याच कल्याण व्हावे यासाठी सारथीची निर्मिती केली, यातून मराठा समाजाचे तरुण अधिकारी बनले. 

  • संजय राऊतांची सरकारवर टीका 

    गृहमंत्री काश्मीर; लडाखला गेले नाहीत - राऊत 
    महाराष्ट्रात आढावा घेण्यासाठी आले - राऊत 
    राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न 
    अमित शाह यांचा मुलगा आला तरी स्वागताला जातील - राऊत 
    धोका कोणी कुणाल दिला हे महाराष्ट्राला माहित आहे - राऊत 

  • संजय राऊतांची सरकारवर टीका 

    गृहमंत्री काश्मीर; लडाखला गेले नाहीत - राऊत 
    महाराष्ट्रात आढावा घेण्यासाठी आले - राऊत 
    राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न 

  • कायद्यात बदल करा आणि भर चौकात एन्काऊंटर करा - वड्डेटीवार 

    - शिंदेचा खासदार श्रेय घेत आहे, बेकायदा एन्काऊंटर केला,कायदाने शिक्षा झाली पाहिजे...भाजप आणि संघ कार्यकर्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे, संस्था चालक घरी बसून आराम करत आहे, पोलीस सांगतात फरार आहे.

    - संस्था चालक RSS चे प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांना अटक झाली नाही कारवाई केली नाही, माझा दावा आहे ते घरी आहे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असून रडीचा डाव आहे. 

  • इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचा आज भाजप प्रवेश 

    प्रकाश आवाडे यांच्यासह चिरंजीव राहुल आवाडे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    काँग्रेसला रामराम करून अपक्ष निवडून आलेल्या आवाडे यांनी भाजपला दिला आहे पाठिंबा

    2019 साली भाजपच्या सुरेश हळवणकर यांचा पराभव करून निवडून आले प्रकाश आवाडे

    आवडे कुटुंबियांच्या भाजप प्रवेशामुळे सुरेश हळवणकर यांच्या भूमिकेकडे लक्ष

  •  चांदोली धरण 100 टक्के भरले

    सांगलीच्या शिराळा तालुक्यातला चांदोली धरण शंभर टक्के भरले आहे. 34.40 टीएमसी साठवून क्षमता असणाऱ्या धरणात 34.40 टीएमसी इतका पाणीसाठा निर्माण झाले आहे.गेल्या काही दिवसांपासून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी रिमझिम पाऊसाची हजेरी सुरू आहे. यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊन धरण आता फुल्ल झाले आहे. मात्र धरणातून पाण्याचा विसर्ग मात्र अद्याप बंद आहे. यंदा समाधानकारक असा पाऊस झाल्याने चांदोली धरण भरले आहे. त्यामुळे वारणा काठच्या पिण्याचा आणि शेतीच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

  • पावसामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक विस्कळीत 

    पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्या आणि लोकलही उशिराने धावत आहेत.पालघरमध्ये पहाटे पर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेवरची वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. वानगाव स्टेशन वर पहाटे ट्रॅक  पाण्याखाली गेला होता. तर पालघर इथेही काही काळ सिग्नल फेल झालं होते, तर केळवे परिसरातही पाणी ट्रॅक वर आलं होतं. सध्या पाऊस थांबला असून पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.  

  • मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा 9 वा दिवस 

    मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 9 वा दिवस आहे. काल रात्री जरांगेंची तब्बेत अधिकच खालावली होती.त्यांमुळे मराठा समाजाचा दबावामुळे अखेर जरांगेंना सलाईन लावलं. काल जरांगे यांची तब्बेत खालावल्यामुळे धुळे-सोलापूर आणि जालना-वडीगोदरी महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखून धरला.त्यामुळे आंदोलकांकडून आणखी अनुचित प्रकार घडू नये म्हणून जरांगे यांच्या भेटीसाठी आलेल्या समाजबांधवांनी अखेर त्यांना सलाईन लावण्यास भाग पाडलं आहे. दरम्यान वडीगोद्री इथे सुरू असलेल्या ओबीसीं आंदोलक मंगेश ससाणे यांच्या उपोषणाचा आज आठवा तर हाके यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे.

  • राज्यातील 40 हजार प्राथमिक शाळा बंद राहणार

    राज्यातील प्राथमिक शिक्षकांनी आज एक दिवसाचं सामूहिक रजा आंदोलन पुकारल आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 40 हजार प्राथमिक शाळा बंद राहणार आहेत. राज्यात सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केला आहे. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील 1 लाख 85 हजार विद्यार्थी आणि 29 हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्यात. या संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली मात्र कुठलाच ठोस निर्णय शासनाने घेतला नाही. त्यामुळे सर्व शिक्षक आंदोलनात उतरले आहे. 

  • अक्षय शिंदेचा मृतदेह ताब्यात घेण्याची शक्यता 

    बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृतदेह आज त्याचे कुटुंबिय ताब्यात घेण्याची शक्यता आहे. कळवा रुग्णालयात अक्षय शिंदेचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. आज सकाळी 11वाजता त्याचे नातेवाईक कळवा रुग्णालयात येणार आहेत.  सोमवारी तळोजा कारागृहातून बदलापूरकडे नेताना पोलिसांनी सेल्फ डिफेन्समध्ये अक्षय शिंदेचा एन्काऊंटर केला. हा एन्काऊंटर खोटा असल्याचं सांगत त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्या घेण्यास नकार दिला होता. मात्र आज ते कोणती भूमिका घेतात याकडे सा-यांच लक्ष लागलं आहे.

  • अक्षय शिंदेचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने 

    बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू अती रक्तस्त्रावाने झाल्याचं उघड झालं आहे.  अक्षय शिंदेच्या डोक्याला एक गोळी लागल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद केलं आहे. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांना सुपूर्द करण्यात आला.  सात तास शवविच्छेदन सुरू होतं. या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओग्राफी करण्यात आली आहे. पाच डॉक्टरच्या पॅनलने केलं शवविच्छेद

  • लवकरच जागावाटप जाहीर होईल - मुख्यमंत्री 

    मराठवाड्यातील 30 विधानसभा जागा जिंकणार असल्याचा विश्वास अमित शाहांनी दाखवला आहे. एवढंच नव्हे तर चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच लवकरच जागावाटप जाहीर होईल बैठकीनंतर शिंदे, फडणवीसांची माहिती. दिली आहे. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मराठवाड्यातील 30 जागा महायुती जिंकेल असा विश्वास अमित शाहांनी व्यक्त केला आहे. संभाजीनगरमध्ये काल अमित शाहांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक पार पडली या बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील जागावाटपावर चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार बैठकीत उपस्थित होते. तसेच 10 टक्के मतदान वाढवण्याच्या सूचनाही अमित शाहांनी बैठकीत दिला आहे. तर चर्चा सकारात्मक झाल्याचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून सांगण्यात आलं आहे. तर लोकसभेतील अनपेक्षित निकालानंतर नाराजीची तीव्रता आता कमी झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. 

     

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link