Breaking News LIVE Updates: परळी विधानसभा मतदार संघात तुतारीची ताकद वाढणार

Sat, 27 Jul 2024-7:04 pm,

Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील आजच्या ताज्या घडामोडींबरोबर देश विदेशातील ठळक घडामोडींचा आढावा

Breaking News LIVE Updates: राज्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. कोल्हापूर, सांगलीला अद्यापही पुराचा धोका कायम आहे. त्याचबरोबर, आज महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स या ब्लॉगमधून जाणून घ्या. 

Latest Updates

  • परळी विधानसभा मतदार संघात तुतारीची ताकद वाढणार

    ॲड माधव जाधव यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश

    घाटनांदूर चे मूळ रहिवासी असलेले प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.माधव जाधव हे आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला असून ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत.मराठा चेहरा आणि विधीत्न असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो. माधव जाधव यांच्या प्रवेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठा आव्हान मानले जाते

  • पॅरिस ऑलिम्पिक - मनु भाकर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत

    मनु भाकर 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये अंतिम फेरीत पोहोचली आहे. 
    मनुने सातत्यपूर्ण नेमबाजी करत पात्रता फेरीत तिसरे स्थान मिळवले.
    अव्वल 8 नेमबाज अंतिम लढतीसाठी पात्र होतात. भारताची दुसरी नेमबाज रिदम संगवान 15 व्या स्थानी राहिली. 
    मनुची अंतिम फेरी उद्या होईल.

     

  • खासदार उदयनराजे भोसले एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दिल्लीत

    निती आयोगाची बैठक संपवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल 

    मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सातारा लोकसभा खासदार उदयनराजे भोसले शिंदे यांच्या निवासस्थानी दाखल

  • नवी मुंबईत इमारत कोसळून 3 ठार, बचावकार्य थांबवलं

    नवी मुंबई - शहाबाज गावातील इमारत पडून तीन जणांचा मृत्यू, दोन जखमी 
    सर्वांना बाहेर काढल्याने बचावकार्य थांबवलं

  • बीड: राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्ता बैठकीला सुरवात

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शरदचंद्र पवार पक्षाचे अनेक कार्यकर्ते बैठकीला हजर 

    येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक कशी लढाईची यावर सुरू चर्चा 

    बीड जिल्ह्यातील सहा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढण्यासाठी तयारीच्या सूचना

    लोकसभेमध्ये मिळालेल्या यशानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची बीडमध्ये पहिलीच बैठक

  • ठाणे-पाकिस्तान प्रकरण

    ठाण्याहून पाकिस्तानला जाऊन तेथील तरुणाशी लग्न केलेल्या तरुणीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बनावट कागदपत्राच्या आधारे पाकिस्तानला गेलेल्या सनम खानला ठाणे न्यायलयाने सुनावली न्यायालयीन कोठडी 

    दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सनम खानची आता होणार ठाणे कारागृहात रवानगी 

    सनम खानसह तिला पाकिस्तानला जाण्यासाठी बनावट कागदपत्र बनवून देणाऱ्या जयवंत राठोड यालादेखील ठाणे न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

  • Breaking News LIVE Updates: मुसळधार पावसाचा फटका; राजापूर तालुक्यातील15 गावं पाच दिवसापासून अंधारात

    कोकणातील मुसळधार पावसाचा फटका कोकणातील ग्रामीण भागाला. राजापूर तालुक्यातील जामदा खोऱ्यातील 15 गावं पाच दिवसापासून अंधारात

  • Breaking News LIVE Updates:  रत्नागिरीमध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात करणारा डॉक्टर गजाआड

    बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला रत्नागिरीमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा सापळा रचून गजाआड करण्यात आले आहे. रत्नागिरी शहरातील टीआरपी या भागात असलेल्या साई हॉस्पिटलमधील डॉक्टर अनंत शिगवण याच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे.

  • केंद्रातील सरकार पडणार का? शरद पवार म्हणतात... 

    केंद्रतील सरकार पडणार की नाही मला माहित नाही, पण असे का म्हणतात. जोपर्यंत दोघे मोदीसोबत आहे तोपर्यंत सरकारला अडचण नाही. आधी सत्ता मोदींच्या हातात होती आता वाटेकरी आले आहे.

  • Breaking News LIVE Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार दिल्लीला रवाना; अमित शहांसोबत बैठक 

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कालच दिल्लीसाठी रवाना झाले होते. तर आज दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. आज अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

  • Breaking News LIVE Updates: पश्चिम रेल्वेच्या बोईसर येथे मालगाडीचे डबे घसरले

    पश्चिम रेल्वेच्या बोईसर रेल्वे स्थानकाजवळ  माल गाडीचे  चार डब्बे रुळावरून घसरले आहेत. मालगाडीचे मागच्या भागातून चार डब्बे रुळावरून घसरले असून सुदैवाने कुठलीही जिविहानी नाही.रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल. मालगाडीचे हे डब्बे घसरले असले तरीही पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम नाही.सर्व  रेल्वे सेवा सुरळीत आहे

  • Breaking News LIVE Updates: संसदेच्या अधिवेशनानंतर जागावाटपावर चर्चाः शरद पवार

  • Breaking News LIVE Updates: लोकसभेसारखा निकाल विधानसभेला लागला तर आम्हाला आनंदः शरद पवार

  • Breaking News LIVE Updates: ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या

    ममता बॅनर्जी नीती आयोगाच्या बैठकीतून बाहेर पडल्या आहेत. अर्धवट बैठक सोडून ममता बॅनर्जी निघाल्या आहेत. बैठकीत बोलू दिले नसल्याबाबत मनता बॅनर्जींची नाराजी व्यक्त केली आहे. पाच मिनिटेच बोलू दिले त्यानंतर थांबवण्यात आलं, असा आरोप त्यांनी केला आहे. 

  • Breaking News LIVE Updates:  मुंबई अहमदाबाद महामार्गांवर वाहतूक कोंडी; 8 ते 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

    मुंबई अहमदाबाद महामार्ग पुन्हा वाहतूक कोंडीत अडकला आहे. महामार्गांवर पडलेले खड्डे, विरुद्ध दिशेने येणारी वाहने व सुरू असलेल्या कामामुळे सकाळपासून गुजरात हून मुंबई दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांग लागल्या आहेत. घोडबंदरच्या फाउंटन हॉटेल पासून ते वसईपर्यंत असा एकूण ८ ते १० किलोमीटर पर्यंत अनेक वाहने कोंडीत अडकून पडली आहेत.

  • Breaking News LIVE Updates: समुद्राला मोठी भरती; किनाऱ्यावर कचऱ्याचे ढीग

    मुंबई समुद्राला मोठी भरती आहे आणि या भरतीनंतर मुंबईतल्या सर्वच समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येत आहे. दादर, माहीम चौपाट्यांवर हा कचरा जास्त दिसतो.या कचऱ्यामध्ये जास्तीत जास्त थर्माकोल प्लास्टिक याचाच भरणा आहे 

  • Breaking News LIVE Updates: कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती, बोटीतून लोकांना सोडलं जातं आहे

    कोल्हापुरात महापूर सदृश्य परिस्थिती आहे.. त्यामूळे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या वतीने ज्या गावाचा संपर्क तुटला आहे, त्या ठिकाणी बोटीतून लोकांना सोडलं जातं आहे.

  • Breaking News LIVE Updates: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली

    शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणा सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. ३ सप्टेंबर रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ही सुनावणी ३० जुलै रोजी होणार होती. त्याबाबत तारीखही अपडेट करण्यात आली होती. परंतु आता ही सुनावणी एक महिन्यांनी पुढे ढकलण्यात आल्यामुळे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी निर्णय होणार का याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे

  • Breaking News LIVE Updates: पश्चिम विदर्भाची भाजपची कोर कमिटीची बैठक

    मागील लोकसभेत पश्चिम विदर्भात भाजपाला बसलेल्या फटक्यानंतर भाजपची पश्चिम विदर्भातील संघटनात्मक बैठक अकोला येथे आज घेण्यात येत आहे. या बैठकीत अकोला शहर, अकोला ग्रामीण, अमरावती जिल्हा शहर व ग्रामीण, यवतमाळ जिल्हा शहर व पुसद जिल्हा तसेच वाशीम जिल्हा, बुलढाणा व खामगाव जिल्हा अशा नऊ संघटनात्मक कोर कमिटीतील पदाधिकाऱ्यांची बैठकीला उपस्थिती राहणार आहे.

  • Breaking News LIVE Updates: बाबाजानी दुर्राणींनी आज पुन्हा घेतली शरद पवारांची भेट

    आज संभाजीनगर येथील राष्ट्रवादी भवन मध्ये मी दोन वाजता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे. मला कोणत्याही प्रकारचा आश्वासन मिळालेलं नाही. विचारसरणीच्या आधारावर मी प्रवेश करत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने फक्त मतदारसंघात नाही तर पूर्ण राज्यात माझं स्वागत होईल, असं बाबाजानी दुर्राणी यांनी म्हटलं आहे.

  • Breaking News LIVE Updates: पुण्यात पावसाचा विक्रम; एकाच दिवसांत 114 मिलीमीटर पाऊस

    जुलै महिन्यात एकाच दिवसात म्हणजे 25 जुलै रोजी शहरात 114.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आजवर पडलेल्या एका दिवसातील हा तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे. याआधी 1958 मध्ये 130.4 मिली मीटर आणि 1967 मध्ये 117.9 मिलीमीटर पाऊस पडला होता.म्हणजे याच वर्षी दोनदा असा पाऊस झालाय. 9 जूनला पुण्यात 117.1 मिलिमीटर पाऊस झाला होता.

  • Breaking News LIVE Updates: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण

    विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. रक्ताचा नमुने तपासणीत विजय वडेट्टीवार याना डेंग्यूची लागण झाल्याचं निदान झालं आहे. काल प्रकृती बिघडल्यानं खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मुंबईवरून गुरुवारी संध्याकाळी आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी सर्व दौरे रद्द केले होते.

  • Breaking News LIVE Updates: कोयना धरणातून होणारा विसर्ग वाढणार, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना धरणातून होणारा विसर्ग वाढण्यात येणार आहे.सकाळी 9 वाजल्यापासून 40 हजार क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी धरणात येणारी पाण्याची आवक सुरूच  असल्याने विसर्ग वाढणार. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

  • Breaking News LIVE Updates: पुण्यातील भिडे पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू

    पुण्यामध्ये पाऊस थांबला असून त्याचप्रमाणे मुठा नदीला आलेला पूर देखील ओसरला आहे. त्यामुळे नदीतील भिडे पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पुरामुळे भिडे पुलासह महापालिकेतील जयवंतराव टिळक पूल पाण्याखाली गेला होता. या पुलांवरील तसेच नदीपात्रातील रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आहे.

  • Breaking News LIVE Updates: कृष्णा काठाला दिलासा; पाणी पातळीतील वाढ मंदावली

    सांगलीमध्ये कृष्णा नदीची झपाट्याने वाढणारी पाण्याची पातळी आता संथ गतीने वाढत आहे.तासाला फुटाने वाढणारी पातळी आता तासाला इंचाने वाढत असून गेल्या 12 तासात कृष्णेच्या पाणी पातळीत केवळ 7 इंचाने वाढ झाली आहे,त्यामुळे पाण्याची पातळी 39.7 फूट इतकी झाली आहे,इशारा पातळी ही 40 फूट आहे.यामुळे कृष्णा काठाला दिलासा मिळाला आहे.तर नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा काहीस जोर ओसरल्यामुळे पातळीत होणारी वाढ मंदावली आहे.

  • Breaking News LIVE Updates: नवी मुंबईत इमारत कोसळली; 2 जण अडकले

    नवी मुंबईतील शहाबाज गावात तीन मजली इमारत कोसळली आहे. आपत्ती व्यवस्थापन ,अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारती खाली 2  जण  अडकले असून एकाला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. बचावकार्य सुरू आहे. 

  • Breaking News LIVE Updates: कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंडियन आर्मीचे पथक दाखल

    सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा आणि वारणा नद्यांच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. सैन्य दलाची 90 जवानांसह दहा अधिकाऱ्यांची तुकडी आपल्या वाहनांच्या ताफ्यासह सांगली शहरामध्ये दाखल झाली आहे. कृष्णा पाणलोट क्षेत्रामध्ये पाडणारा पाऊस आणि कोयना धरणातला विसर्ग या पार्श्वभूमीवर पूर परिस्थिती उद्भवल्यास खबरदारी म्हणून पथकाला पाचारण करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Breaking News LIVE Updates: पंचगंगा नदीची पाणी पातळी तीन फुटांनी वाढली

    कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 24 तासात तब्बल 3 फुटांनी वाढली आहे. त्यामुळे नदी काठच्या सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत चालली असल्यामुळे नदी काठचे नागरीक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहेत. जिल्हयात अजूनही अतिवृष्टी सदृश पाऊस कोसळत असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आत्ता महापुराकडे सुरू झाली आहे.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link