Maharashtra Breaking News Today : काँग्रेसची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक, दुपारी 3 वाजता बैठक होणार
Maharashtra Breaking News Today: राज्यातील घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Breaking News Today: मुंबईसह राज्यात पावसाने धुमशान घातलं आहे. अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, रायगड जिल्ह्यातील काही भागात शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
Latest Updates
Maharashtra Breaking News Today : ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबळांना निमंत्रण
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने ओबीसी आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे नेते छगन भुजबळ यांना ई-मेलद्वारे निमंत्रण पाठवले आहे. ॲड. आंबेडकर यांनी याची माहिती त्यांच्या एक्स हॅंडलवर पोस्ट करुन दिली आहे. ओबीसी आरक्षण बचाव यात्रा २५ जुलैला चैत्यभूमी, मुंबई येथून सुरू होणार असून त्याच दिवशी पुण्यातील महात्मा फुले वाड्यालाही भेट देण्यात येणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे.
Maharashtra Breaking News Today : काँग्रेसची उद्या दिल्लीत महत्त्वाची बैठक, दुपारी 3 वाजता बैठक होणार
महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यासह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला महत्व आहे. संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यासोबत होणार बैठक
Maharashtra Breaking News Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांची भेट महत्वाची मानली जातेय. सह्याद्री अतिथी गृहावरील बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सागर बंगल्यावर जावून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. राजकीय दृष्ट्या ही भेट फार महत्वाची मानली जातेय.
Maharashtra Breaking News Today : मनोज जरांगेंची मागणी मुख्यमंत्र्यांकडून मान्य, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ
Maharashtra Breaking News Today : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगेंची मागणी मान्य केलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.. 2024-2025 या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे.. अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आलीय.. त्यामुळे कुणबी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.. अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यामुळे मोठा दिलासा मिळालाय.
Maharashtra Breaking News Today : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवली-ठाकुर्ली स्थानकादरम्यान एक्सप्रेसचे इंजिन पडलं बंद
लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या देखील यामुळे रखडल्या आहेत. विशेषतः कल्याण, अंबरनाथ बदलापूर ,कर्जत, कसारा या मार्गाकडे जाणाऱ्या लोकलवर याचा परिणाम झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहुन मऊ एक्सप्रेस निघाली होती. मात्र ती डोंबिवली आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान येतात तिचे इंजिन बंद पडले. त्यामुळे तिच्या मागोमाग अनेक लोकल उभ्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पुढे जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांनी लोकलमधून खाली उतरून ट्रक मधून चालणं पसंत केलं.
Maharashtra Breaking News Today : जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी
जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी निराशाजनक बातमी आली आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नाही, असं लेखी उत्तर केंद्र सरकारने दिलंय. जुन्या पेन्शन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? या प्रश्नांवर जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नाही, असं उत्तर दिलंय. गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत.
Maharashtra Breaking News Today : पुराचे पाणी थेट शेतात शिरलंय
यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील मोझर इजारा गावालगतचा नाला फुटलाय.... त्यामुळे पुराचे पाणी थेट शेतात शिरलंय... यावेळी पाण्याच्या वेगाने शेतातील पिकं आणि जमीन खरडून निघालीये..... अनेक शेतांना तळ्याचं स्वरूप आलंय...प्रशासनाने ताबडतोब भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केलीये...
Maharashtra Breaking News Today : साता-यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस
साता-यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात मुसळधार पाउस पडतोय. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झालीय. गेल्या 24 तासांत धरणात 6 टीएमसी पाणीसाठा वाढलाय. धरणात 69 हजार 519 क्युसेक येवढ्या वेगाने पाण्याची आवक सुरूये.
Maharashtra Breaking News Today : सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुंवाधर पाऊस
सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुंवाधर पाऊस पडतोय. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात या ठिकाणी तब्बल 148 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Breaking News Today : कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली
पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडलीय. 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. पंचगंगेची आता धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरुय. त्यामुळे कोल्हापूर प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. संध्याकाळपर्यंत पंचगंगा नदीची पाणी पातळी आणखी एक ते दीड फुटाने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Breaking News Today : भंडारा जिल्ह्यात पुरानं हाहाकार
भंडारा जिल्ह्यात पुरानं हाहाकार माजवलाय. ओपारा गावाला पुराचा सर्वाधिक फटका बसलाय. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं संपूर्ण गावात पाणी शिरलंय. जवळपास 300हून जास्त घरांमध्ये पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर पडलेत. नागरिकांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली. पुरात वाहून जाणा-या एकाला वाचवण्यात बचाव पथकाला यश आलंय. दरम्यान सध्या पूरग्रस्त नागरिकांना शासकीय गोदामात स्थलांतरित करण्याच्या सूचना तालुका प्रशासनानं दिल्यात.
Maharashtra Breaking News Today : चंद्रपुरात पावसामुळे नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे उमा नदीच्या पुराने काठावरील शेतीचे मोठे नुकसान केले आहे. पात्र सोडून पुराचे पाणी शेतात शिरले. मूल शहराच्या वेशीपर्यंत हे पाणी पसरले.
Maharashtra Breaking News Today : मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना, ऑडी कारची 2 रिक्षांना धडक
मुंबईतील मुलुंडमध्ये हिट अँड रनची घटना समोर आलीय. ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिलीय. या घटनेनंतर ऑडी कार चालक फरार झालाय. या घटनेत रिक्षा चालक आणि दोन प्रवासी जखमी झालेयत. रिक्षा चालकाची प्रकृती गंभीर सांगण्यात आली आहे. अपघातात रिक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. तर मुलुंड पोलिसांनी गाडी ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केलाय.
Maharashtra Breaking News Today : नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर
नवी मुंबईत पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांत शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दुपारी बारापासून भरती असल्यामुळे पाणी भरण्याची शक्यता असलेल्या परिसरातील शाळांमधील सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना अकरा वाजता शाळेतून सोडण्यात येणार.तर दुपार सत्रातील शाळांना सुट्टी देण्यात येणारेय.
Maharashtra Breaking News Today : सांगली - कृष्णा, वारणेच्या पाणीपातळीत वाढ
सांगलीमध्ये पडणा-या संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्यानं वाढ झालीय.वारणा नदीकाठी पूर सदृश परिस्थिती निर्माण झालीय. तर शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये ढगफुटी झाली. त्यामुळे चांदोली धरण 78 टक्के भरलंय. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत एका दिवसात तब्बल 6 फुटानं वाढ होऊन याची सांगलीतली पाण्याची पातळी 24 फुटांवर पोहोचलीय.
Maharashtra Breaking News Today : मुंबईत पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, तिन्ही मार्गावरील लोकल ट्रेन उशीरानं, रस्ते वाहतूकही मंदावली
कल्याण-डोंबिवलीत पहाटेपासून जोरदार पाऊस सुरुय. त्यामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झालीय. कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलंय. कल्याण स्टेशन रोडही पाण्याखाली गेलाय. कपोते वाहन तळ ते कल्याण स्पेशन रोडवर गुडघाभर पाणी साचलंय. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालीय. पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांची तारांबळ उडतेय. पावसाचा जोर अजूनही कल्याण डोंबिवली भागात कायम आहे.
Maharashtra Breaking News Today : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतील शाळा कॉलेज आज बंद
अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीतील शाळा कॉलेज आज बंद असणार आहे. तर रायगडमधील महाड, पोलादपूर, माणगाव, कर्जत या तालुक्यातील शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra Breaking News Today : फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल
फडणवीसांच्या ठोकून काढा या विधानावर राऊतांनी हल्लाबोल चढवलाय...ठोकून काढा म्हणजे काय...? गृहमंत्री गुंडांची भाषा वापरतायत....गृहमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठोकशाहीची भाषा करून दाखवा...आणि दम असेल तर ईडी, सीबीआय बाजूला ठेवून मैदानात या असं आव्हान राऊतांनी दिलंय...कालच फडणवीसांना कार्यकर्त्यांना कानमंत्र देताना विरोधकांना उत्तर देताना आदेशाची वाट पाहू नका...मैदानात उतरून ठोकून काढा असा आदेश दिला...त्यावरून राऊतांनी समाचार घेतलाय...
Maharashtra Breaking News Today: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये वाढ
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये आतापर्यंत 47.39 टक्केपाणीसाठा. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. सगळ्यात कमी पाणीसाठा अप्पर वैतरणा धरणात आहे.तर तुळसी धारण ओसंडून वाहत आहे
Maharashtra Breaking News Today: फडणवीसांचा नागपुरात पराभव करणारच: संजय राऊत
विधानसभेत आम्ही 185 जागा जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर, देवेंद्र फडणवीसांचा नागपुरात पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत.
Maharashtra Breaking News Today: चांदोलीत ढग फुटी; 24 तासात 148 मिलिमीटर पावसाची नोंद
सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये धुंवाधर असा पाऊस पडत आहे,चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात तर अतिवृष्टी कायम आहे. गेल्या 24 तासात या ठिकाणी तब्बल 148 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra Breaking News Today: मध्य रेल्वे विस्कळीत; कल्याण स्थानकात प्रवाशांची गर्दी
सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वे विस्कळीत. कल्याण स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी
Maharashtra Breaking News Today: पवना धरणात 45 टक्के पाणीसाठा
लोणावळ्यातील मुसळधार पावसाने घाटमाथ्यावरील पावसाच्या पाण्याने लोणावळ्यासह पवना धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, आठवड्यापासून मावळ तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे.
Maharashtra Breaking News Today: लोणावळ्यात मागील 24 तासांत 151 मिलीमीटर पावसाची नोंद
लोणावळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विकेंड ला लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची चांगलीच संधी मिळाली.
Maharashtra Breaking News Today: भंडारा जिल्हात रेड अलर्ट; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून रस्ते आणि सखल भागात साचले असून नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे. याच दरम्यान हवामान खात्याने भंडारा जिल्हात रेड अलर्ट जाहीर केले असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळा,महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Breaking News Today: मुंबईत मुसळधार पावसाला सुरूवात, लोकलची वाहतूक मंदावली
मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची संतधार. मध्यरात्री विश्रांती घेतलेल्यानंतर पहाटेपासून पावसाची रिमझिम सुरु आहे. लोकल या काही मिनिटांनी उशिराने धावत आहेत
Maharashtra Breaking News Today: कल्याणमध्ये जोरदार पावसाला सुरुवात
कल्याण डोंबिवली परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराचज चौकात पाणी साचायला सुरवात झाली आहे.
Maharashtra Breaking News Today: शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
आज दुपारी ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. मराठा obc आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भेट घेणार असल्याचे कळतंय. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, माढा लोकसभा मतदार संघ पाणी प्रश्न, बारामती त्यांनी तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी,आणि निधीवर, गुंजवणी पाणी प्रश्नासाठी मागे वेळ मागितली होती. त्यादृष्टीने आजची बैठक असण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Today: कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल
कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात जोरादर पाऊस सुरूच आहे. त्यामुळे पंचगंगा नदीसह वारणा, कृष्णा, भोगावती, वेदगंगा, दूधगंगा ,घटप्रभा ,कासारी आदी नद्यांचे पाणी पात्र बाहेर पडले आहेत. तर पंचगंगेची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू आहे
Maharashtra Breaking News Today: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा तिसरा दिवस
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा समाजाच्या ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसह ईतर मागण्यांसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केलं आहे.आज जरांगे यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून त्यांची प्रकृती खालावत चालली आहे.