Maharashtra Breaking News Today LIVE Updates : संभाजीनगरमध्ये एका तरुणाची NIA कडून चौकशी

Diksha Patil Thu, 12 Dec 2024-5:13 pm,

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महाराष्ट्रात आजच्या दिवसभरात नेमकं काय घडतंय हे थोडक्यात एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates :  राज्य-देशभरातील बातम्या आणि घडामोडींचा आढावा ब्लॉगच्या माध्यामातून जाणून घेऊया. 

Latest Updates

  • संभाजीनगरमध्ये एका तरुणाची NIA कडून चौकशी

    संभाजीनगरमधून एकाला NIA नं चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दिल्लीत NIA नं ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणाजवळून 3 मोबाईलदेखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे. NIA पथकाकडून तरुणाची रात्रीपासून चौकशी सुरु आहे.

  • रत्नागिरीत 30 ते 40 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना जळजळ 

    रत्नागिरीमधील जयगड माध्यमिक विद्यालयातील अंदाजे 30 ते 40 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांना जळजळ आणि मळमळणे असा त्रास जाणवू लागलाय. जयगडजवळच्या एका कंपनीच्या टँक क्लीनिंगचे काम सुरू असताना काही घटकद्रव्य बाहेर पडल्याने विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास झालाय..त्यामुळे पुढील उपचारासाठी या सर्व मुलांना जिल्हा शासकीय रुग्णालय उपचारासाठी हलवण्यात आलं आहे..मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलांना कोणताही धोका नाहीये. 

  • सीरियातून 75 भारतीय नागरिकांचं एअरलिफ्ट

    सीरियातून 75 भारतीय नागरिकांना एअरलिफ्ट करण्यात आलंय.. सीरियात सत्तापालट झाल्यानंतर भारतीय दूतावासानं तातडीनं सीरियात अडकलेल्या 75 भारतीयांना बाहेर काढलं. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सर्वजण लेबनॉनला पोहोचले असून 
    त्यांना व्यावसायिक विमानाने मायदेशात आणले जाणार आहे.

  • पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांना भेटीसाठी सोमवारची वेळ 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने भेटीसाठी गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांना भेटीसाठी सोमवारची वेळ देण्यात आली. उद्धव ठाकरे गटाच्या खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत भेटायला गेले होते. मात्र नंतर त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली आहे  
    प्रियांका चतुर्वेदी आणि अन्य खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी गेले होते.

  • साताऱ्यात हॉटेलमध्ये रेव्ह पार्टीनंतर धिंगाणा

    साता-याच्या कास भागातील हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी. पार्टीत बारबाला नाचवल्याचा आरोप.. दारून पिऊन धिंगाणा घातल्याचा व्हिडीओ व्हायरल...

  • संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानावर होणार चर्चा

    संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या आठवड्यात संविधानावर चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. संविधानाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त लोकसभेत झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या अध्यक्षांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती, ज्यामध्ये सर्व पक्षांनी संविधानावर चर्चा करण्याचे मान्य केले होते.

  • सतीश वाघ खून प्रकरणी आरोपींना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी

    सतीश वाघ अपहरण आणि खून प्रकरणी आरोपींना 20 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सतीश वाघ हे भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत. पाच लाखांची सुपारी देऊन त्यांचा खून करण्यात आला होता. भाडेकरूनेच हा कट रचला आणि गुन्हा घडवून आणल्याची माहिती समोर येत आहे.

  • मुख्यमंत्र्यांची घोषणा लाडक्या बहिणींना आता मिळणार 2100

    निवडणूकीनंतर महिलांना 2100 रुपये मिळणार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत लाडकी बहीण योजना. महिलांना नोंदणी करण्याचं अरविंद केजरीवाल यांचं आवाहन. 

  • मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांचा फोन 

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले होते. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शपथविधीच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून केले होते फडणवीसांटेअभिनंदन, सूत्रांची माहिती. 

    शपथविधी पूर्वी फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांना दिलं निमंत्रण होतं. 

    शपथविधी सोहळ्याला गैरहजर असले तरी ठाकरेंनी फडणवीस यांना फोन करून दिल्या शुभेच्छा.

  • स्मार्ट मीटर बसवणं म्हणजे लोकांना लुटण्याचं काम - अनिल परब

    आज अदानी इलेक्ट्रिसिटी संदर्भात अनेक तक्रारी ग्राहकांकडून मिळाल्याचं सांगत अनिल परब म्हणाले, 'त्या सगळ्या संदर्भात आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत.  स्मार्ट मीटर लावण्याचं काम अदानी इलेक्ट्रिसिटीकडून केले जात आहे आणि हे स्मार्ट मीटर म्हणजे लोकांना लुटण्याचं काम आहे. याबाबत आम्ही व्यवस्थापनाला बोलायला आलो आहोत.  वाढीव वीज बिल हा सुद्धा मुद्दा आहे. या सगळ्या मुद्दयांवर आम्ही एकत्रित चर्चा करणार आहोत.' 

  • खातेवाटपात भाजपची सरशी; शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

    खातेवाटपात भाजपची सरशी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    गृह आणि अर्थ खाते भाजपकडेच राहणार?

    शिंदेंना गृह खाते देण्यास भाजपचा स्पष्ट नकार

    राष्ट्रवादीचे अर्थ खातेही भाजप स्वतःकडेच ठेवणार?

    विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

    महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राजधानी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस काल दिल्लीला रवाना झाले असून त्यांनी या दौऱ्यात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे.

  • देशातील 19 ठिकाणी NIA ची छापेमारी

    राष्ट्रीय तपास संस्था (NIA) जैश-ए-मोहम्मदशी संबंधित व्यक्तींचे कट्टरपंथीकरण आणि दहशतवादी प्रचार प्रसाराशी संबंधित असलेल्या प्रकरणात जम्मू आणि काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, यूपी आणि गुजरातमधील एकूण 19 ठिकाणी शोध घेत आहे. 

  • सर्वभाविकांसाठी आनंदाची बातमी आहे... 

    आजपासून साईंच्या शिर्डीत भाविकांना हार, फुल आणि प्रसाद नेता येणार आहे. तर आंगणेवाडी यात्रेची 22 फ्रेब्रुवारीला कोकणात भराडीदेवीची यात्रा भरणार आहे. त्याशिवाय तुळजाभवानी मंदिराचा होणार कायापालट, तुळजाभवानी मंदिराला पुरातन झळाळी येणार आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू  झालंय.

     

  • शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्तानं अजित पवार भेटीला

    शरद पवारांचा आज 85 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं अजित पवार शरद पवारांच्या भेटीला दिल्लीतील घरी गेले. सुनेत्रा पवार, सुनील तटकरेही पवारांच्या भेटीला. दिल्लीत काका-पुतण्याच्या मनोमिलनाचा नवा अध्याय. 

  • पवनचक्कीच्या कंपनीकडे मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

    पवनचक्कीच्या कंपनीकडे खंडणी मागितल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय. केज तालुक्यातील मस्साजोग परिसरात आवादा कंपनीचा पवनचक्कीचा प्रोजेक्ट आहे. या कंपनीतील शिंदे नामक अधिकाऱ्याने केज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून कंपनीकडे तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी वाल्मीक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांनी मागितल्याचा उल्लेख आहे. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

     

  • विदर्भात थंडीचा जोर  कायम 

    विदर्भात सर्वात कमी तापमान नागपूर, गोंदिया येथे 9.8 अंश सेल्सिअस 

    गोंदिया 9.8
    नागपूर -9.8
    वर्धा -10.5
    गडचिरोली- 10.8
    अकोला 12.5
    अमरावती 11.4
    भंडारा 13.0
    बुलडाणा 13.0
    चंद्रपूर 11.8

  • कुर्ला बस अपघात प्रकरणाचा अहवाल अद्यापही प्रतिक्षेत

    कुर्ला बस अपघात प्रकरणावर 5 सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. ही समिती घटनेची माहिती आणि तपास करुन अहवाल सादर करेल. सध्या बेस्ट बस चालक पोलिसांच्या ताब्यात आहे. दरम्यान, घटनेला 3 दिवस उलटल्यानंतरही अहवालाची प्रतीक्षा आहे. पुढील 10 दिवसांत अहवाल सादर केला जाण्याची शक्यता

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link