Breaking News LIVE UPDATES : `हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे` राहुल गांधी यांना म्हणायला सांगा, मोदींचा ठाकरेंवर हल्लाबोल
Breaking News LIVE UPDATES : राज्याच्या राजकारणापासून समाजकारणापर्यंत, कोणत्या क्षेत्रात नेमकं काय सुरुय? पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट एका क्लिकवर
Breaking News LIVE UPDATES : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर महाराष्ट्रात केंद्रीय चेहऱ्यांची उपस्थिती पाहायला मिळत असून, खुद्द पंतप्रधान मोदी मुंबई आणि नवी मुंबईत सभा घेणार आहेत. आजचा दिवस सभांचा आणि नेमका आणखी कोणत्या घडामोडींचा असेल? पाहा Live Updates...
Latest Updates
'एक है तो सेफ है', मोदींकडून पुनरुच्चार
मुंबईला तोडण्याची महाविकास आघाडीची भाषा तर मुंबईला जोडण्याची महायुतीची भाषा आहे. काँग्रेस मुंबईला कधी पुढे घेऊन जाऊ शकत नाही. महाविकास आघाडी जातीच्या नावावर लोकांना लढवत आहेत. काँग्रेस काळात मुंबईच्या विकासासाठी कोणतच काम झालं नाही. काँग्रेसनं अटल सेतूचा मेट्रोचा विरोध केला होता. बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हाती रिमोट दिला. हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असं राहुल गांधी यांना म्हणायला सांगा. असं म्हणत प्रंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींमुळे महाराष्ट्र एक नंबरवर : एकनाथ शिंदे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला एक नंबरवर आणलं आहे. मोदींनी राज्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला आहे. असं एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदींमुळे मुंबईचा चेहरा बदलला : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मुंबईचा चेहरा बदलला आहे. 22 किलोमीटरचा अटल शेतू महामार्गामुळे मुंबई आणि नवी मुंबई जोडली गेली आहे. मोदींनी मुंबईमध्ये अनेक विकासकामे केली आहेत. असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांमध्ये राडा
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार उन्मेष पाटील यांचे कार्यकर्ते आणि महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. गावातून प्रचार सुरू असताना उमेश पाटील यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते आणि मंगेश चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची.
17 नोव्हेंबरच्या शिवाजी पार्कवरील सभेचा सस्पेन्स कायम, मनसेला अद्यापही परवानगीची प्रतीक्षा
17 नोव्हेंबरच्या सभेला मनसेला शिवाजी पार्कवर मिळणारी परवानगी लांबणीवर, शासन स्तरावर निर्णय अद्यापही प्रलंबित.नगर विकास विभागाचा शिवाजी पार्कमध्ये सभा घेण्यासाठी मनसेला अद्याप हिरवा कंदील नाही. 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटांनी केला होता अर्ज.
रश्मि शुक्ला प्रकरणी काँग्रेसची उच्च न्यायालयात धाव
कॉंग्रेस पक्षाच्यावतीने रश्मि शुक्ला यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. रश्मि शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून कॉंग्रेसने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सध्या रश्मि शुक्ला यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.
महायुतीत जाण्यावरुन नाशिकमध्ये दादांचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंसोबतच महायुतीमध्ये जाणार होतो. आमच्या सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांनी ठरवलं होतं. महायुतीत जाण्यावरुन नाशिकमध्ये दादांचा मोठा गौप्यस्फोट.
सांगलीतील बेडगमध्ये पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणी
भाजपाच्या स्टार प्रचारक पंकजा मुंडे यांच्या बॅगची तपासणी करण्यात आली. सांगलीतील बेडगमध्ये पंकजा मुंडे हेलिकॉप्टरमधून दाखल होताच निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बॅगची तपासणी केली. सुरेश खाडे यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे सांगलीमध्ये आल्या होत्या.
सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना 3 हजार देणार : नाना पटोले
बंडखोरांचा प्रचार करणाऱ्यांवर कारवाई करू असं सूचक विधान नाना पटोलेंनी केलं आहे. नागपुरात काँग्रेसचे काही नेते बंडखोरांचा प्रचार करताहेत त्यावरून नाना पटोलेंनी त्यांना हा इशारा दिलाय. लाडक्या बहिणींना मविआचं सरकार आल्यावर 3 हजार देणार असल्याचंही नाना पटोले म्हणाले. यावेळी पटोलेंनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. तसेच विदर्भात मविआचा स्ट्राईक रेट 90 टक्के असणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
संविधानाचा अपमान म्हणजे राष्ट्रपुरुषांचा अपमान... राहुल गांधींकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार
नंदुरबार येथील जाहीर सभेदरम्यान काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हाती संविधान घेत उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणाही साधला. 'संविधान रिकामे नाही, यात बिरसा मुंडा, बुद्धाचा विचार, आंबेडकरांचे आणि गांधींचे विचार आहेत. या संविधानात देशाची आत्मा आहे, जेव्हा मोदी संविधानाचा अपमान करतात तेव्हा राष्ट्र पुरुषांचा अपमान केला जातो', असं ते म्हणाले. संविधानात मागास समाजाला आदिवासी संबोधिले जाते, पण भाजप- मोदी आपल्याला वनवासी म्हणतात. आदिवासी आणि वनवासी यात फरक आहे, आदिवासी म्हणजे देशाचे पहिले मालक, पहिले नागरिक आहेत, या शब्दांत त्यांनी भाजपच्या भूमिकेवर सडकून टीका केली.
डोंबिवलीत भाजप कार्यालयाची तोडफोड
डोंबिवली पश्चिमेतील गृहरातील सेल पदाधिअरी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयाची तोडफोड. तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी अचानक येत शिवीगाळ करत मारहाण करून केली तोडफोड. तोडफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. या डोंबिवली विधानसभेत भाजप कॅबिनेट मंत्री आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांच्यात लढत आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याही बॅगांची तपासणी
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रचारासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आले होते . आज ते पुण्याला जाताना त्यांच्या बॅगांची तपासणी कराड विमानतळावर करण्यात आली. कराड विमानतळावर सर्वच राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती विमानतळाचे व्यवस्थापक कृणाल देसाई यांनी दिली.
पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांनी घडवलेल्या देशाला मोदींनी 10 वर्षात मागे नेलं...
भाजपा हा जाहिरात बजरंग चालणारा पक्ष आहे 2014 मध्ये अशाच पद्धतीचे जाहिराती करून त्यांनी यश संपादन केले होते. मोदींनी मागील दहा वर्षात असं काही केलेले नाही की त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणतील. आम्हाला तरी तसे देशात काहीच दिसले नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर नाराजीचा सूर आळवला. 'जो देश पंडित नेहरू इंदिरा गांधी यांनी घडविला त्या देशाला मोदींनी मागील दहा वर्षात मागे नेले, मोदिंनी मागील दहा वर्षात काय केलं याची उजळणी करण्याची संधी जर आम्हाला दिली तर बर होईल', असाही सूर त्यांनी आळवला.
लाडकी बहिणसारख्या योजनांबद्दल नितीन गडकरी काय म्हणाले?
लाडकी बहिणसारख्या योजनांबद्दल नितीन गडकरींनी झी 24 तासच्या टू द पॉईंटमधील मुलाखतीत स्पष्ट भूमिका मांडलीय. फ्रीबीजच्या मुद्दयावर बोलताना गडकरींना अशा योजनांची घोषणा करण्यात सत्ताधारी किंवा विरोधक दोघेही याला अपवाद नाहीत असं म्हणाले. शिवाय सर्वच पक्ष निवडणूक जिंकण्याचा आधी विचार करतात त्यातून नवनव्या योजनांची घोषणा करतात. परंतु अशा योजनांना कसा प्रतिसाद द्यायचा हे लोकांच्या हातात असतं असं गडकरींना झी 24 तासच्या टू द पॉईंटच्या मुलाखतीत सांगितलंय.
ठाणे, रायगडमधील महायुती उमेदवारांसाठी मोदींची खारघरमध्ये सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी मुंबईतील खारघर येथे जाहीर सभा होणार आहे. नवी मुंबई, रायगड आणि ठाणे शहर या भागातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होत असल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून या जाहीर सभेला 50 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात येत असून सुरक्षिततेच्या दृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
कोल्हापुरात पुन्हा एकदा महाडिक विरुद्ध पाटील...
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाडिक विरुद्ध पाटील अशी परंपरागत लढत पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. जिल्हात अनेक विधानसभा मतदारसंघात तुल्याबळ लढती पाहायला मिळत आहे. त्या पैकीच एक कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील आणि भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्यामध्ये दुरंगी लढत पाहायला मिळत आहे. या दोघांनीही जनतेचा विश्वास आपण संपादित करू आणि विजय खेचून आणू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केलाय.
मोबाईल नेटवर्क नसलेल्या मतदान केंद्रावर दिसणार निरोप्या
मोबाईल नेटवर्क नसलेल्या मतदान केंद्रावर निरोप्याची नियुक्ती. पुणे जिल्ह्यातील 38 मतदान केंद्रावर 76 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नेटवर्क नसलेल्या मतदान केंद्रावरची माहिती मिळवण्यासाठी कर्मचारी निरोप घेऊन नेटवर्क असणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील तीन मतदान केंद्रावर ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यात अशी सर्वाधिक गावं आहेत. मतदान केंद्रावरील कर्मचारी काही माहिती असेल तर तो नेटवर्क असलेल्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना सांगणार असं त्यांच्या कामाचं स्वरुप असेल.
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा अपघात
काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या वाहनाचा काल रात्री ऑटोमोटीव्ह चौकावर अपघात झाला. नितीन राऊत प्रचार संपून त्यांच्या घराकडे जात असताना एका ट्रकने त्यांच्या चारचाकी वाहनाला मागून धडक दिली. या धडकेमुळे कारमध्ये बसलेले नितीन राऊत आणि इतर सहकाऱ्यांना जोरदार धक्का बसला. मात्र कोणीही जखमी झाले नाही, नितीन राऊत हेही या अपघातातून पूर्णपणे सुखरूप आहेत. राऊत यांच्या सहकाऱ्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.
राज ठाकरेंच्या सभा रद्द
राज ठाकरे यांच्या आजच्या बीड जिल्ह्यातील दोन्हीं प्रचार सभा रद्द. तांत्रिक कारणामुळे सभा रद्द. गेवराई आणि केज मध्ये होणार होत्या दोन्ही सभा. पुण्यातील संध्याकाळच्या दोन्ही सभा मात्र पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होणार. दरम्यान, हडपसर आणि वडगाव बुद्रुक सिंहगड रस्ता, पुणे या ठिकाणी होणार सायंकाळी दोन प्रचार सभा.
महाविकास आघाडीच्या पुण्यात आज दोन सभा
महाविकास आघाडीच्या पुण्यात आज दोन सभा होणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके आणि पुणे कँटोमेंटमध्य रमेश बागवे यांच्यासाठी या सभा होणार आहेत. 2019मध्ये खडकवासला मतदारसंघात सचिन दोडके यांचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यामुळे खडकवासला मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी शरद पवार स्वत: मैदानात उतलेत.
आज मोदींच्या तीन सभा
राज्यात आज मोदींच्या तीन जाहीर सभा पार पडणार आहे. मोदींची आज दुपारी 12 वाजता संभाजीनगरमधील चिखलठाण्यातील एमआयडीसीत जाहीर सभा पार पडणार आहे. तर दुपारी 4 वाजता नरेंद्र मोदी यांची खारघर येथे सभा होणार आहे तर संध्याकाळी 6 वाजता मोदींची शिवाजी पार्कात जाहीर सभा पार पडणार आहे. त्यांच्या सभेसाठी मुंबईतील शिवाजी पार्कात जय्यत तयारी करण्यात आलीय.
84 काय वय आहे का? शरद पवारांनी केलेल्या विधानाचीच चर्चा
84 काय वय आहे का? माझं आणखी 16 वं जायचं आहे, असं मिश्किल विधान शरद पवारांनी केलंय. पिंपरीतल्या सभेत शरद पवारांच्या वयाचा उल्लेख झाला. त्यानंतर त्यांनी आपण थकलो नाही तर तरुण आहोत, असं म्हटलंय. दरम्यान, माझं वय झालं नाही, मी अजूनही खूप वर्ष काम करू शकतो असं विधान बारामतीत अजित पवारांनी केलं होतं.
संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा...
हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघात उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार डॉ. संतोष टारफे यांचा प्रचार करण्यासाठी वाकोडी भागात गेलेल्या कार्यकत्याला महायुतीचे उमेदवार संतोष बांगर यांच्या कार्यकर्त्यांनी गाडी आडवत मारहाण करीत गाडीच्या काचा आणि कार्यकर्त्यांच्या मोबाईलची तोडफोड केली होती. त्या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला होता, कळमनुरी पोलीस स्टेशनमध्ये ठाकरे गटाने ठिय्या आंदोलन करीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. त्यांनतर मारहाण झालेल्या नितीन डुकरे या कार्यकर्त्याच्या फिर्यादीवरून आमदार संतोष बांगर यांच्या दहा कार्यकर्त्यावर मारहाण आणि गाड्यांची तोडफोड करून मोबाईल फोडल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.