Maharashtra Breaking News LIVE Update : नातं जपायला ताकद लागते नाती तोडायला नाही, सुप्रिया सुळेंनी वळसेपाटलांना सुनावले
Maharashtra Breaking News LIVE Update :विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. त्यामुळे एका क्लिकवर पाहा सर्व महत्त्वाच्या अपडेट
Maharashtra Breaking News Live Update : विधानसभा निवडणुकी जवळ आली असून सगळ्यांचं त्याकडेच लक्ष लागलं आहे. या निमित्तानं महाराष्ट्रात अनेक केंद्रीय मंत्री पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसभरात काय काय घडतंय हे जाणून घेऊया? या लाईव्ह अपडेटमध्ये
Latest Updates
महाविकास आघाडीमधील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार शरद पवारांनी जाहीर करावा, असं विधान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी झी २४ तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत केलंय.. शरद पवारांनी त्यांच्या मनातील नावं सांगावं.. असंही उद्धव ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत म्हटलंय...
सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.
मनसे नव्हे गुनसे झाल्याचं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉईंट या मुलाखतीत मनसेवर उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांना मदत केली आहे.
नातं जपायला ताकद लागते नाती तोडायला नाही, सुप्रिया सुळेंनी वळसेपाटलांना सुनावले
वळसेपाटील आणि पवार कुटुंबाचे अनेक वर्षाचे ऋणानुबंध आहे हे मी कधीच विसरणार नाही समोरचा कसाही वागला तरी मी तरी त्यांबद्दल काहीही बोलणार नाही पण नातं जपायला ताकद लागते... नाती तोडायला नाही...! अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी दिलीप वळसेपाटलांना सुनावले. नाती जपायची ताकद माझ्यात आहे वळसेपाटलांनी साथ सोडल्याचे जास्ती दु:ख माझ्या आईला झालंय असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. देवदत्त निकम यांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे टाकळी हाजी येथे बोलत होत्या.
- प्रियंका गांधींनी घेतलं साईबाबांचं दर्शन
- प्रियंका गांधी साईचरणी लीन
- काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी शिर्डीमध्ये दाखल झाल्यात
- बाळासाहेब थोरातांनी शिर्डी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं
- साई दर्शनानंतर प्रियंका गांधी महाराष्ट्र दौ-याला सुरुवात करणारेत
सगळ्यांना एकाच चष्मातून बघू नका, अजित पवारांची अल्पसंख्याक समाजाला विनंतीसगळ्यांना एकाच चष्मातून बघू नका, अजित पवारांची अल्पसंख्याक समाजाला विनंती
आम्हाला 60 जागा आल्या पण त्यातला दहा टक्के जागा मुस्लिम उमेदवाराला दिल्या;असं अजित पवारांनी सोलापूरच्या जाहीर सभेत सांगितलं. मात्र यावेळी त्यांनी अल्पसंख्याक समाजाला विनंती केलीय की, सगळ्यांना एकाच चष्म्यातून बघू नका. यामुळे अजित पवारांचा नेमका निशाणा कुणावर? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल गांधी यांची आज अमरावतीमध्ये सभा
कोट्यवधी रुपये देऊन सरकार पाडलं - राहुल गांधी
भाजपकडून संविधानाचा अपमान - राहुल गांधी
धारावीची जागा अदानींना देण्याचा डाव - राहुल गांधी
महाराष्ट्रातील मविआचं सरकार भाजपनं चोरलं - राहुल गांधी
आमदारांना कोट्यवधी रुपये देऊन खरेदी केलं - राहुल गांधी
धारावीच्या सौद्याचे पैसे वापरुन आमदार खरेदी केले - राहुल गांधीशरद पवार यांच्या बॅगांची रायगडमध्ये तपासणी
म्हसळा येथील सभेसाठी शरद पवार दाखल झाले त्यावेळी त्यांची बॅग तपासण्यात आली. श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल नवगणे यांच्या प्रचारार्थ ही सभा घेण्यात आली होती. म्हसळा हेलिपॅडवर भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली.
शरद पवारांची फडणवीसांवर टीका
दरम्यान 'व्होट जिहाद' हा शब्द वापरुन देवेंद्र फडणवीसांचे सहकारी धार्मिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत असा जोरदार हल्लाबोल शरद पवारांनी केली आहे.
सिल्लोडमधील हुकुमशाही, गुंडगर्दी, दडपशाही रोखण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी साथ द्यावी, अशी साद उद्धव ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना घातली आहे. मतभेद असतील तर त्यांच्याशी बोलायला तयार असल्यचंही उद्धव ठाकरे म्हणाले. सुरेश बनकरांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सिल्लोडमधील गुंडगिरी आणि हुकुमशाही संपवायची असल्याचंही ते म्हणाले.
-उद्धव ठाकरेंची सभा बीकेसीमध्येच होणार-राऊत
-'उद्या शिवाजी पार्कमध्ये उद्धव ठाकरेंची सभा नाही'
-शिवाजी पार्कमधील राज ठाकरेंची सभा रद्द
-शिवसेना UBT आणि मनसेनं केला होता सभेसाठी अर्ज
-मुंबई महापालिकेकडून राज ठाकरेंच्या सभेला परवानगी
-उशिरा परवानगी दिल्यानं राज ठाकरेंची सभा रद्दउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या व्होट जिहादच्या आरोपाला संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे. हे धर्मयुद्धच असून महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे धर्मयुद्ध असल्याचा टोला राऊतानी लागावला आहे.
किरीट सोमय्यांनी नोमानींचा आणखी एक व्हिडिओ समोर
नोमानी व्होट जिहाद करत असल्याची तक्रार सोमय्यांनी केली आहे. यासंदर्भात किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं आहे. तर सज्जाद नोमानींवर कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
काकीला नातवाचा आताच का पुळका आला? अजित पवारांचा प्रतिभा पवारांवर निशाणा
युगेंद्र पवारांसाठी मैदानात उतरलेल्या प्रतिभा पवारांवर अजित पवारांनी निशाणा साधलाय. आतापर्यंत कधी प्रतिभा काकी बाहेर आल्या का? आत्ताच का नातवाचा पुळका आलाय? अशा शब्दांत अजित पवारांनी प्रतिभा पवारांना टोला लगावलाय. मी काय खताडा पिताडा आहे का?... मी बारामती तालुक्याची वाट लावली का?..., असा सवालही अजित पवारांनी केलाय. एवढा पुळका का होता? हे निवडणूक संपल्यानंतर काकींना विचारणार असल्याचं अजित पवार म्हणाले.
एकीची वज्रमूठ प्रगती साधणे - पंकजा मुंडे
लोकांमध्ये भिंती उभ्या करणे वाईट आहे. पण त्या सर्वांना एक करणे, एकीची वज्रमूठ प्रगती साधणे, हे वाईट नसून गरजेचे आहे, अशी भूमिका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मांडली. भाजपच्या ''''बटेंगे तो कटेंगे'''' या घोषणेला पंकजांनी विरोध केला होता. त्यानंतरच्या वादानंतर पंकजा यांनी पुन्हा निफाडच्या सभेत ही भूमिका मांडलीय. आम्ही फक्त विकासावर बोलतो, असेही त्या म्हणाल्या.