Gudi padwa 2023 Live Update : समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी, गुढीपाडव्याचा उत्साह पाहा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
Gudi Padwa 2023 : मराठी नवं वर्ष म्हणजे गुढी पाडवा...सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना.. गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! राज्यातील उत्साह पाहा फक्त एका क्लिकवर...(Maharashtra News)
Gudi Padwa 2023 : नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र, त्याच्यावर चांदीचा लोटा, उभारुनी मराठी मनाची गुढी, साजरा करूया हा गुढीपाडवा… नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! प्रत्येकजण आनंदाची ,सुखसमृद्धी, आणि भरभराटीची गुढीही उभारतायत.तर कुणी पारंपरिक पोषाखात शोभायात्रांमध्ये सहभागी होतायत. राज्यातील हा उत्साह साजरा करा झी 24 ताससोबत
Latest Updates
Gudi Padwa in Maharashtra : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा... यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये सजलंय. 450 किलो शेवंती, गुलाबी कण्हेर, अष्टर, झेंडू आणि गुलाब फुले वापरून ही फुलांची आरास केलीय.
Gudi Padwa in Maharashtra : पंढरपुरात गुढीपाडव्याच्यानिमित्तानं विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावर ध्वज फडकवला गेला... यावेळी विधिवत पूजन करून हा ध्वज फडकवला गेला.... वर्षभरात गुढी पाडवा आणि दिवाळी पाडवा या मुहूर्तावर हा ध्वज बदलण्याची परंपरा आहे....
Gudi Padwa in Maharashtra : आज चैत्रशुद्ध पाडव्याला जेजुरी कडेपठारावर खंडेरायाच्या गाभा-यात किरणोत्सव साजरा झाला.सकाळी सूर्यकिरण गर्भगृहामध्ये दाखल झाल्याबरोबर भाविकांनी पुजारी मंडळींनी सदानंदाचा येळकोट असा एकच जल्लोष केला. आजच्या मुहूर्तावर सूर्यकिरणे सरळ रेषेत येऊन महाराजांच्या अंगावर अभिषेक झाला.
Gudi Padwa in Maharashtra : अकोल्यात नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.... यानिमित्तानं संस्कृती संवर्धन समितीच्यावतीनं महारॅलीचं आयोजन करण्यात आलं.... यावेळी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेतील महिला-पुरूषांनी शहरातील मुख्य मार्गावरून मोटार-सायकल रॅली काढली....
Gudi Padwa in Maharashtra : परंपरेला फाटा देत कोल्हापूर जिल्ह्यातील येळाणे इथल्या डॉ. संजय जगताप आणि परिवाराने पुस्तकांची गुढी उभारून एक नवा आदर्श समाजासमोर उभा केला आहे. पुस्तकांच्या गुढीचे हे पाचवे वर्ष आहे. जगताप परिवाराने आपल्या धार्मिक सणाचे औचित्य साधून वाचन संस्कृती जपण्यासाठी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Gudi Padwa in Maharashtra : कोल्हापुरातील ऐतिहासिक भवानी मंडपाला गुडी पाडव्यानिमित्त साखरेच्या माळेचं तोरण बांधण्यात आलं. गेल्या चार पिढ्यांपासून भवानी मंडपाला माळकर कुटुंबीयांकडून तोरण बांधण्याची परंपरा सुरू आहे. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन छत्रपती राजाराम महाराजांना कन्यारत्न झालं, तेव्हा आनंदोत्सव म्हणून कोल्हापूरातील रामचंद्र माळकर यांनी विशिष्ट साच्यातील साखरेची माळ बनविली.
Gudi Padwa in Maharashtra : कल्याणमध्ये गेल्या 16 वर्षापासून भव्य स्वागत यात्रेची परंपरा आहे. या शोभायात्रेत महिला फेटे परिधान करुन बाईक रॅलीत सहभागी झाल्या होत्या. तर बच्चेकंपनी वारकरी, छत्रपती शिवाजी महाराज,राणी लक्ष्मीबाई यांच्या वेशभूषा करून स्वागत यात्रेत सामील झाले. तर आदिवासीं बांधवांनीही पारंपरीक वेशभुषेसह नृत्य केलं.
Gudi Padwa in Maharashtra : कल्याणमध्येही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळला.... यावेळी कल्याण सांस्कृतिक मंच रोटरीक्लबच्यावतीनं महिलांची बाईक रॅली काढण्यात आली....
Gudi Padwa in Maharashtra : गुढीपाडव्यासाठी गुढी उभारायला लागणारे बांबू आणि झेंडूच्या फुलांची बाजारात मोठी आवक झालीय. रायगड जिल्ह्यात गुढीसाठी लागणारा बांबू ५० ते ८० रुपयांना विकला जातोय. तसंच अवकाळी पावसामुळे झेंडूच्या फुलांचे दरही वधारलेत. एरवी शंभर रुपये किलो दराने मिळणारा झेंडू आता दीडशे रुपयांवर पोहोचलाय.
Gudi Padwa in Maharashtra : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला संभाजीनगरमध्ये महिलांनी भगवे फेटे घालून बाईक रॅली काढली. कुलस्वामिनी प्रतिष्ठाननं ही बाईक रॅली आयोजित केली होती. यावेळी 9 रंगाच्या 9 गुढी उभारून महिला सबलीकरणाचा संदेश देण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत अनेक महिलांनी या रॅलीत सहभाग घेतला.
Gudi Padwa: श्री गणेश मंदिर संस्थान आयोजित नववर्ष स्वागत यात्रा 2023 -डोंबिवली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधला.
Gudi Padwa in Maharashtra : साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा... यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची सुंदर आरास केलीय. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये सजलंय. 450 किलो शेवंती, गुलाबी कण्हेर, अष्टर, झेंडू आणि गुलाब फुले वापरून ही फुलांची आरास केलीय.
Ajit Pawar Gudi padwa : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुंबईतील निवासस्थानी गुढी उभारली. यावेळी अजित पवारांनी सपत्नीक त्यांनी गुढीची पूजा केली. त्यांनी ट्वीटरवर फोटो शेअर केल्या आहेत.
Thane Gudi Padwa: ठाण्यातील कोपरी इथल्या श्री अंबे माँ चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या आगमन मिरवणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले. दरवर्षी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत देवीचा आगमन सोहळा पार पाडतो.
सामान्य ठाणेकराप्रमाणे मिरवणुकीत सहभागी झाले आणि नंतर त्यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठाही करण्यात आली..यावेळी त्यांनी झी २४ तासशी संवाद साधला.
Gudi Padwa in Maharashtra : गुढीपाडव्यानिमित्त नागपुरातही मराठी नववर्षाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे. नागपुरात तरुण तरुणी पारंपरीक वेषशुभेत शोभायात्रेत सहभागी झालेत..तात्या टोपे गणेश मंदिर ते लक्ष्मीनगर चौक अशी ही शोभायात्रा काढण्यात आली. गुढीपाडव्यानिमित्त नागपुरात 51 फूट उंच गुढी उभारून सामूहिक हनुमान चालीसा, सामूहिक रामरक्षा तसेच सामूहिक आरती केली जाणार आहे.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक-गोडबोले याची या शोभायात्रेला विशेष उपस्थिती लावली होती. नागपुरातील शोभायात्रेत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि गिरीजा ओक या शोभायात्रेत उत्साहात सहभागी झाल्याने अधिकच उत्साह पाहायला मिळाला.
Gudi Padwa in Maharashtra : मुंबईत गिरगावातही गुढीपाडव्याचा उत्साह दिसून येत आहे. अबालवृद्धांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. तर डोंबिवलीतही तोच उत्साह दिसत आहेत. डोंबिवलीत या शोभायात्रांना सुरुवात झाली होती. त्यामुळे यावर्षी डोंबिवलीतली शोभायात्रा वैशिष्ट्यपूर्ण अशी असणार आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहणार आहेत. डोंबिवलीत गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. डोंबिवलीसह गिरगाव, ठाणे, गोरेगाव या भागातल्या शोभायात्रांही वैशिष्ट्यपूर्ण असणार आहेत.
Gudi Padwa in Maharashtra : तुळजाभवानीच्या मंदिरावर गुढी उभारली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये आज गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विधिवत पूजा करून पहाटे पाच वाजता तुळजाभवानीच्या मंदिरावर गुढी उभारण्यात आली. यानंतर आई तुळजाभवानीला अभिषेक पूजा घालण्यात आली . आज पाडव्या दिवशी आई तुळजाभवानीला शिवकालीन दागिने घातले जातात. त्यानंतर तुळजाभवानीची विशेष अलंकार पूजा मानली गेली. आई तुळजाभवानीचं हे रूप पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक आज तुळजापूर मध्ये येतात.
Gudi Padwa 2023 : 'सैराट' चित्रपटामुळे घराघरात पोहचलेला अभिनेता आकाश ठोसरनंही गुढीपाडव्याच्या (Akash Thosar in Gudi Padwa Rally Dombivali) रॅलीत सहभाग घेतला होता. यावेळी तो डोबिंवलीच्या गुढीपाडवा शोभयात्रेत (Gudi Padwa Shobha Yatra 2023) जल्लोषात सहभागी झाला होता.