Maharashtra Results LIVE: शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना उडाला भडका
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्याच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हातात? ठळक घडामोडी आणि निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Results 2024 Live Updates: आज विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडी की महायुती कोणाला बहुमत मिळणार, याची उत्सुकता आहे. विधानसभा निवडणुकांच्या निकालाचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर
Latest Updates
चंदगडचे नवनिर्वाचीत आमदार शिवाजी पाटील यांचं औक्षण करत असताना उडाला भडका
चंदगड तालुक्यातील महागाव इथं शिवाजी पाटील यांचं काही महिला औक्षण करत असताना मोठ्या प्रमाणात गुलाल पडल्याने उडाला भडका. आगीच्या भडक्यातून आमदार शिवाजी पाटील थोडक्यात बचावले.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणारः सूत्रांची माहिती
नव्या सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे पराभूत
घनसावंगी मतदार संघातून शिंदे शिवसेनेचे हिकमत उढाण 2 हजार 500 मतांनी विजयी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे पराभूत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्रातील ऐतिहासिक विजयानंतर; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं महायुतीचं अभिनंदन
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव
राष्ट्रवादी SP खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपचे अतुल सावे विजयी, तर MIM चे इम्तियाज जलील पराभूत
छत्रपती संभाजीनगर पुर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे अतुल सावे १७७७ मतांनी विजयी. तर इम्तियाज जलील यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अब्दुल सत्तारांचा 2 हजार मतांनी विजय
सिल्लोड मतदारसंघातील अब्दुल सत्तार यांचा 2 हजार मतांनी विजय
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया विजयी
भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण यांच्या कन्या भाजपच्या श्रीजया चव्हाण 49671 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: कॉमन मॅनला आम्हाला सुपरमॅन करायचंयः एकनाथ शिंदे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: आम्ही विकासाला प्राधान्य दिलेः एकनाथ शिंदे
गेल्या सव्वा दोन वर्षात आम्ही जे काम केले जे निर्णय घेतले ते निर्णय आत्तापर्यंतच्या भविष्यातील भूतो न भविष्यती होती. महाविकास आघाडीने बंद पाडलेली कामे आम्ही सुरू केली. अटल सेतू, कोस्टल रोड, कारशेड आणि मेट्रोचे उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले. आम्ही विकासाला प्राधान्य दिलेः एकनाथ शिंदे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करतो की...; देवेंद्र फडणवीसांनी मानले जनतेचे आभार
महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे. आता खूप काम आम्हाला महाराष्ट्रात करावं लागेल. महाराष्ट्राच्या जनतेला अश्वस्त करतो त्यांनी जो विश्वास दाखवला त्याला तडा जावू देणार नाहीः देवेंद्र फडणवीस
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लाडकी बहिण योजना गेमचेंजर ठरलीः अजित पवार
लाडकी बहिण गेमचेंजर ठरली आहे. या विजयामुळं आम्ही हुरळुन जाणार नाही. आम्हाला आणखी काम करायचं आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक शिस्त आणावी लागेल. आमच्या पाठिशी केंद्र सरकार आहेः अजित पवार
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीची पत्रकार परिषद सुरू
महायुतीला यश मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार. सगळ्यांनी स्वतःची निवडणूक असल्याचे समजून काम केले. आमच्या योजनांवर टीका करण्यात आली. पण त्यांचे जाहिरनामे बाहेर आल्यावर आम्हाला ते दिसलं काय चाललंय? राज्यातील जनतेचं विकासाला मतः अजित पवार
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा पराभव
काँग्रेसच्या फायर ब्रँड नेत्या यशोमती ठाकूर यांचा अखेर पराभव. भाजपचे राजेश वानखडे यांचा दणदणीत विजय
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: उदगीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांचा विजय
उदगीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांचा विजय. उदगीर मतदारसंघातून महायुतीचे संजय बनसोडे यांना 93 हजार 214 मतांनी विजयी झाले आहेत. या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव हे पिछाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांची हॅट्रिक, काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा पराभव
वर्ध्यात आमदार पंकज भोयर यांची हॅट्रिक. भाजपचे पंकज भोयर यांना अंदाजे सात हजारावर मतांची विजयी आघाडी. काँग्रेसचे शेखर शेंडे यांचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपाचे उमेदवार डॉ. विजयकुमार गावित यांच्या विजय
काँग्रेसचे किरण तडवी यांच्या पराभव डॉक्टर गावित यांनी केला आहे. सातव्यांदा डॉ. विजयकुमार गावित निवडून आलेत. डॉ. गावित यांच्या विजयामुळे जिल्ह्यात भाजपाची ताकद असल्याचे दिसून आला
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बारामतीतून अजित पवारांचा दणदणीत विजय
बारामतीत अजित पवारांचा दणदणीत विजय झाला आहे. अजितदादा 1,16,182 मतांनी विजयी झाले आहेत.
अजित पवार - 196640
युगेंद्र पवार - 80458
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीचे छगन भुजबळ विजयी; माणिकराव शिंदेंना केलं पराभूत
महायुतीचे छगन भुजबळ हे 26080 मतांनी विजयी झाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव शिंदे यांना 108331 मते मिळाली आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक, विषारी प्रचाराला जनतेने उत्तर दिलेः फडणवीस
संपूर्ण महाराष्ट्र मोदींमय आहे हे सिद्ध झाले. एक हैं तो सेफ हैं हे महाराष्ट्राने सिद्ध केले. लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिला. फेक नरेटिव्ह विरोधात लढणाऱ्या संघटना आणि मतांचं ध्रुवीकरण करण्याच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या पंथांचा विजय आहे. गावखेड्यात जाणाऱ्या आणि महायुतीच्या लाखो कार्यकर्त्यांचा, एकनाथ शिंदेंचा, अजितदादांचा हा विजय आहे. महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक. साष्टांग दंडवत मी जनतेला घालतो. विषारी प्रचाराला जनतेने उत्तर दिले. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत आणि चक्रव्यूह तोडलं, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नरहरी झिरवळ यांची हॅट्रिक, दिंडोरी मतदार संघात पुन्हा विजय
राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ 44532 मताधिक्याने विजयी झिरवाळ यांनी साधली हॅट्रिक.
नरहरी झिरवाळ 138442
सुनीता चारोस्कर 93910
सुशीला चारोस्कर 9694
संतोष रेहरे 4311Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्र मोदींच्या पाठिशी, मविआला जनतेने जागा दाखवलीः देवेंद्र फडणवीस
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सातारा मतदारसंघात भाजपचे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे 142124 येवढ्या विक्रमी मताधिक्यानी विजयी.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर विजयी
जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर विजयी. तब्बल 35 हजारांचे मताधिक्य घेत पडळकर झाले विजय. काँग्रेसचे विद्यमान आमदार विक्रम सावंत यांचा पडळकर यांनी केला पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंचा विजय
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडेंचा दणदणीत विजय झाला आहे. 1 लाख 38,481 मताने मुंडे विजयी ठरले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा, एकनाथ शिंदेंनी मानले मतदारांचे आभार
समर्पित भावनेनं महाराष्ट्राच्या समृध्दीसाठी आणि सामन्यांच्या कल्याणासाठी राबणाऱ्या महायुती सरकारला निर्विवाद आणि घवघवीत यश मिळाले आहे. महाराष्ट्रात महायुतीच लाडकी ठरली. हा विजय माझ्या लाडक्या बहिणींचा आहे, लाडक्या भावांचा, लाडक्या शेतकऱ्यांचा आहे. राज्यातल्या कॉमन मॅनने सुपरमॅनसारखे मतदान केले. त्यामुळे हा विजय राज्यातल्या सर्वसामान्यांचा आहे, सर्वसामान्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या सरकारचा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: डहाणू विधानसभेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांचा विजय. भाजपच्या विनोद मेढा यांचा 5000 मतांनी पराभव डहाणूचा गड राखण्यात सीपीएमला यश.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुखांचा पराभव
लातूर ग्रामीण मधून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख यांचा पराभव झाला आहे. विधान परिषदेचे आमदार तथा भाजप ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रामदास आठवले देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या भेटीला
रामदास आठवले देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांच्या भेटीला. महायतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आठवले शुभेच्या देण्यासाठी अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांचा तिसऱ्यांदा विजय
68116 मतांनी ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांच्यावर सीमा हिरे यांचा दणदणीत विजय
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: तासगाव विधानसभा मतदारसंघातून रोहित पाटील विजयी
तासगाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे रोहित आर आर पाटील विजयी. स्वर्गीय माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटलांनी मिळवला. 28 हजारांच्या मताधिक्याने नोंदवला विजय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार व माजी खासदार संजय काका पाटील यांचा रोहित पाटलांनी केला पराभव.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नांदेड मतमोजणी केंद्राबाहेर राडा; जमावाची पोलिसांवर दगडफेक
नांदेडच्या लोहा येथे जमावाची पोलीसांवर दगडफेक. जमावाला पांगवत असताना काही कार्यकर्त्यानी पोलीसांवर केली दगडफेक /
लोहा मतमोजणी केंद्राबाहेरील घटना असून सध्या परिस्थिती नियंत्रणातMaharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: माढ्यात शरद पवारांच्या पक्षाचा विजयी गुलाल; बबनराव शिंदेंच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग
आमदार बबनराव शिंदेंच्या ३० वर्षाच्या सत्तेला सुरुंग. ३० वर्षाची सत्ता ३० हजार मताधिक्य घेऊन अभिजीत पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल. शरद पवार पक्षाचे उमेदवार अभिजीत पाटील माढ्यातुन ३० हजार २०० मतांनी विजयी-
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिंदेंच्या शिवसेनेला धक्का; आमदार शहाजीबापू यांचा पराभव
शिवसेनेतील शिंदेंच्या बंडाला पहिल्यावहिल्या क्षणापासून साथ देणारे, गुवाहाटीतून बंड गाजविलेले आणि प्रचाराच्या काळात खुद्द शिंदेंनी धोनी ठरवलेले शिवसेनेचे आमदार शहाजीबापू यांचा परभव झाला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सिंधुदर्ग-कणकवली मतदारसंघात 22व्या फेरीअखेर ५३८९८ मतांनी नितेश राणे आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूर ग्रामीणमधून काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख पराभवाच्या वाटेवर. विधान परिषदेचे आमदार तथा भाजपा ग्रामीणचे उमेदवार रमेश कराड 8 हजाराची लिड
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर विजयाच्या उंबरठ्यावर,19 व्या फेरीअखेर खोतकर यांना 20 हजार 510 मतांची आघाडी, काँग्रेसचे कैलास गोरंटयाल पराभवाच्या छायेत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पुणे-वडगावशेरीत सुनिल टिंगरे पराभूत तर बापू पठारे जिंकले
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पिंपरी चिंचवड भाजपचे उमेदवार शंकर जगताप विजयी
पिंपरी चिंचवड महायुतीचे उमेदवार शंकज जगताप विजयी झाले आहेत. १ लाख ३८६५ मतांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचा पराभव
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांना धक्का, नवव्यांदा विधानसभा लढवणाऱ्या थोरातांना पराभवाचा धक्का बसला आहे. तर, पहिल्यांदाच निवडणुक लढवणारा अमोल खताळ हा उमेदवार विजयी ठरला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात पराभवाच्या छायेत
18 वी फेरी अखेर महायुतीचे अमोल खताळ 12 हजार 800 मतांनी आघाडीवर. बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसे यांचा विजय
मालेगाव बाह्य मतदार संघात दादा भुसे यांचा विजय. अद्वय हिरे यांची डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता. डिपॉझिट वाचवण्यासाठी 43 हजार 159 मतांची आवश्यकता
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अकोला पूर्वचे भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर विजय
अकोला पूर्वचे भाजपचे उमेदवार रणधीर सावरकर विजय, 50311 मतांनी आले निवडून. सलग तिसऱ्यांदा आमदार सावरकर विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दुपारी तीन वाजता माध्यमांशी संवाद साधतील
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके विजयी
अमरावती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुलभा खोडके विजयी. आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल दुसऱ्या स्थानी. काँग्रेसचे सुनील देशमुख तिसऱ्या स्थानावर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: देवळालीतून विद्यमान आमदार सरोज अहिरे विजयी
देवळालीतून विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज अहिरे 40 हजार 463 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नालासोपारा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार राजन नाईक यांचा विजय
राजन नाईक यांकडून क्षितीज ठाकूर यांचा पराभव. लाडक्या बहिणीने केलेल्या मतदानामुळे माझा विजय झाला, अशी प्रतिक्रिया राजन नाइक यांनी दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धनंजय मुंडे यांना एक लाखाहून अधिक लीड
धनंजय मुंडे यांना एक लाखांहून अधिक लीड परळी मतदारसंघांमध्ये मिळालेली आहे.' जातपात धर्म बघून लोक मतदान करणार नाहीत असं मी म्हणालो होतो त्याप्रमाणे जात-पात धर्म बघून कोणीही मतदान केलं नाही असं धनंजय मुंडे म्हणालेत तर महायुतीचं सरकार बनणार,' असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: जयंत पाटील 13 हजार 500 मतांनी विजयी
इस्लामपूर मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील 13 हजार 500 मतांनी विजयी घोषित. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार निशिकांत पाटील यांचा केला पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: खानापूर मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी
सांगलीच्या खानापूर मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर हे अकराव्या फेरी 51 हजार मतांच्या आघाडीवर आहेत,18 फेऱ्या पैकी अद्याप पाच फेऱ्या अजून शिल्लक आहेत. त्यामुळे सुहास बाबर यांचा विजय निश्चित झाला आहे. याठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वैभव पाटील यांचा पराभव झाला आहे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी
भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील 70521 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मावळमधून सुनील शेळके विजयी
मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके 1 लाख 08 हजार, 565 मतांनी विजयी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पालघरमधून राजेंद्र गावित विजयी
पालघर मतदारसंघातून राजेंद्र गावित 38 हजार मतांनी विजयी झाले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बच्चू कडू पराभवाच्या छायेत
बच्चू कडू पराभवाच्या छायेत. भाजपचे प्रवीण तायडे विजयाच्या मार्गावर असून अमरावती जिल्ह्यात महायुतीच वर्चस्व असल्याचे पाहायला मिळतंय. जिल्ह्यात महायुतीची सात जागा आघाडीवर. दर्यापुरात महाविकास आघाडीची सरशी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मोदी है तो मुमकिन हैं, महाराष्ट्रातील निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया
एक है तो ‘सेफ’ है, मोदी है तो मुमकिन है, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. महाराष्ट्रातील निकालावर त्यांनी ट्विट केलं आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अमित शहांचा शिंदे, अजितदादा आणि फडणवीसांना फोन, भाजपच्या विक्रमी यशाबद्दल केले अभिनंदन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे फोन करुन अभिनंदन. भाजपच्या विक्रमी विजयानंतप अमित शहांकडून अभिनंदन
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दिलीप वळसे पाटील विजयी
आंबेगावमधून दिलीप वळसे पाटिल यांचा निसटता विजयी झाली आहेत. वळसे पाटील 1100 पेक्षा जास्त मतांनी विजय
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडले- अजित पवार
विधानसभा निवडणुकांचे कल स्पष्ट होत असतानाच अजित पवारांनी एक फोटो पोस्ट केला आहे. एक्सवर त्यांनी महाराष्ट्रानं गुलाबी रंगाला निवडलं, असं कॅप्शन दिलं आहे. गुलाबी कॅम्पेन आणि अजित पवारांच्या निवडणुकीचं कॅम्पेन हाताळणाऱ्या अरोरांचा सत्काराचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: काँग्रेसला धक्का; नाना पटोले पिछाडीवर
साकोली विधानसभा मतदार संघातील काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले 534 मतांनी पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पुण्यातील कॅन्टोन्मेंट मध्ये सुनील कांबळे यांची ३८६३ मतांची आघाडी
सुनील कांबळे यांना ५९६८२ मतं तर रमेश बागवे यांना ५५८१९ मतं. १६ वी फेरी अखेर कँटोन्मेंट मधून सुनील कांबळे ३८६३ मतांनी पुढे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मनापासून काम केलं म्हणून विजयः एकनाथ शिंदे
जनतेनं भरभरुन महायुतीला मतदान केलं. गेले अडीच वर्ष महायुतीने जे काम केलं त्याची पोचपावती या निवडणुकीमध्ये जनतेनं दिली. म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो, त्याचे धन्यवाद देतो.
जे काम आम्ही अडीच वर्षात केलं. त्याची नोंद घेत कामाची पोचपावती आम्हाला दिलेली आहे. आम्ही अडीच वर्षात जे काम केलं. त्यापेक्षा आता पुढील कार्यकाळात आमची जबाबदारी वाढली आहे. मी जनतेला त्रिवार वंदन करतो. महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो. सर्व मनापासून काम करत होते. म्हणून एवढा मोठा विजय मिळतोय. मी कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाच्या मतदारांना धन्यवाद देतो. त्यांनी मला मोठ्या लीडने निवडून दिलं आहे. सर्व मतदारांचे मी आभार मानतो.Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बाळासाहेब थोरात अजूनही पिछाडीवर
संगमनेर विधानसभा मतदारसंघः तेरावी फेरी अखेर महायुतीचे अमोल खताळ 8 हजार 200 मतांनी आघाडीवर. बाळासाहेब थोरात अजूनही पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांची विजयाकडे वाटचाल
उदगीर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार संजय बनसोडे यांची विजयाकडे वाटचाल. उदगीर मतदारसंघातून 16 व्या फेरीत महायुतीचे संजय बनसोडे यांना 52 हजार 484 मतांची लीड मिळाली आहे. या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार सुधाकर भालेराव हे पिछाडीवर आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: खानदेशातून भाजपाला पहिलं यश, भाजप उमेदवाराला 70 हजारांचं मताधिक्य
शिरपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे काशीराम पावरा यांची विजयी आघाडी. 70 हजारांचं मताधिक्य. मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल घोषित करणार.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: एकनाथ खडसेंना मोठा धक्का, रोहिणी खडसे पिछाडीवर
मुक्ताईनगर अकराव्या फेरी अखेर विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील 20 हजार 840 मतांनी आघाडीवर आहेत. तर रोहिणी खडसे पिछाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अजित पवार राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ 32580 मतांनी आघाडीवर
दिंडोरी विधानसभा मतदारसंघात 20व्या फेरीअखेर नरहरी झिरवाळ 32580 मतांनी आघाडीवर
नरहरी झिरवाळ 90494
सुनीता चारोस्कर 57914
सुशीला चारोस्कर 5758
संतोष रेहरे 3284Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: माढा विधानसभा मतदारसंघात आठराव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभिजीत पाटील यांना १३,७१५ मतांची आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रोहित पवार आघाडीवर
कर्जत जामखेड मतदारसंघातून नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादी SP रोहित पवार 3,572 मतांनी आघाडीवर, भाजपचे राम शिंदे पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सिल्लोडमध्ये अब्दुल्ल सत्तार आघाडीवर
शिवसेनेचे अब्दुल्ल सत्तार पुन्हा आघाडीवर आले आहे. 13व्या फेरीअखेर त्यांनी लीड घेतली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नाशिक जिल्ह्यात महायुतीची मुसंडी
नाशिक जिल्ह्यात 15 पैकी 13 जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर. मालेगावमध्ये अपक्ष उमेदवार आणि कळवणमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जेपी गावित आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे पिछाडीवर
आठव्या फेरीअखेर शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण 5519 मतांनी आघाडीवर. तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राजेश टोपे पिछाडीवर.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटलांना मोठी आघाडी
राधाकृष्ण विखे पाटील विजयाच्या उंबरठ्यावर. कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष. राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय विखे पाटील यांनी हस्तांदोलन करत घेतली गळाभेट
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धीरज देशमुख पन्हा आघाडीवर
धीरज देशमुख यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. दोन हजार मतांनी धीरज देशमुख पुढे आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: हसन मुश्रीफ 6071 मतांनी आघाडीवर
14व्या फेरीअखेर हसन मुश्रीफ 6071 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सातव्या फेरीअखेर भाजपचे नारायण कुचे यांची आघाडी
बदनापूर विधानसभा मतदारसंघात सातव्या फेरीअखेर भाजपचे नारायण कुचे यांची १२ हजार ९८६ आघाडी, बबलू चौधरी पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघात 7व्या फेरीअखेर 8039 मतांनी भाजपचे अतुल भोसले आघाडीवर. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नागपूर दक्षिण पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस आघाडीवर
राज्यात भाजपची मुसंडी, देवेंद्र फडणवीस आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धनंजय मुंडे यांची निर्णायक आघाडी
बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरी अखेर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे धनंजय मुंडे 50531 मतांनी आघाडीवर. लीडचा पन्नास हजारांचा आकडा पार. धनंजय मुंडे यांची निर्णायक आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: कसबा विधानसभेत भाजपची मुसंड, हेमंत रासने आघाडीवर
कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासने सहावे फेरीअखेरीस आघाडीवर. सहाव्या फेरीअफेरीस हेमंत रासने यांना 9402 मतांची आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुती 216 जागांवर आघाडी तर महाविकास आघाडी 51 जागांवर आघाडीवर तर अपक्ष उमेदवार 20 जागांवर पुढे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: माळशिरस मतदारसंघातील भाजप उमेदवार राम सातपुते 4,466 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सिन्नरमध्ये नवव्या फेरी अखेर माणिकराव कोकाटे 22249 मतांनी आघाडीवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उदय सांगळे पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यकर्त्यांना संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता मोदी संबोधित करणार अशी शक्यता आहे. प्रत्येक निवडणूक निकालानंतर पंतप्रधान कार्यकर्त्यांना संबोधित करतात.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार फहाद अहमद आघाडीवर आहेत.
फहाद अहमद राष्ट्रवादी शरद पवार - २०४१७
सना मलिक राष्ट्रवादी- १८८६६
नवीन आचार्य मनसे - १०४६६
सतीश राजगुरू वंचित २३१०
फहाद अहमद - १५५१ मतांनी आघाडीवरMaharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: विजय शिवतारे 14700 मतांनी आघाडीवर आहेत
पुरंदर मधून शिवसेनेचे विजय शिवतारे 14700 मतांनी आघाडीवर आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रोहित पाटील आघाडीवर
तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे रोहित पाटील 8,764 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय काका पाटील पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पुणे कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांची आघाडी
पुणे कोथरूड मतदार संघातून चंद्रकांत पाटील यांची आघाडी. सहाव्या फेरीनंतर ३०५०० मतांची आघाडी. चंद्रकांत पाटील यांना ३० हजार पेक्षा अधिक मतांची आघाडी
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बविआचे क्षितीज ठाकूर पिछाडीवर
आठव्या फेरी अखेर भाजपाचे राजन नाईक 7,128 मतांनी आघाडीवर तर बविआचे क्षितीज ठाकूर पिछाडीवर
नालासोपारा विधानसभा (आठवी फेरी)
१. क्षितीज ठाकूर (बविआ) - 61761
२. राजन नाईक (भाजपा) - 68889Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर 30000 मतांनी आघाडीवर
इगतपुरीत सातव्या फेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हिरामण खोसकर 30000 मतांनी आघाडीवर, काँग्रेसचे लकी जाधव पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दिलीप वळसे पाटील 4264 मतांनी आघाडीवर
आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील 4264 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: गुलाबराव पाटील सातव्या फेरी अखेर आघाडीवर
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिंदे सेनेचे मंत्री गुलाबराव पाटील सातव्या फेरी अखेर 21, 980 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीची जोरदार मुसंडी, भाजपची 122 जागांवर आघाडी
भाजप- 122
शिवसेना (शिंदे)- 58
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)- 37
काँग्रेस- 20
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 19
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)- 10
इतर-18Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अमरावती अचलपूरमधून बच्चू कडू यांना मोठा धक्का
बच्चू कडू यांना मोठा धक्का बसला आहे. अकराव्या फेरीअखेर बच्चू कडू यांना 23 हजार मतांनी पिछाडीवर आहेत. तर, भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूरमधून अमित देशमुख पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अमित देशमुख पिछाडीवर. अखेर 5 व्या फेरीत भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर 1345 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अपक्ष उमेदवार समीर भुजबळांना मोठा धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: नांदगाव मतदार संघात पाचव्या फेरी अखेर शिंदेंच्या शिवसेनेचे सुहास कांदे २३,२०० मतांनी आघाडीवर. अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना मोठा धक्का
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणीत मोठे उलटफेर, महायुतीची 204 जागांवर आघाडी, तर महाविकास आघाडी...
विधानसभा निवडणुकांचे पहिले कल समोर आले आहेत. महायुतीने 204 जागांवर आघाडी घेतली आहे. तर, मविआ 49 जागांवर आघाडी घेतली आहे,
भाजप- 111
शिवसेना (शिंदे)- 58
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पक्ष)- 35
काँग्रेस- 20
शिवसेना (उद्धव ठाकरे)- 18
राष्ट्रवादी काँग्रेस (SP)- 9
इतर-16Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: चौथ्या फेरीअखेर अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर
बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर आहेत.
अजित पवार 35,329
युगेंद्र पवार 20,084Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणीत मोठे उलटफेर, महायुतीची 160 जागांवर आघाडी, तर महाविकास आघाडी...
विधानसभा निकालांत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. महायुतीने मोठी मुसंडी मारली असून 160 जागांवर आघाडीवर आहे. तर, मविआ 100 जागांवर आघाडी आहे. तर अपक्ष व इतर लहान पक्षांनी 18 जागांवर आघाडी घेतली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिर पुन्हा आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या सरोज अहिरे यांची तिसऱ्या फेरी अखेर मोठी आघाडी. तर, शिंदे आणि ठाकरे पक्षाचे उमेदवार पिछाडीवर. 11,326 मतांनी सरोज अहिरे आघाडीवर
सरोज अहिरे - 17562
राजश्री आहेरराव - 6236
योगेश घोलप -4159Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: छगन भुजबळ पुन्हा आघाडीवर
येवल्यात चौथ्या फेरीत छगन भुजबळांची 3,000 मतांची आघाडी. सुरुवातीच्या पिछाडीनंतर भुजबळ आघाडीवर तर शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: यशोमती ठाकूर यांना मोठा धक्का
भाजप उमेदवार राजेश वानखेड 630 मतांनी आघाडीवर. यशोमती ठाकूर 630 मतांनी पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पुण्यातील चार मतदारसंघात महायुती आघाडीवर
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा या चार मतदारसंघात महायुती आघाडीवर
हडपसर मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे आघाडीवर
वडगाव शेरीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आघाडीवर
पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मात्र काँग्रेसचे रमेश बागवे आघाडीवर
खडकवासल्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके आघाडीवरMaharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील चौथ्या फेरी अखेर 9076 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर तिसऱ्या फेरी अखेर 5 हजार 580 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरीनंतर 6 हजार मतांनी पिछाडीवर
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तिसऱ्या फेरी नंतर 6 हजार मतांनी पिछाडीवर. महायुतीचे अमोल खताळ तिसऱ्या फेरीत आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रोहित पवार पिछाडीवर
कर्जत जामखेड मतदारसंघात दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर आहेत. तर, राष्ट्रवादी SP रोहित पवार पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: लातूर ग्रामीणमधून धीरज देशमुख पिछाडीवर
लातूर ग्रामीण मतदारसंघातून तिसऱ्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार धीरज देशमुख पिछाडीवर आहेत. भाजपा उमेदवार रमेश कराड 264 मतांनी आघाडीवर आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख विरुद्ध विधान परिषदेचे आमदार रमेश कराड अशी आमदार विरुद्ध आमदार अशी लढत झाली होती
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिवसेनेचे संजय राठोड आघाडीवर
दिग्रस मतदारसंघात तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे संजय राठोड 1075 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: हर्षवर्धन पाटील आघाडीवर, दत्ता भरणे पिछाडीवर
निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून फोडून इंदापुरातून शरद पवारांनी रिंगणात उतरवलेले हर्षवर्धन पाटील आघाडीवर आहेत. तर अजित पवारांचे उमेदवार दत्ता भरणे मागे पडले आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील आघाडीवर
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रोहित पाटील दुसऱ्या फेरी अखेरी 2,254 मतांनी आघाडीवर. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजयकाका पाटील पिछाडीवर
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात पहिल्या फेरी नंतर 1275 मतांनी पिछाडीवर. महायुतीचे अमोल खताळ पहिल्या फेरीत आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दुसऱ्या फेरी अखेर इगतपुरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिरामण खोसकर 8 हजार मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दिलीप वळसे पाटील 237 मतांनी आघाडीवर
आंबेगाव विधानभा मतदारसंघातून तिसऱ्या फेरीअखेर दिलीप वळसे पाटील 237 मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अब्दूल सत्तार पिछाडीवर
सिल्लोड मतदारसंघातून उद्धव ठाकरे पक्षाचे सुरेश बनकर 2 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर अब्दुल्ल सत्तार पिछाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी आघाडीवर, तर नवाब मलिक पिछाडीवर
मानखुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी आघाडीवर आहेत. तर, नवाब मलिक पिछाडीवर आहे.
अबू आझमी ३८८४
नवाब मलिक ४६१
सुरेश पाटील ३७७
अतिक खान AImIM ३६१७
मोहम्मद सिराज २७८Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रत्नागिरी तिसऱ्या फेरीनंतर उदय सामंत 6080 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रोहणी खडसे पिछाडीवर
मुक्ताईनगर मतदार संघात दुसऱ्या फेरी अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील 1805 मतांनी आघाडीवर. दुसऱ्या फेरीतही राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे मागे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: जत विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे गोपीचंद पडळकर 828 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट पिछाडीवर
औरंगाबाद पश्चिम मतदासंघातून पहिल्या फेरीत राजू शिंदे 5624 मतांनी आघाडीवर तर संजय शिरसाट यांना 5105 मतं आहेत. 500 मतांनी ठाकरे सेनेचे राजू शिंदे आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: चंद्रकांत पाटील पहिल्या फेरीत आघाडीवर
कोथरुड भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील पहिल्या फेरीत ५७०० मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: आमदार रवी राणा पहिल्या फेरीत 685 मतांनी आघाडीवर
बडनेरा मतदार संघाची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. आमदार रवी राणा पहिल्या फेरीत 685 मतांनी आघाडीवर आहेत. ठाकरे गटाच्या बंडखोर प्रीती बंड आणि रवी राणा यांच्या चुरशीची लढत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: गुलाबराव पाटील आघाडीवर
जळगाव ग्रामीण मतदार संघात शिवसेना शिंदे पक्षाचे गुलाबराव पाटील आघाडीवर. गुलाबराव पाटील आघाडीवर असल्याने गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात झळकले अभिनंदनचे बॅनर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दिलीप वळसे पाटील पिछाडीवर
आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम 143 मतांनी आघाडीवर.
पाहिली फेरी
दिलीप वळसे पाटील - 2627
देवदत्त निकम - 2770Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: दादा भूसे आघाडीवर
नाशिक मालेगाव बाह्य शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दादा भुसे ४००० मतांनी आघाडीवर आहेत
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: छगन भुजबळ पिछाडीवर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आघाडीवर
नाशिक येवला मतदारसंघात एकूण टपाल मतमोजणीत छगन भुजबळ 104 मतांनी पिछाडीवर आहेत.राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माणिकराव शिंदे आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: कर्जतमधून रोहित पवार आघाडीवर
कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित पवार (SP) आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: तानाजी सावंत पहिल्या फेरीत आघाडीवर
परंडा- महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत पहील्या फेरीत 332 मतांनी आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बारामती अजित पवार आघाडीवर
पहिल्या फेरीनुसार बारामतीतून अजित पवार आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: कुडाळमधून निलेश राणे आघाडीवर
कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे निलेश राणे आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर
टपाल मतमोजणीत नाशिक मध्यमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर, ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत गीते पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: महायुतीचे शतक तर मविआ 90 वर, राज्यात अटीतटीची लढत
पहिल्या अर्ध्या तासांत हाती आलेल्या कलांनुसार महायुतीने 105 जागांवर आघाडी मिळवली असून मविआ 90 जागांवर आघाडीवर आहे. त्याचप्रमाणे 10 ठिकाणी अपक्ष उमेदवार आघाडीवर दिसत आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: अशोक चव्हाणांच्या कन्या श्रीजया चव्हाण आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पोस्टल मतमोजणीत भोकरमधून महायुतीच्या उमेदवार श्रीजया चव्हाण आघाडीवर.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: उत्तर अहिल्यानगर पोस्टल मतदानात महायुती आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: शिर्डीमध्ये टपाली मतांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आघाडीवर , महायुती
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे आघाडीवर , महायुती
श्रीरामपूरमध्ये लहू कानडे आघाडीवर , महायुती
अकोलेमध्ये किरण लहामटे आघाडीवर , महायुती
राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे आघाडीवर , महाविकास आघाडीMaharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सातारा मतदारसंघातील पोस्टल मतमोजणीला झाली सुरुवात, पोस्टल मतमोजणीत शिवेंद्रसिंहराजे भोसले आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: कोल्हापूरात महायुतीचे उमेदवार आघाडीवर
कागलमध्ये टपाली मतांमध्ये हसन मुश्रीफ आघाडीवर (महायुती)
राधानगरी विधानसभा मतदारसंघात प्रकाश आबिटकर आघाडीवर (महायुती)
शिरोळ मध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर (महायुती)
इचलकरंजी मध्ये राहुल आवाडे आघाडीवर (महायुती)
शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात विनय कोरे आघाडीवर (महायुती)
कोल्हापूर दक्षिण मध्ये ऋतुराज पाटील आघाडीवर (महाविकास आघाडी)Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सांगली इस्लामपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) पक्षाचे जयंत पाटील आघाडीवर आहे,
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ आघाडीवर
दिंडोरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ टपाली मतमोजणी आघाडीवर. तर, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनिता चारोस्कर पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणी सुरू झाल्यानंतर हाती आलेल्या पहिल्या कलांनुसार 53 जागी महायुती आणि 35 जागी महाविकास आघाडी तर 1 अपक्षाची आघाडी घेतली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: परळीत धनंजय मुंडे आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: परळीत पोस्टल मतमोजणीत धनंजय मुंडे आघाडीवर आहेत. तर, बीडमध्ये पोस्टल मतमोजणीत योगेश क्षीरसागर आघाडीवर आहेत. आष्टीत पोस्टल मतमोजणीत सुरेश धस आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: जळगाव जामोदमधून पोस्टल मतमोजणीत भाजपचे डॉ संजय कुटे आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मालेगावातून शिवसेनेचे दादा भुसे पिछाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: येवल्यातून छगन भुजबळ पोस्टल मतमोजणीत आघाडीवर तर, मालेगावात अद्वय हिरे आघाडीवर असून शिंदेसेनेचे दादा भुसे पिछाडीवर आहेत. सिन्नरमध्ये माणिकराव कोकाटे सांगळे उदय पिछाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: सांगोला विधानसभा मतदारसंघात टपाली मोजणीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शहाजी पाटील आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; देवेंद्र फडणवीस, पटोले आघाडीवर
पोस्टल मतांची मोजणी सुरू, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस पोस्टल मतांमध्ये आघाडीवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: पहिल्या कलांनुसार घनसावंगी येथून राजेश टोपे आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: राज्यात मतमोजणीला सुरुवात; निकालाचे वेगवान अपडेट एका क्लिकवर
औंरगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे आघाडीवर, पोस्टल मत मोजणीला सुरुवात
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: जळगावात अपक्षांसाठी विमान तयार, महायुती अलर्ट मोडवर
महायुतीला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष उमेदवारांसह विजयी उमेदवार तातडीने मुंबईकडे रवाना होण्यासाठी जळगाव विमानतळावर व्यवस्था करण्यात आली आहे. निकालाच्या काही फेऱ्या झाल्यानंतर चित्र स्पष्ट झाले की लगेच सर्व महायुतीला पाठिंबा देणारे अपक्ष आणि महायुतीचे उमेदवार मुंबईकडे रवाना होणार. जळगाव विमानतळावर याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आल्याची भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने झी 24 तासला माहिती दिली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बच्चू कडू, रवी राणा, यशोमती ठाकूर यांचे राजकीय भवितव्य पणाला
अमरावती जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघातील मतमोजणी आज होणार आहे. अमरावतीच्या लोकशाही भवनात अमरावती व बडनेरा मतदार संघाची मतमोजणी होणार आहे. सर्व मतदार संघाची प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे. सकाळी 8 वाजेपर्यंत कोणाचा विजय होणार याचा अंदाज येणार आहे. अचलपूर मधून बच्चू कडु, बडनेरा मधून रवी राणा व तिवसा मधून यशोमती ठाकूर यांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: रत्नागिरीत पाच विधानसभा मतदार संघातील मतमोजणीची तयारी पूर्ण
रत्नागिरी विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 26 राऊंड. दापोली विधानसभा मतदार संघात मतमोजणीचे 28 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघात 65 टक्के मतदान झाले आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: बारामतीत कोण मारणार बाजी?
बारामती विधानसभेच्या मतमोजणीला अगदी काही वेळात सुरुवात होणार आहे.बारामती मधील वाखार महामंडळाच्या गोदामात हि मतमोजणी पार पाडणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार अशी लढत या ठिकाणी पार पडतेय. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: धाराशिव जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
तुळजापूर ,उमरगा, धाराशिव व परंडा या चार विधानसभा मतदार संघाची आज मतमोजणी पार पडणार आहे. जिल्ह्यातील ६६ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. या मतमोजणीसाठी पंधराशे पोलीस पंधराशे होमगार्ड तर सव्वाशे पोलीस अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील धाराशिव, उमरगा, तुळजापूर आणि परंडा या चार ठिकाणी मतमोजणी पार पडणार आहे. चार मतदारसंघापैकी दोन मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली असून एक मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस तर एका मतदार संघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत झाली आहे. आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत व भाजपाचे तुळजापूरचे उमेदवार राणा जगजित सिंह पाटील यांच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिल आहे .
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: मतमोजणी केंद्रात कर्मचाऱ्यांची कसून तपासणी
विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आठ वाजेला सुरुवात होणार आहे. त्याआधी कर्मचाऱ्यांना पहाटे मतदान केंद्रात प्रवेश देण्यात येत आहे. नंदुरबार येथे सर्व मतमोजणी करणारे कर्मचाऱ्यांची सकाळी साडेपाच वाजता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांची कसून तपासणी करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर हे कर्मचारी दाखल झाल्यानंतर सुरुवातीलाच त्यांची तपासणी करण्यात आली.
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: भाजप महायुतीकडून बंडखोर आणि अपक्ष विजयी उमेदवारांवर करडी नजर
बंडखोर आणि अपक्ष निवडून येणाऱ्या आमदारांना संपर्क करण्यासाठी भाजपकडून नेत्यांवर जबाबदारी. रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, संजय कुटे, मोहित कंबोज, नितेश राणे आणि निरंजन डावखरेंवर जबाबदारी. अपक्ष आणि बंडखोरांसाठी भाजप महायुतीकडून जोरदार फिल्डिंग
Maharashtra Vidhan Sabha Election Results LIVE: विधानसभा निवडणुकीच्या निकाला अगोदर जळगाव शहरात वातावरण तापले
विधानसभा निवडणुकीच्या निकाला अगोदर जळगाव शहरात वातावरण तापले आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात भाजप आणि अपक्ष उमेदवार कुलभूषण पाटील यांचे कार्यकर्ते भिडले. जळगाव शहरातील पिंप्राळा भागात ठाकरे सेनेचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांचे आणि भाजपचे माजी नगरसेवक यांच्यात बाचाबाची