Khalapur Landslide LIVE Updates: इरसालवाडी दुर्घटनेत मृतांचा आकडा 16 वर
Khalapur Landslide LIVE Updates: मागील दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये दरड कोसळण्याच्या घटना घडल्या.
Khalapur Landslide LIVE Updates: राज्यात सुरु असणाऱ्या पावसामुळं आता अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं मुंबईमध्ये पावसाचा जोर सकाळच्या वेळात काहीसा ओसरला असला तरीही राज्याच्या उर्वरित भागात पावसानं उसंत घेतलेली नाही. त्यातच बुधवारी रात्री उशिरानं रायगडमधील इरसालगड येथे असणाऱ्या इरसाल वाडी या आदिवासी वस्ती असणाऱ्या पाड्यावर दरड कोसळल्यामुळं मोठं संकट ओढावलं आहे. रात्री उशिरा ही घटना घडल्याचं लक्षात येताच तताडीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं. ज्यानंतर आता खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीसुद्धा बचावकार्यामध्ये लक्ष घालताना दिसत आहेत.
Latest Updates
हे ही वाचा : चक्क डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले मुख्यमंत्री, इरसालवाडीच्या पीडितांशी साधला संवाद
रायगड दुर्घटनेबाबत विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केलं निवेदन
Khalapur Landslide LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील इर्शाळगड येथे दरड कोसळण्याच्या घटनेनंतर अधिक मनुष्यबळाची गरज असल्याने सिडकोमार्फत 1000 कामगार यंत्रसामुग्रीसह घटनास्थळी पाठविण्यात आले आणि ते तेथे दाखल झाले आहेत. एनडीआरएफच्या देखरेखीत ते काम करीत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून 3 बॉबकट मशिन्स उपलब्ध झाल्या असून त्यातील 1 मशीन तेथे पोहोचली असून उर्वरित 2 थोड्याच वेळात पोहोचतील. मात्र हेलिकॉप्टरने त्या मशिन्स प्रत्यक्ष उपयोगात आणण्यासाठी हवामानाचे अडथळे येत आहेत. दुपारी 3 पर्यंत 10 मृतदेह सापडले असून 4 जण जखमी आहेत.स्वतः 1.30 तास चालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी गेले. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यात सुमारे 11,500 नागरिकांचे स्थलांतर गेल्या 2 दिवसात करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसात 235 मिमी पाऊस झाला. भद्रावती तालुका, कचराळी गावांचा संपर्क तुटला होता, आता तो पूर्ववत झाला आहे.Khalapur Landslide LIVE Updates: परिस्थिती अतिशय भयावह असून, आपल्या परिनं जे काही करता येईल ते सर्व प्रयत्न करावेत असा सूर युवा नेते आदित्य ठाकरे यांन आळवला. आम्हीही स्थानिकांची भेट घेऊन दुर्घटनाग्रस्तांना आधार देण्य़ाचा प्रयत्न करत आहोत. गावकऱ्यांची भेट घेताना घटनास्थळी गर्दी करण्यात अर्थ नसून, यामुळं एनडीआरएफच्या बचावकार्यात अडथळा निर्माण होऊ शकतो, ही वस्तुस्थितीही त्यांनी मांडली.
Khalapur Landslide LIVE Updates: मानवी प्रयत्नांच्या आधारे बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे. राज्य शासनाच्या वतीनं स्थानिक यंत्रणांच्या मदतीनं बचावकार्य हाती घेण्यात आलं आहे.
Khalapur Landslide LIVE Updates: 'रायगडची घटना दुर्देवी आहे. अशी घटना घडू नये यासाठी सरकारकडे विनंती करत असतो. शेकडो गावं राज्यातील डोंगर पायथ्याशी आहेत. त्यामुळं पश्चिम घाट पट्ट्यातील गावांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असतानाही सरकारकडून मात्र त्याबाबत गंभीर दखल घेतली जात नाही', असं विनायक राऊत म्हणाले.
Khalapur Landslide LIVE Updates: इरसालवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची नावं खालीलप्रमाणं-
1) रमेश हरी भवर, वय 26
2) जयश्री रमेश भवर, वय 22
3) रुद्रा रमेश भवर, वय 1 वर्ष
4) विनोद भगवान भवर, वय 4 वर्ष
5) जिजा भगवान भवर, वय 36
दुर्घटनेत दोन चिमुकल्यांच्या मृत्यूजखमींची नावं -
1) प्रवीण पांडुरंग पारधी, 21 वर्षं
2) यशवंत राघो डोरे, वय 37 वर्षं
3) भगवान हरी भवर, वय 25 वर्षं
4) मनीष यशवंत डोरे, वय 35 वर्षंबचाव कार्यासाठी नवी मुंबई येथील अग्निशमन दलाचे पथ इरसालवाडी येथे जात असताना पथकातील कर्मचारी शिवराम यशवंत ढुमणे यांचा मृत्यू झाला आहे. श्वसनाचा त्रास झाल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra Rain : मुंबई कोल्हापूरच्या गगनबावडा परिसरात धुवांधार पावसाला सुरूवात झालीये. या धुवांधार पावसामुळे समोर रस्ता देखील दिसेनासा झालाय. या रस्त्यावरून वाहनचालक आपला जीव मुठीत टाकून प्रवास करताना दिसताये. मुसळधार कोसळणा-या पावसामुळे नदी, नाले देखील दुथडी भरून वाहताये. त्यामुळे पूर येण्याची शक्यता वर्तवली जातेय.
Khalapur Landslide LIVE Updates: पुणे जिल्ह्यातल्या दरडप्रवण आणि पूरप्रवण गावांवर जिल्हा प्रशासनाचं अधिक लक्ष, सर्व गावांना सतर्कतेचा इशारा.
Maharashtra Rain : मुंबई गोवा महामार्गावर महाडजवळ सर्व्हिस रोडचा संरक्षक कठडा सकाळी कोसळलाय. तो कोसळतानाचा व्हिडिओ झी २४ तासच्या हाती लागलाय. महामार्गावर महाडजवळ सावित्री नदीच्या किनाऱ्याला लागूनच हा सर्व्हिस रोड आहे. सकाळी हा भाग खचून कठडा कोसळला. तर नडगाव गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या संरक्षक भिंतीला तडे गेल्याची बाबही काल समोर आली होती. या घटनेने मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण झालाय.
Khalapur Landslide LIVE Updates: 'साडेदहावाजता भूई दणाणली. आम्ही जीव घेऊन पळालो, आता तिथून आम्हाला इथं परत आणलं. एकदम जोराच आवाज झाला आणि आम्ही तिथून पळालो', अशी माहिती इसरालवाडीतील एका महिलेनं दिली. 'सकाळी वाडीत जाऊन नेमकं काय घडलं ते बघायला जाऊ, असा विचार आम्ही केला पण आता फक्त मातीच राहीली.... सगळं गेलं... ', असं म्हणत त्या महिलेनं एकच टाहो फोडला
Khalapur Landslide LIVE Updates: खालापूर दुर्घटनास्थळी शिवसेना नेते युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना आमदार अनिल परब आणि सुनील प्रभू दुर्घटनास्थळी रवाना
हेसुद्धा वाचा: 'दोन दिवसांशिवाय मृतदेह बाहेर निघणार नाहीत'; इरसालवाडीवरुन गिरीश महाजनांची धक्कादायक माहिती
Maharashtra Rain : तिथं इरसालवाडीमध्ये दरड कोसळण्याची भीषण दुर्घटना घडलेली असतानाच इथं राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पावसाचा जोर हळुहळू वाढू लागला आहे. कल्याण नगर महामार्गावर माळशेज घाट परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून मुसळधार पावसाने महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहतुक खोळंबली आहे. सध्या या परिसरातील धबधबे हे ओसांडून वाहत असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह असल्याने अनेक वाहनेही माळशेज घाट परिसरात अडकून पडली असून पाण्याचा फ्लो जास्त असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत,मात्र पावसाचा जोर कायम असल्याने वाहन चालकानी आपली वाहने चालवताना मोठी काळजी घेणे गरजेचे आहे.
Khalapur Landslide LIVE Updates: विधानपरिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इरसालवाडी दुर्घटनेसंदर्बातील सविस्तर माहिती दिली. यावेळी जखमींवरील उपचारांपासून मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यापर्यंतची माहिती त्यांनी दिली. घटनास्थळ अतिदुर्गम भागात असल्यामुळं तिथं कोणत्याही वाहनानं पोहोचता येत नसल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी अधोरेखित केला.
हेसुद्धा वाचा : इरसालवाडी दुर्घटनेनंतर बाबा वेंगाच्या भविष्यवाणीची का होतेय चर्चा?
Khalapur Landslide LIVE Updates: साधारण दोनशे वर्षांपासून इथं वस्ती असल्याची माहिती देत या चौकशीवर चर्चा करण्याचा आजचा दिवस नसून दुर्घटनाग्रस्तांना मदत देण्याकडेचत आमचं प्राधान्य असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. +
हेसुद्धा वाचा : Irshalgad Landslide Photos: भयंकर! दरड कोसळल्यामुळं इरसालवाडी उध्वस्त
Khalapur Landslide LIVE Updates: रायगड जिल्ह्यातील इरसालवाडीवर दरड कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर अनेक नेतेमंडळींनी तातडीनं बचावकार्यामध्ये लक्ष घातलं. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यासंबंधी माहिती देताना 80 जण या दुर्घटनेतून बचावल्याची अधिकृत माहिती दिली. दुर्घटनाग्रस्त गाव डोंगरावर असल्यामुळं तिथं जाण्याचा मार्ग अवघड असल्याचं ते यावेळी म्हणाले. जेसीबी किंवा तत्सम गोष्टी एअरलिफ्ट करता येणार का, अशा पद्धतीनंही विचार सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
Khalapur Landslide LIVE Updates: गावापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त एकच पायवाट. सध्या पावसामुळं तीसुद्धा निसरडी झाल्यामुळं बचाव कार्यात मोठे अडथळे येत आहेत. इरसालवाडीपर्यंत कोणतंही मोठं वाहन पोहोचू शकत नसल्यामुळं सध्या मानवी प्रयत्नांनीच ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे.
Khalapur Landslide LIVE Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना इरसालगड दुर्घटनेसाठी शासनाकडून मदतीचा हात देण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आल्याचं सांगितलं. 8108195554 या नियंत्रण कक्षाचा संपर्क असल्याचं त्यांनी सांगत मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांनी त्यावर संपर्क साधण्याचं आवाहन केलं.
Khalapur Landslide LIVE Updates: इरसालगड दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत गावकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी परिस्थितीचं गांभीर्य पाहता त्यांनी मृतांच्या नातलगांना 5 लाख रुपयांची शासकीय मदत देण्याचं आश्वासनही दिलं. शिवाय जखमींवर सर्व उपचार सरकारी खर्चातून केले जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
Khalapur Landslide LIVE Updates: इरसालवाडीमध्ये 48 कुटुंब राहत असून, साधारण 228 रहिवासी तिथं असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. खुद्द मुख्यमंत्री घटनास्थळी असून ते बचावकार्याचा आढावा घेत आहेत. शिवाय दुर्घटना पीडितांसाठी बेस कॅम्पची व्यवस्था करण्यात आली असून त्यांच्या खाण्यापिण्यापासून प्रथमोपचारापर्यंतची सोय केल्याचंही ते म्हणाले.
Khalapur Landslide LIVE Updates: रस्ता नसल्यामुळं घटनास्थळी जेसीबी जाण्यास अडचणी येत असल्याची माहिती देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे क्षेत्र दरड प्रवण क्षेत्रामध्ये येत नसल्याची बाब अधोरेखित केली.
Khalapur Landslide LIVE Updates: खराब हवामानामुळं बचाव कार्यात अडचण. प्रशासनाकडून हेलिकॉप्टरसाठी परवानगी नाही. मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळावरून घेतला परिस्थितीचा आढावा. उपमपुख्यमंत्री नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून.
Khalapur Landslide LIVE Updates: जुन्या मुंबई पुणे महामार्गालगत असणाऱ्या आदिवासी वाडीवर ही दरड कोरळली असून यामध्ये 6 जणांचा मृत्यू ओढावला आहे. इथं 25 हून अधिक घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली गेली असून त्यातून जवळपास 75 ते 80 जणांना ढिगाऱ्याबाहेर काढण्यात आलं आहे.