Mumbai Rain LIVE: पावसाने बेहाल झालेली मुंबई हळूहळू पूर्वपदावर, रेल्वे स्थानकातील गर्दी ओसरली

Wed, 19 Jul 2023-7:37 pm,

Mumbai Rain Live Updates: मुंबई, ठाणे, रायगडमधील शाळांना गुरुवारी सुट्टी. महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Weather LIVE Updates : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर अधिकाधिक वाढताना दिसत असून, मुंबईसह कोकण पट्ट्याला पावसानं झोडपून काढलं आहे. इथं विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही परिस्थिती वेगळी नसून, मुंबई लोकलवरही पावसाचा थेट परिणाम दिसून येत आहे. राज्यात येत्या काळात नेमका पावसाचा काय अंदाज असेल, हवामान खात्यानं नेमका काय अंदाज वर्तवला आहे, याची सविस्तर माहिती या लाईव्ह ब्लॉगमध्ये 


 

Latest Updates

  • Schools Closed Tomorrow : महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी करण्यात आल्यामुळे मुंबई, ठाणे, रायगड, पालघर शाळांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि कलेक्टर यांच्याकडून माहिती घेऊन ही सु्ट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातली आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. 

  • Mumbai Rain : रेल्वे स्टेशनच्या बाहेरुन बसेस सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. सीएसटीए,भायखळा दादर, घाटकोपर ठाणे स्थानकाच्या बाहेरून एसटी आणि बसेस सोडण्यात येणार आहे. तर चर्चगेट, मुंबई सेट्र्ल, दादर, वांद्रे, अधेरी आणि बोरिवली स्टेशनच्या बाहेर एसटी आणि बसेसची सोय करण्यात येणार आहे. 

  • Mumbai Rain : मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहिला मिळतं आहे. ठाण्यापुढे लोकल जात नसल्याने आज घरी कसं पोहोचणार असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. 

  • Mumbai Rain: मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ठाकुर्ली आणि कल्याणदरम्यान अंबरनाथ लोकल थांबली असताना एक महिला लहान बाळासोबत खाली उतरली. पण नाल्यात चार महिन्याचं बाळ वाहून गेल्याची दुर्घटना घडली. आताच मिळालेल्या माहितीनुसार एनडीआएफ जवानाने या बाळाला वाचवलं. 

     

    बातमी सविस्तर वाचा - मुंबईत नाल्यात वाहून गेलं 4 महिन्यांचं बाळ; लोकल थांबली असताना हातातून निसटलं

  • मुंबई मुसळधार पाऊस

    मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता मुंबई आणि परिसरातील मंत्रालय, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना घरी लवकर सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री

  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

    मध्ये रेल्वेची वाहतूक प्रचंड विस्कळीत झालीय. सीएसएमटी ते डोंबिवली अशीच वाहतूक सुरू आहे. डोंबिवलीच्या पुढे गाड्या जात नाहीयत. तर डोंबिवली ते सीएसएमटी आणि सीएसएमटी ते डोंबिवली वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. सकाळपासूनच ट्रेन्स रखडतायत. रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची मोठी गर्दी झालीय. सकाळपासूनच प्रवाशांचे हाल होतायत. 

  • Maharashtra Rain Updates : कल्याण कर्जत रेल्वे वाहतुक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद. या निर्णय़ामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल होत असून, कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकले आहेत. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकात दरम्यान रेल्वे रुळावर पाणी आल्याने अंबरनाथ ते कर्जत ही रेल्वे वाहतूक आधीच बंद  आहे. शासनाने पर्यायी व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी

     

  • Maharashtra Rain Updates : कल्याण मुरबाड मार्गावरील वाहतूक पूर्णपण ठप्प. पावसाचा जोर वाढत असल्यामुळं नागरिकांच्या अडचणी वाढल्या. 

     

  • मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे  वाहतूक बंद
    12123 – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन क्वीन (19 जुलै)
    12124 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन क्वीन (20 जुलै)
    11009 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - सिंहगड एक्स्प्रेस (19 जुलै)
    11010 – पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - सिंहगड एक्स्प्रेस (20 जुलै)
    11008 - पुणे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - डेक्कन एक्स्प्रेस (19 जुलै)
    11007 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - डेक्कन एक्स्प्रेस (20 जुलै)
    12128 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
    12127 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे इंटरसिटी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)
    22106 - पुणे - मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (19 जुलै)
    22105 - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पुणे - इंद्रायणी सुपरफास्ट एक्स्प्रेस (20 जुलै)

  • मध्य रेल्वे ठप्प

    कल्याण-ठाणे-कल्याण लोकल सेवा ठप्प झालीये.. तासाभरापासून कल्याणहून CMSTच्या दिशेनं एकही लोकल रवाना झालेली नाहीये. अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं रुळांखालची खडी वाहून गेलीय. अंबरनाथ बदलापूर परिसरातर सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दुरुस्तीच्या कामाला उशीर होतोय... त्यामुळे रेल्वे सेवा सुरू होण्यास बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. अंबरनाथ ते कर्जतदरम्यान लोकलसेवा ठप्प झालीय.. बदलापूर-अंबरनाथदरम्यान पाणी भरल्यानं लोकलसेवा ठप्प झालीय.. 

  • Maharashtra Rain Updates : जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शेतीसह तालुक्यातील अनेक भागात पावसाचे पाणी हे घरांमध्ये घुसल्याचे पाहायला मिळत आहे. रावेर तालुक्यातील सावदा या परिसरातील नाल्याला मुसळधार पावसामुळे नदीचे स्वरूप आले असून नाल्याचे पाणी हे गावातील लोकांच्या घरात शिरले आहे. त्यामळे नागरिकांना प्रचंड अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. 

     

  • Maharashtra Rain Updates : पोलादपूर तालुक्यातील सवाद माटवण रस्त्यावर पुराचे पाणी आल्याची माहिती मिळत आहे. माटवण फाट्याच्या पुढे रस्त्यावर 4 ते 5 फुटांपर्यंत पाणी सवाद गावात पाणी शिरायला सुरुवात झाल्यामुळं काही कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम यंत्रणांनी हाती घेतले आहे. 

  • Maharashtra Rain Updates : वसई विरार मध्ये काल रात्रीपासून दमदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या पावसाचा फटका आता मुंबई अहमदाबाद महामार्गाला बसला आहे. महामार्गावर पडलेले खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे गुजरात ते मुंबई दिशेने जाणारी वाहतूक ही संपूर्ण ठप्प झाली असून वर्सोवा पुलापासून वसई पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. 

     

  • Maharashtra Rain Updates : महाड मधील पुराच्या पाण्यात वाढ. सावित्री, गांधारी नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. मुख्य बाजारपेठेत दोन फुटांवर पाणी आल्याची माहिती आहे. या परिस्थितीमुळं सध्या हजारो वाहनं मुंबई गोवा महामार्गावर उभी आहेत. 

     

  • Maharashtra Rain Updates : तापी नदीच्या उगम स्थानावर मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे, हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडण्यात आले असून, पाण्याचा विसर्ग तापी नदीत सोडण्यात आला आहे. यापुढे पाणी पातळीत वाढ होत राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे. यामुळे सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातुन पुढील 3 ते 4 तासात साधारण ३० ते ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात येणार असून, तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीत आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये अशा सुचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आले आहेत

  • Maharashtra Rain Updates : मध्य मुंबईमध्ये जोर ओसरला. उपनगरांमध्ये मुसळधार सुरुच. मध्ये रेल्वेवर पावसाचा थेट परिणाम. पुढील दोन-तीन तासांत शहरात पुन्हा मुसळधार. 

     

  • Maharashtra Rain Updates : पावसाच्या माऱ्यामुळं वसईमध्येही सखल भाग जलमय झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक नेटकऱ्यांनी आपआपल्या भागातील पावसाचे व्हिड़ीओ सोशल मीडियावर शेअर केले. वसईचा असाच एक व्हिडीओ... 

  • Maharashtra Rain Updates : पावसाचा तडाखा पोलीस स्थानकालाही बसला. एएनआय या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केली पहिली दृश्य... 

     

  • Maharashtra Rain Updates : पुणे वेधशाळेचे महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार पुढील 2 ते 3 तासांमध्ये कोकण, मुंबई, पालघर या भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तिथं चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही परिस्थिती वेगळी नाही. 

  • Maharashtra Rain Updates : बदलापूर- अंबरनाथदरम्यान, अप आणि डाऊन मार्गावरील लोकलसेवा पूर्णपणे ठप्प; रेल्वेरुळांवर पाणी साचल्यामुळं घेतला निर्णय. 

  • Maharashtra Rain Updates : मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पुल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठं मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प झालेली आहे. नदी पुला पासून नविन कात्रज बोगद्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक, नागरिक, कामगार, विद्यार्थी हैराण झाले आहेत. 

  • Maharashtra Rain Updates : कोकणातील चिपळूण आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्यामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली असून नदीच्या पाण्याने धोकापातळी  गाठली आहे. चिपळूण शहरातील सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे. 

     

  • Maharashtra Rain Updates : कर्जतकडून कल्याणकडे येणारी वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद. मुसळधार पावसामुळे अप दिशेची वाहतूक थांबवण्याचा मध्यरेल्वेचा निर्णय. कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक मात्र सुरु. 

     

  • Maharashtra Rain Updates : रायगड जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी... 

    हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

     

  • Maharashtra Rain Updates : अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी.  वाकण ते खोपोली महामार्गावरील पाली येथील पुलावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाल्यामुळं दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. ज्यामुळं दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सुधागड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच. 

     

  • Maharashtra Rain Updates : रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. खालापूर तालुक्यात पावसाची संततधार सुरू असून पावसाचे पाणी रसायनी पोलीस ठाण्यात शिरले आहे. रसायनी पासून जवळच आपटा बाजार पेठेत रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले असून आजबाजुची घरे आणि दुकानात पाणी शिरले आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link