Manoj Jarange Mumbai Morcha LIVE: आझाद मैदानाबाबत निर्णय उद्या 12 वाजता - मनोज जरांगे

Fri, 26 Jan 2024-4:03 pm,

Manoj Jarange Maratha Reservation Morcha Live Updates: मराठा आरक्षणाची हाक देत मनोज जरांगे पाटील त्यांच्या लाखोंच्या संख्येनं एकवटलेल्या मराठा बांधवांसह मुंबईत दाखतल होत आरक्षणाचं आंदोलन आणखी ज्वलंत करणार आहेत.

Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मराठा आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, आतापर्यंत समाजाची फसवणूक झाली पण इथून पुढं तसं होऊ देणार नाही अशा निर्धाराच्या शब्दांसह मनोज जरांगे यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा समाजाचा आरक्षणासाठीचा मोर्चा आता मुंबईत दाखल होत आहे. मजल दरमजल करत लाखोंच्या संख्येनं एवटलेले हे मराठा आंदोलक मुंबई गाठत इथं आरक्षणाची मागणी उचलून धरणार आहेत. 


Latest Updates

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आझाद मैदानावरचा निर्णय उद्या
    आज रात्रीपर्यंत अध्यादेश दिला तर गुलाल उधळायला मुंबईत जाणार, पण नाही दिला तर उपोषणासाठी आझाद मैदानात जाणार. आझाद मैदानाचा निर्णय उद्या घ्यायचा आहे, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी जायचं नाही. मनोज जरांगे आरक्षणावर ठाम

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सरकारला निर्वाणीचा इशारा
    माझा मराठा समाजा इथे न्यायासाठी आला आहे. आमच्या मराठा समाजाला वाईट वागणूक दिली तर महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांना घरात न राहात मुंबईत धडक द्या. आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करु नका. अध्यादेश दिला तर आझाद मैदानात जाणार नाही. पण नाही दिला तर आझाद मैदानात धडक देणार असा निर्वाणीचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे सरकारकडे रात्रीपर्यंतचा वेळ दिला. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: तर आजची रात्र इथेच काढतो
    एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहाणार नाही, मराठावाडा हा सगळा कुणबी नोंदी सापडल्या आहेत. आता आजच्या रात्रीत सगेसोयरे अध्यादेश द्यावा, कायद्याचं सन्मान करुन आम्ही आझादा मैदानात जात नाही आजची रात्र इथेच काढतो आम्हाला मुंबईत यायची हौस नाही. पण आज संध्याकाळपर्यंत अध्यादेश द्या. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती नको
    मराठा बांधवांवर  टाकण्यात आलेले गुन्हे  मागे घ्यावे तस लेखी पत्र दिले नाही ते पत्र त्यांनी द्यावे, मराठा समाजाला 100 टक्के मोफत आरक्षण मिळावं,  मराठा आरक्षण मिळेपर्यंत नोकर भरती करू नका नोकरीत भरती करायची असेल तर मराठ्यांसाठी जागा रिक्त सोडा अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: तात्काळ प्रमाणपत्र घ्या नंतर तपासणी करा
    शिंदे समिती रद्द करणार नाही, त्याची मुदत दोन महिने वाढवली आहे. टप्प्यटप्प्याने वर्षभर मुदत वाढवली जाणार आहे. ज्याची नोंद नाही मिळाली त्याच्या गणगोताच्या  नोंदीवर  प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी होती. यावर ज्याचे संगेसोयरे यांना जर प्रमाणपत्र मिळावे तर त्याचा शपथपत्र घ्यावे आणि तात्काळ प्रमाणपत्र द्या नंतर त्याची तपासणी करा असं जरांगेंनी सांगितलं आहे.

     

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: ... तर नोकरभरती नको

    आरक्षण मिळेपर्यंत सरकारी नोकरभरती करायची नाही, जर भरत्या करायच्या असल्या तर मराठ्यांच्या जागा राखीव ठेवून करायच्या अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली. यावर सरकारची बाजूही त्यांनी आंदोलकांपुढे मांडली. 

    राज्यातील मुलींना केजी  टू पीजी शिक्षण देण्याचा निर्णय शासनानं निर्गमित केला. यावर मुलांना ही सूट न दिल्यामुळं जरांगेनी नाराजीचा सूर आळवला. सरकारनं निर्णय घेतले पण, या साऱ्याचा शासन निर्णय येणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: गुन्हे मागे घ्या... ; जरांगेंची मागणी 

    अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली असता सरकारनं मराठ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्याचा दावा केला. पण, अद्याप आपल्याला आदेशपत्राची प्रत मिळाली नसल्यामुळं आधी ते पत्र द्यावं अशी मागणी जरांगे यांनी केली. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सगेसोयरे... 

    ज्या मराठ्यांकडे नोंद नाहीये त्या मराठ्यांना नोंदी असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनी तो आपला नातलग असल्याचं शपथपत्र देणं अपेक्षित असेल. त्याच शपथपत्राच्या आधारावर त्या बांधवांना प्रमाणपत्र दिलं जाणार आहे, असं मनोज जरांगे यांनी 'सगेसोयरे' हा मुद्दा स्पष्ट करत म्हटलं. इथंही सरकारनं सगेसोयऱ्यांची चौकशी करावी आणि शंका आढळल्यास प्रमाणपत्र नाकारवं असंही ते ठामपणे म्हणाले. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: प्रमाणपत्राचं गणित 

    'इथं एका नोंदीवर पाच फायदे झाले तरी दोन कोटी मराठ्यांना आरक्षणाचा फायदा मिळतो. पण, वंशावळ जोडण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता समिती गठीत करण्यात आली आहे', अशी वस्तुस्थिती त्यांनी यावेळी मांडली. 

     

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: चर्चा झाली पण.... 

    चर्चा झाली खरी, पण मंत्रीमहोदय मात्र आले नाहीत. सरकारनं त्यांची भूमिका मांडली, आम्ही आपली भूमिका मांडली, असं म्हणत मनोज जरांगे यांनी उपस्थित आंदोलकांना संबोधिक करण्यास सुरुवात केली. जिथं त्यांनी मराठा नोंदी आरक्षणात सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र वाटप करा. 54 लाख नोंदी आहेत, नोंद नेमकी कोणाची आहे हे माहिती करायची असेल तर त्या पंचायतींना तुम्ही नावांची यादी द्या, अशा मागण्या सरकारच्या शिष्टमंडळासमोर मांडल्याचं स्पष्ट केलं. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    54 लाख नोंदींपैकी सध्या 37 लाख नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र दिल्याचा दावा सरकारच्या वतीनं देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 54 लाख मराठ्यांच्या नोंदी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळतील असं ग्राह्य धरु असं म्हणताना मराठ्यांनी मात्र सावध होत प्रमाणपत्रासाठी रितसर अर्जही करणं अपेक्षित असल्याचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. 

     

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates:रिकाम्या हातानं परत जायचं नाही- जरांगे 

    देशातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आपला शब्द सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं म्हणत मनोज जरांगे यांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन केलं. 'सरकारनं आता काही कागदपत्र दिली असून, त्यावर आपण चर्चा करणार आहोत. रिकाम्या हातानं परत जायचं नाही, फार फार तर काय...  तिथं मुंबईत जायला उशीर होईल पण झालेली चर्चा तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं', असं जरांगे म्हणाले. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: जरांगे- मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा 

    मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये अखेर बोलणं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोघांमध्ये दहा ते पंधरा मिनिटात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, यादरम्यान आंदोलन मागे घेण्यात यावं असं राज्य सरकारकडून जरांगेंना सांगण्यात आलं आहे. त्यासंदर्भात शासनाचे अनेक निर्णय जरांगे पाटील यांना दाखवण्यात आले आहेत. चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका - अजित पवार 

    मराठा आरक्षण अजित पवार म्हणाले की, "राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांच्या आंदोलनात लक्ष घालत आहेत. कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी भांगे जरांगे यांच्यासोबत चर्चा करत आहेत. आरक्षण मिळावं अशी आमची भूमिका आहे".

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: वाहतुकीत बदल 

    वाशी बस स्थानक परिसरात मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार असल्यामुळे वाशी बस स्थानक मध्ये येणाऱ्या सर्व गाड्या सायन पनवेल मार्गे अपडाऊन फिरवण्यात आलेले आहेत.कोपरखैरणे कडून वाशी कडे येणाऱ्या गाड्या पाम बीच मार्गे फिरवण्यात आलेल्या आहेत. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: जरांगेंच्या भेटीला सरकारचं शिष्टमंडळ 

    मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम असणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेनं येण्याचा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल झालं असून, आता या चर्चेतून काही तोडगा निघतो का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. सामाजिक न्याय मंत्री सचिव सुमंत भांगे, मंगेश चिवटे यांचा शिष्टमंडळात समावेश.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आझाद मैदानात काय परिस्थिती? 

    मुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंसाठी उभारण्यात येणारं स्टेजचं काम थांबवण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना. पोलिसांच्या नोटीशीविरोधात मराठा समन्वयकांची हायकोर्टात धाव.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: आझाद मैदानात काय परिस्थिती? 

    मुंबईतील आझाद मैदानावर जरांगेंसाठी उभारण्यात येणारं स्टेजचं काम थांबवण्याच्या मुंबई पोलिसांच्या सूचना. पोलिसांच्या नोटीशीविरोधात मराठा समन्वयकांची हायकोर्टात धाव.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मनोज जरांगेंना मुंबईत 'नो एन्ट्री'?

    मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आणि लाखो मराठा समर्थकांचं वादळ मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपलंय.. हे भगवं वादळ मुंबईत धडकल्यास राजधानी मुंबई ठप्प होण्याची भीती आहे. त्यामुळंच मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस पाठवून, आझाद मैदान तसंच शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यास परवानगी नाकारलीय. 
    मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. सकल मराठा समाज आंदोलक आपल्या वाहनांसह मुंबईत आल्यास त्याचा विपरित परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतूक व्यवस्था कोलमडणार आहे. त्यामुळं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे,अशी भीती मुंबई पोलिसांनी नोटिशीत व्यक्त केलीय. खारघरमधील इंटनॅशनल कॉर्पोरेशन पार्क आंदोलनासाठी संयुक्तिक राहिल, असंही या नोटिशीत पोलिसांनी सुचवलंय.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक 

    सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. कुणबी दाखल्यांच्या नोंदी मिळवण्याचं काम सुरू असल्याचं ते म्हणाले. तसंच जरांगेंना आंदोलन थांबवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. OBCना दिल्या जाणा-या सोयीसुविधा मराठ्यांना देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मराठा समर्थकांची गर्दी 

    मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात येणाऱ्या ध्वज रोहनाच्या ठिकाणी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधवांची जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. मनोज जरांगे पाटील ज्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबले आहेत त्या इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रम आहे.

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मनोज जरांगे यांची तब्येत बिघडली 

    मराठा आंदोलन मोर्चासह मुंबईच्या दिशेनं निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांना ताप आला असल्याची माहिती मराठा समन्वय समितीकडून देण्यात आली आहे. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशनाची तारीख बदलली 

    मराठा आरक्षणाच्या धर्तीवर जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्शवभूमीवर कोल्हापुरात होणारे शिवसेनेचे राष्ट्रीय अधिवेशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री देशभरातील नेते उपस्थित राहणार होते. कोल्हापुरात 29 आणि 30 रोजी होणार होते अधिवेशन मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नियोजित तारखेचे अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची  सूत्रांची माहिती आहे. 

  • Manoj Jarange Maratha Arakshan Live Updates: मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल 

    मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत आपल्या मागण्यांवर ठाम असणारे मनोज जरांगे नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहे. पहाटे साडेपाच वाजता जरांगे पाटील नवी मुंबईत पोहोचले. दोन तास विश्राती घेतल्यानंतर
    मार्केट आवारात ध्वजवंदन करणार असून, त्यानंतर ते इथं सभा घेणार आहेत. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link