Manoj Jarange Patil Sabha Live : 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Sabha Live : मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांच्या अल्टीमेटम आधीच सभा घेऊन आणखी एक मोठं आव्हान दिलं आहे. या सभेसाठी या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यामधील (Jalna) आंतरवाली सराटीमध्ये आज म्हणजेच 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची विराट सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असून सकाळपासूनच या सभेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली आहे. कितीही गर्दी झाली तरी मराठ्यांनो, आता घरी थांबू नका, कार्यक्रमाला या आणि एकजूट दाखवून द्या, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे. या सभेसाठी 5 हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. अगदी रुग्णवाहिकांपासून, पिण्याच्या पाण्यापर्यंत आणि प्रसाधनगृहांपासूनच वाहनतळांपर्यंत सर्व सोयी सभेच्या ठिकाण करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे सरकारला दिलेला 40 दिवसांचा अल्टीमेटम संपल्याने मराठा बांधवांसमोर आज मनोज जरांगे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Latest Updates
Manoj Jarange Patil Sabha Live : 24 ऑक्टोबरच्या आत आरक्षण दिलं नाही तर मी टोकाचं उपोषण करणार
"मी मराठा समाजाच्या पुढे जात नाही. आरक्षण मिळून दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही. फक्त शांततेत आंदोलन करा. आरक्षण कसं मिळत नाही हे मराठा समाज बघून घेईल. जर 24 ऑक्टोबरच्या आत आरक्षण दिलं नाही तर मी टोकाचं उपोषण करणार. एकतर माझी अंत्ययात्रा निघेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणाची विजययात्रा निघेल. पुढची दिशा 22 ऑक्टोबर रोजी तुम्हाला सांगितली जाणार. मराठा समाजाने सज्ज व्हा. मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय माघार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil Sabha Live : 22 ऑक्टोबरला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार
"आरक्षणाचा दिवस जवळ आला आहे. 22 ऑक्टोबर रोजी सगळ्या मराठा बांधवांना काय करायचं हे सांगण्यात येणार आहे. आंदोलन शांततेत होणार आहे. शांततेच्या आंदोलनाने मराठा समाज एक केलाय. 22 तारखेला मराठ्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. आज फक्त सरकारला विनंती आहे की, जमलेल्या मराठा समाजाची भावना लक्षात घ्या आणि दहा दिवसांच्या आत मराठ्यांना आरक्षण द्या. दिलं नाही तर पुढची जबाबदारी सरकारची असेल," असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
Manoj Jarange Patil Sabha Live : 'पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी'; मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
"ते पण उमपुख्यमंत्र्यांचे कार्यकर्ते आहेत असे लोक म्हणतात. उपमुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली आहे. ते तर मला म्हणाले की अटक करा. मराठ्यांची औलाद हिंसा करणारी नाही. यश मिळवण्यासाठी एक मराठा लाख मराठाची घोषणा दिली होती. आता मराठा लोक एकत्र आल्यानंतर सांगतात की हिंसा करणार आहे. मला अटक करणं सोप्प आहे का? मराठा लोकांच्या विरोधात आग ओकायचं कमी करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना समज द्या तो तुमचा कार्यकर्ता आहे. मराठा अंगावर घेऊ नका. मराठ्यांनी तुम्हाला 106 आमदार निवडून दिले आहेत. पंतप्रधानांनी देवेंद्र फडणवीसांना समज द्यावी. तुमच्यासाठी मराठ्यांनी काही पण केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण द्या हेच मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. मराठ्यांना विरोध करायचा बंद करतील," असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil Sabha Live : मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर नाव न घेता टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली आहे. एकजण म्हणाले सात कोटी रुपये खर्च झाले. ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांचे रक्त पिऊन पैसे कमावलेत. आम्ही 100 एकर जमीन विकत घेतली नाही. ही जमीन इथल्या शेतकऱ्यांनी आम्हाला भाड्याने दिली, असे जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil Sabha Live : मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा
मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मनोज जरांगे एक इंचही मागे हटणार नाही. आता सरकारला शेवटची विनंती करुन सांगतो मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गठीत केलेली समिती आता बंद करा. पाच हजार पानांचा पुरावा समितीला मिळाला आहे. त्याच आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करा. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्रिमंडळाला या कोट्यावधी मराठा समाजाच्या वतीने हातजोडून विनंती आहे की या राज्यातील सगळ्यात मोठ्या मराठा समाजाला विनंती आहे की आमची हाल करु नका. मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा.
Manoj Jarange Patil Sabha Live : राहिलेल्या दिवसांत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा - मनोज जरांगे पाटील
आज घराघरातील मराठा आयुष्यभर सांगणार आहे की मी या ऐतिहासिक सभेचा साक्षीदार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीने सरकारला विनंती आहे की तुमच्याकडे 20 दिवस आहेत. राहिलेल्या दिवसांत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करा. जो शब्द दिलाय त्यावर मराठा समाज ठाम आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Manoj Jarange Patil Sabha Live : मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्या मागण्या
आपली प्रमुख मागमी महाराष्ट्राच्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करावा, कोपर्डीमध्ये बलात्कार करणाऱ्या नराधमाला फाशी देण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या 45 बांधवांना निधी आणि सरकारी नोकरी द्यावी, दर दहा वर्षांना आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचे सर्वेक्षण करुन त्यातील प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्यात, सारथीमार्फत पीएचडी करणाऱ्यांना जास्तीचा निधी देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्यांच्या आत वेगळा प्रवर्ग करुन आरक्षण दिलं तरी चालेल पण एनटी, व्हीजेएनटी सारखा प्रवर्ग टीकायला हवा.
Manoj Jarange Patil Sabha Live : मनोज जरांगेंच्या महासभेसाठी लाखो महिला दाखल
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सारटी इथ होत असलेल्या सभेला सर्व वयोगटातील समाज एकवटला आहे. त्यातील महिलांचा सहभाग लक्षणीय आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : लाखोंचा जनसागर अंतरवाली सराटी येथे दाखल
अंतरवाली सराटी येथे आज मनोज जरांगे पाटील यांचे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलंय. जरांगे पाटलांनी आयोजित सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे समाजाला आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव या सभेला उपस्थित होत आहेत, पन्नास हजारपेक्षा अधिक वाहन येथे येतील असा अंदाज आयोजकांच्या वतीने वर्तविला जात होताय त्याप्रमाणे पार्किंगची सुविधा करण्यात आली होती, पण सदर सर्व पार्किंग जवळपास फुल झाल्याने आता मराठा बांधवांनी रस्त्याच्या कडेला, दुभाजकांवर पार्किंग करायला सुरुवात केली आहे. या सभेला किती मराठा समाज बांधव दाखल झाली आहेत, एकूण कितीजण या सभेला येतील हे सांगणे सध्या अवघड आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : 150 एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांची सभा
अंतरवली सराटीपासून दोन किलोमीटर अंतरावरील 150 एकर जागेवर ही सभा होणार आहे. जरांगे पाटील यांच्या सभेसाठी 15 फूट उंच स्टेज बांधला आहे. सभेत मनोज जरांगे पाटील यांच्या एन्ट्रीसाठी 500 फुटांचा रॅम्प बनवण्यात आला आहे. त्यामुळे स्टेजच्या चारही बाजूला जरांगे पाटील संवाद साधतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेसाठी 31 गावांनी निधी उभारला आहे. तसेच सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी चार ठिकाणी 100 एकरवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबत जालन्यात 1 हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यात आज शाळा बंद
अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यात आज शाळा बंद
अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यात आज शाळा बंद
अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यात आज शाळा बंद
अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : जालन्यात आज शाळा बंद
अंतरवाली सराटी गावामध्ये मनोज जरांगे यांच्या सभेला होणारी गर्दी पाहत जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच खाजगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
Manoj Jarange Patil Sabha Live : मनोज जरांगेंना अटक करा - गुणरत्न सदावर्ते
गुणरत्न सदावर्तेंनी मनोज जरांगे पाटील यांची सभा हिंसक होईल म्हणून त्यांना अटक करावी असं पत्र छत्रपती संभाजी नगर पोलिसांना लिहिलं होतं. त्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते हे कुणाचं पिल्लू आहे हे सगळ्यांना माहित आहे, चेल्यांना मी उत्तर देत नसतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं.