Aditya Thackeray : दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे अडचणीत?
Maharashtra Breaking News Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Latest Updates
सांगलीत धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या
Dhanagar Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर आरक्षणसाठीही आत्महत्या झाली आहे. सांगलीतील जतच्या कुणीकुन्नूर येथील आबाची वाडीतली ही घटना आहे. बिरुदेव वसंत खर्जे असं 38 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे. धनगर आरक्षण मागणीसाठी त्यानं आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठीत, त्यानं धनगर आरक्षण मिळण्याचा उल्लेख केला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
आदित्य ठाकरेंना अब्रुनुकसानीची नोटीस
Aditya Thackeray : दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.. आदित्य ठाकरेंना याप्रकरणी 19 हजार 750 कोटी रुपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस बजावण्यात आलीय. आदित्य ठाकरे यांनी खोटं शपथपत्र दाखल करून हायकोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोप करत मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी ही नोटीस पाठवलीय. हायकोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर कारवाईची मागणी पठाण यांनी केलीय. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरेंना ताब्यात घेत चौकशी करण्याची मागणी करणारी मूळ याचिका राशिद खान पठाण यांनीच केलीय. तर याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलंय.
जेजुरीच्या खंडोबाचं मुख्य मंदिर भाविकांसाठी खुलं
Jejuri Khandoba Temple : सा-या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडातील मुख्य मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलंय.. दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिन्यांपासून हे मंदिर बंद होतं.. मंदिर दुरुस्तीचे बहुतांश काम पूर्ण झाल्याने शनिवारपासून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला.. खंडोबा मंदिर भाविकांसाठी खुले झाल्याने दसऱ्यानंतर भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. खंडोबा देवस्थानतर्फे दसरा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे.. गडाला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये.. दस-याच्या दुस-या दिवशी गडावर कसरतीचे कार्यक्रम होतात. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात..
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'शब्द दिल्याप्रमाणे सरकारचं काम','कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देणार','इतर समाजावर अन्याय होऊ देणार नाही','कुणाचीही फसवणूक केलेली नाही','EWS जाहिरातीतून दिशाभूल नाही', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य.
Eknath Shinde Live | Marathi News LIVE Today : 'मराठा समाजातील आत्महत्या दुर्दैवी','सरकार मराठा आरक्षणाच्या बाजूनं','मराठा समजाच्या विकासाठी कटिबद्ध','राज्य सरकारकडून क्युरेटीव्ह पिटीशन','सुप्रीम कोर्टात याचिका दाखल','कुणबी दाखल्यांसाठी युद्धपातळीवर काम','मराठा-कुणबीच्या जुन्या नोंदी तपासण्याचं काम','मराठा बांधवांनी टोकाचं पाऊल उचलू नये', मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मराठा तरुणांना आवाहन
छ. संभाजीनगरात 500 कोटींचं कोकेन पकडलं
Cocaine seized in Sambhaji Nagar : छत्रपती संभाजी नगरात कोट्यवधींचे कोकेन पकडलं. 500 कोटींचं कोकेन पकडले असल्याची माहिती. डायरेक्टर ऑफ इंटिलेजिन्स (DRI) यांची कारवाई. डायरेक्टर ऑफ रिव्हेन्यू इंटेलिजन्स या केंद्र शासनाच्या अखत्यारीतील संस्थेचे पुण्यातील कार्यालयाकडून रेड. अहमदाबादमध्ये झालेल्या कोकेन कारवाईशी संबंध. 2 जणांना अटक, रोकड ही सापडल्याची माहिती.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : 'तालुक्यात, गावागावात कँडल मार्च काढा','25 ऑक्टोबरनंतरचं आंदोलन सरकारला झेपणार नाही','उपोषण सुरू करताना पुढचं आंदोलन कसं ते सांगणार','मला कुठल्याही वाटाघाटी नकोत','25 ऑक्टोबरपासून शांततेचं युद्ध', मनोज जरांगे यांचं वक्तव्य.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर उपोषण', 'मराठा समाजाला 25 ऑक्टोबरच्या आत आरक्षण द्या', मनोज जरांगे यांची राज्य सरकारकडे मागणी.
Manoj Jarange Live | Marathi News LIVE Today : '25 ऑक्टोबरपासून जरांगेंचं पुन्हा आमरण उपोषण','ना अन्न ना पाणी घेणार, वैद्यकीय उपचारही घेणार नाही','गावात एकही नेत्याला येऊ देणार नाही', मनोज जरांगे यांची घोषणा.
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका - मनोज जरांगे-पाटील
Manoj Jarange Patil : झी 24 तासच्या माध्यमातून जरांगे पाटलांनी मराठा तरुणांना आवाहन केलंय...मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका...आता मरायचं नाही, आरक्षणासाठी लढायचं...असं आवाहन आत्महत्या करणा-या तरुणांना जरांगे पाटलांनी केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
गुजरातमध्ये गरब्यानं घेतला 10 जणांचा जीव
Gujrat Garba News : गरबा जीव घेतोय...ऐकून धक्का बसला असेल गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 10 जणांचा मृत्यू झालाय...सूरत आणि वडोदरात गरबा खेळताना 3 जणांचा मृत्यू झालाय...तर सौराष्ट्रमध्ये गेल्या 24 तासात हार्ट अटॅकने 7 जण दगावलेत...मृत्यू झालेले सगळे 17 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती मिळतेय...सध्या नवरात्री सुरू असल्याने मोठ मोठ्या मंडळांकडून गरब्याचं आयोजन करण्यात आलंय...काही ठिकाणी कर्णकर्कश्य आवाजात डीजे लावले जातायत..तसंच गर्दीत बराच वेळ नाचल्यानेही अनेकांना त्रास जाणवतो...डीजेचा आवाज यमदूत ठरतोय...त्यामुळे तुम्ही गरबा खेळताना काळजी घ्या..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
पुण्यात संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती
Pune PMT Bus Driver : पुण्यात एसटी ड्रायव्हर संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळालं.. दारु ढोसून पीएमटी बस चालकाने 50 प्रवाशांनी भरलेली बस पळवली... वेताळबाबा चौकात या पीएमटी बसने दहा ते पंधरा गाड्यांनाही उडवलं.. दारुच्या नशेत हा ड्रायव्हर प्रवाशांनी भरलेली बस रिव्हर्सही चालवत होता.. बसमधले घाबरलेले प्रवासी मात्र जीवाच्या आकांताने किंचाळत होते, मदतीसाठी धावा करत होते.. अखेर कृष्णा जाधव नावाच्या व्यक्तीने जीवाची पर्वा न करता या बस ड्रायव्हरला रोखण्यात यश मिळवलं आणि मोठा अनर्थ टळला.. पीएमटी बसचा ड्रायव्हर निलेश सावंतविरोधात चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
देवेंद्र फडणवीस खोटारडे आणि अपयशी-राऊत
Sanjay Raut On Devendra Fadanvis : ड्रग्जमाफिया ललित पाटील हा नाशिक शिवसेना शहरप्रमुख काय तर शाखाप्रमुखही नव्हता.. असा दावा करत संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेला आरोप फेटाळलाय.. तसंच फडणवीस खोटारडे असल्याचा आरोपही राऊतांनी केलाय.. ललित पाटील हा शिवसेनेचा नाशिक शहरप्रमुख असल्याचा आरोप फडणवीसांनी केला होता. मात्र लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी फडणवीस आरोप करत असल्याचं राऊतांनी म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ललित पाटीलला ड्रग्स बनवण्यासाठी शिकवणारा ताब्यात
Lalit Patil Update : ड्रग्जमाफिया ललित पाटीलला ड्रग्ज बनवायला शिकवणा-या महागुरुला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. अरविंद लोहारे या केमिकल इंजिनिअरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. अरविंद लोहार याने अनेकांना मेफेड्रोन हे ड्रग्ज बनवण्याचं प्रशिक्षण दिलंय.. अरविंद लोहारे हा केमिकल इंजिनिअर असून चाकण ड्रग्ज प्रकरणात 2020 पासून येरवडा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. मात्र येरवडा जेलमध्येच अरविंद लोहारने ललित पाटीलला ड्रग्ज बनवण्याचा फॉर्म्युला शिकवला... मेफेड्रोन कसं तयार करायचं हे शिकवण्यासाठी लोहारने 35 लाख रुपये घेतले होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलं
Baramati : बारामतीमध्ये पुन्हा विमान कोसळलंय.. विमान कोसळण्याची चार दिवसातली ही दुसरी घटना आहे.. रेडबर्ड प्लाईट ट्रेनिंग सेंटरचं हे शिकाऊ विमान आहे.. गाडीखेलच्या सह्याद्री फार्मजवळ हे विमान कोसळलंय..या दुर्घटनेत पायलट ट्रेनर आणि प्रशिक्षणार्थी जखमी झालेत.. विमानात बिघाड झाल्यानं ही दुर्घटना घडलीये.. या आधी गुरुवारीही याच ट्रेनिंग सेंटरच्या विमानाला कटफळ इथं अपघात झाला होता.. लँडिंगवेळी हा अपघात झाला होता यावेळीही प्रशिक्षक जखमी झाले होते..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
ठाकरे गटाला तारीख पे तारीख
Thackeray VS Shinde : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतची सुनावणी आता दिवाळीनंतरच होणार आहे... निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिलं... त्याचविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेत आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलंय.. मात्र या याचिकेची सुनावणी आता दिवाळीच्या सुट्टीनंतर 20 नोव्हेंबरला होणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
CBIकडून सायबर भामट्यांचा पर्दाफाश
CBI Raid : सीबीआयने देशभरात 75 ठिकाणी छापेमारी करत सायबर भामट्यांना दणका दिलाय. ऑपरेशन चक्र-2 अंतर्गत करणा-या आलेल्या छापेमारीत 357 कोटींचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलं.. नोकरी देतो सांगत फसवणूक करणारे, कर्जाचं आमिष दाखवून गंडा घालणारे, अकाऊंटमध्ये पैसे जमा झाल्याचा मेल पाठवून लुबाडणा-या सायबर भामट्यांचा पर्दाफाश सीबीआयने केलाय. गुरुवार आणि शुक्रवारी असे दोन दिवस छापेमारी करत 5 राज्यातले 9 कॉल सेंटर्स उद्ध्वस्त करण्यात आलेत.. याच कॉल सेंटरमधून लोकांना लुबाडणारे फोन आणि मेल केले जात असत.. सामान्यांना गंडा घालून मिळवलेला हा पैसा 137 बनावट कंपन्यांद्वारे परदेशात फिरवल्याचंही समोर आलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धरमशालेत भारत आणि न्यूझीलंड भीडणार
India Vs Newzeland Match : वर्ल्ड कपमध्ये विजयाचा चौकार लगावणा-या टीम इंडियासमोर आज न्यूझीलंडचं आव्हान आहे.. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही टीम्सनी एकही मॅच गमावलेली नाही.. त्यामुळे आज धरमशालामध्ये महामुकाबला पाहायला मिळेल.. याआधी या दोन्ही टीम्स 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये आमनेसामने आल्या होत्या. तेव्हा न्यूझीलंडने भारताला फायनलमध्ये जाण्यापासून रोखलं होतं. तेव्हा या पराभवाचा बदला घेण्याच्या इराद्यानेही टीम इंडिया आज मैदानात उतरेल.. मात्र टीम इंडियाला मॅचआधीच दुखापतींचं ग्रहण लागलंय.. हार्दिक पांड्यानंतर आता ईशान किसन आणि सूर्यकुमार यादवही दुखापतग्रस्त असल्याची माहिती मिळतेय. तेव्हा प्लेईंग इलेव्हन निवडताना रोहित शर्माची डोकेदुखी वाढणार आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
धनगर आरक्षणासाठी सांगलीत दसरा मेळावा
Gopichand Padalkar : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवही आक्रमक झालेत.. भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वात आज धनगर बांधवांचा दसरा मेळावा पार पडणार आहे... धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणा-या बिरोबा बनात मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. महाराष्ट्रासह कर्नाटकातून एक लाख बांधव हजेरी लावणार असल्याचं पडळकरांनी सांगितलंय.. धनगर आरक्षण अंमलबजावणीसह ओबीसी आणि मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतची भूमिका पडळकर यावेळी स्पष्ट करणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
मनोज जरांगेंची पंतप्रधान मोदींना विनंती
Beed Manoj Jarange Patil : 26 तारखेला पंतप्रधान मोदींनी शिर्डीला येण्याअगोदर राज्य सरकारला मराठा आरक्षण द्यायला सांगावं...अशी विनंती मनोज जरांगेंनी पंतप्रधान मोदींना केलीय...तर मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घ्यावा...सरकारनं डोळे झाक करू नये...पंचवीस तारखेनंतरच आंदोलन कुणालाही पेलणार नाही...असा इशारा जरांगेंनी राज्य सरकारला दिलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर
Sharad Pawar And Ajit Pawar : राष्ट्रवादी फुटीनंतर पहिल्यादाच काका-पुतणे आज एकाच मंचावर एकत्र येणार आहेत. शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.. दौंड तालुक्यातील एका शाळेच्या नव्या वास्तूचं उदघाटन पवारांच्या हस्ते होणार आहे.. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत.. त्यामुळं या कार्यक्रमाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -