Maharashtra Political Crisis: येत्या तीन ते चार दिवसात मंत्री मंडळ विस्तार होणार, याच आठवड्यात शपथविधी

Shivraj Yadav Sun, 02 Jul 2023-7:49 pm,

Maharashtra Political Crisis Live Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत.

Maharashtra Political Crisis Update: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार राजभवनात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज होते. आपल्याकडे पक्षाची इतर जबाबदारी दिली जावी अशी त्यांची मागणी होती. त्याच नाराजीतून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला असल्याची चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


 

Latest Updates

  • जयंत पाटील यांची प्रतिक्रिया
    राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची 5 जुलै रोजी बैठक होणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. यशवंतर चव्हाण येंटर येथे बैठक होईल. काहीनी स्वतः. मंत्री मंडळात जाण्याची भूमिका घेतील. पक्षाची मान्यता न घेता शपथ घेतली. ज्या सदस्यांन बोलवले त्यांनी सर्वानी शरद पवार यांना फोनवर केला होता. काही आमदार माझ्या समवेत फोनवर बोलले. सत्तेत बहुमत असताना पुन्हा विरोधी पक्ष नेते फोडण्याचे काम केले, अशी टीका जयंत पाटील यांनी फडणवीस यांचं नाव न घेता टीका केली.

  • नऊ मंत्र्यांच्या शपथविधीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया

    अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने राज्याने पुन्हा एकदा राजकीय भूकंप पाहिला. यावर आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली असून फडणवीस साहेबांच उत्तम नियोजन आणि शिंदे साहेबांचा विकास पाहून अजितदादा या सरकारच्या प्रेमात पडले होते. सत्तेपेक्षा विकास कसा करावा हे अजित दादांच्या लक्षात आलं अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांच्या शपथविधीवर बच्चू कडू यांनी ही प्रतिक्रिया दिली असून कालपर्यंत खोके म्हणणारे लोक आज ओके होऊन सरकारमध्ये आले त्यांच आम्ही स्वागत आणि अभिनंदन करतो अश्या शुभेच्छा कडू यांनी दिल्या आहे.

  • Maharashtra Politics : अजित पवार यांनी 40 आमदारांना घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले. आज दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या पोस्टरवरील अजित पवारांचा फोटो फाडला. तर पोस्टरवरील सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या फोटोला कार्यकर्त्यांनी काळ फासलं आहे.  मुंबईतील राष्ट्रवादी कार्यालयासमोर नाराज कार्यकर्ते घोषणाबाजी देत आहेत. 

  • Ramdas Athawale on Maharashtra Politics : राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते अजितदादा पवार यांनी केलेले बंड हे अत्यन्त धाडसी आहे. त्यांच्या या धाडसी निर्णयाचे आपण स्वागत करतो.पुन्हा एकदा नव्याने  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल अजितदादा पवार यांचे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आज नव्याने मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे आपण अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली. 

  • Sharad Pawar Live : उद्धव ठाकरे, काँग्रेससोबत चर्चा करुन विरोधीपक्षनेतेपदाचा निर्णय घेणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करण्यात येईल. जे पक्षाच्या चौकटीबाहेर गेले त्या प्रत्येकावर कारवाई होणार, असं अजित पवार यांच्यावर कारवाई करणार का असं विचारल्यावर ते म्हणाले. 

  • Sharad Pawar Live : अजित पवार यांनी राष्ट्रवादीमधील काही आमदारांना सोबत घेत आज राज्यपालांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षावर थेट दावा केला आहे. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्टी केली. ते म्हणाले की, ज्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली, याचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रवादीच्या आमदारांवर केलेले भष्ट्राचाराचे आरोप खोटे होते. पक्षातील बंड हा माझ्यासाठी नवीन नसून 1980 लावली 56 आमदार सोडून गेले होते. दरम्यान 6 जुलै मी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

  • उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांनी आज धक्कातंत्राचा वापर करत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतली. यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत, नांदा सौख्य भरे, असं म्हटलं आहे. 

  • Ashok Chavan on Maharashtra Politics : शिंदे-फडवणीस सरकार अस्थिर असल्यामुळेच भाजपला फोडाफोडीचे राजकारण करावे लागतंय अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तसंच राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आपलं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं असून काँग्रेस आणि शिवसेनेची महाविकास आघाडी कायम राहिल, असा विश्वास त्यांना मी दिला असल्याचंही ते यावेळी म्हणाले. 

  • Ajit Pawar Deputy CM Live :  अजित पवार महाराष्ट्र सरकारमध्ये सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवार यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं छगन भुजबळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. तसंच आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सहभागी झालो आहोत असं सांगितलं आहे.

  • Ajit Pawar Deputy CM Live :  अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहे. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही. देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे, असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यांच्या कामाचं कौतुक केलं आहे. 

  • Sharad Pawar Live : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली. आता थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद आहे. 

  • Ajit Pawar Deputy CM Live : राज्याचे उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेतून त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विकासाला प्राधान्य द्यावं म्हणून हा निर्णय घेतला आहे. अजून मंत्रीमंडळाचा विस्तार होणार असंही ते यावेळी म्हणाले.  राष्ट्रवादीतील बहुसंख्य आमदार माझ्यासोबत असून मी शुक्रवारीच विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिली होता. राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी होणार आहे. 

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ''आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला . उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच ! तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला. ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं. बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार?''

     

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे. 

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी दिली आहे. 

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात अजित पवार आणि मी आम्ही तिघही मिळून विकास करणारं सरकार देऊ, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : अजित पवारानंतर छगन भुजबळ

  • Ajit Pawar Maharashtra Political Crisis LIVE : पहाटेचा शपथविधी अखेर प्रत्यक्षात उतरला! अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

  • Maharashtra Political Crisis Update: छगन भुजबळांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

  • Maharashtra Political Crisis Update: अजित पवार सरकारमध्ये सहभागी, घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

  • Maharashtra Political Crisis Update: अजित पवार राजभवनात दाखल, काही बोलण्यास नकार

  • Maharashtra Political Crisis Update: संजय राऊतांची शरद पवारांशी चर्चा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचां विडा काही लोकांनी उचलला आहे.त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले" मी खंबीर आहे. लोकांचा पाठिंबा आपल्याला आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू". होय,जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही असं ट्वीट त्यांनी केलं आहे. 

     

  • Maharashtra Political Crisis Update: मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राला मजबूत कऱण्यासाठी हे समीकरण जुळवण्यात आलं आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचं विधान

  • Maharashtra Political Crisis Update: सूत्रांच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळेंनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. तरीही अजित पवार आमदारांसह शपथविधी समारंभात पोहोचले. शरद पवारांचा पाठिंबा नाही अशी माहिती मिळत आहे. 

     

  • Maharashtra Political Crisis Update: अजित पवार प्रशासनात काम करणारं एक नेतृत्व आहे. अडीच वर्षांचा कारभार त्यांनी पाहिला आहे. अजित पवार यांनी गतिमान सरकारमध्ये राहण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं उदय सामंत यांनी सांगितलं आहे. 

     

  • Maharashtra Political Crisis Update: राजभवनातील अधिकाऱ्यांना लवकर येण्याच्या सूचना, 4 वाजता शपथविधी होण्याची शक्यता

  • Maharashtra Political Crisis Update: राजभवनात शपथविधीची तयारी सुरु असल्याचा फोटो समोर

  • Maharashtra Political Crisis Update: सुप्रिया सुळे फोनवरुन शरद पवारांच्या संपर्कात, शरद पवार सध्या रोहित पवारांसह पुण्यात

  • Maharashtra Political Crisis Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाहेर आल्यावर सविस्तर सांगू अशी माहिती दिली आहे. 

     

  • Maharashtra Political Crisis Update: अजित पवार यांच्यासोबत कोण आमदार आहेत?

    दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे

  • Maharashtra Political Crisis Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल

  • Maharashtra Government Live Update: अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, विश्वसनीय सुत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिवसेना आणि भाजपाचेही प्रत्येकी तीन ते चार जण शपथ घेणार असल्याची माहिती आहे. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link