Team India Victory Parade LIVE Updates: चॅम्पियन टीम इंडिया वानखेडेवर पोहोचली, विराट रोहितसह खेळाडूंचा जल्लोष

Thu, 04 Jul 2024-9:07 pm,

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर

Team India Victory Parade Live Updates: मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं.... अशा महत्वाच्या लाईव्ह अपडेट्स जाणून घ्या एका क्विकवर

Latest Updates

  • आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना होतील... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... विशेष बसमधून ते वानखेडे स्टेडियमवर पोहोचतील.. त्याठिकाणी विश्वविजेत्या टीमचा जंगी सत्कार करण्यात येईल. हा सोहळा पाहण्यासाठी वानखेडेवरही क्रिकेटप्रेमींची तोबा गर्दी केलीय...

  • भारतातले तमाम क्रीडाप्रेमी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण येऊन ठेपलाय. टी-20 विश्वचषक जगज्जेते ठरलेली टीम इंडियाची बस नरिमन पॉईंट परिसरात दाखल झालीय... आपल्या लाडक्या विजेत्या क्रिकेटपटूंच्या स्वागतासाठी मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय... हे चॅम्पियन्स विशेष बसनं हॉटेल ट्रायडंटमधून वानखेडे स्टेडियमच्या दिशेनं रवाना होतील... विजेत्या टीमची झलक पाहण्यासाठी नरिमन पॉईंट परिसरात क्रिकेटप्रेमींनी तुफान गर्दी केलीय..

  • मरीन ड्राईव्हवर अक्षरशः जनसागर लोटला आहे. टीम इंडियाच्या स्वागतासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी तोबा गर्दी केलीय... विमानतळापासून वानखेडे स्टेडियमपर्यंत जागोजागी मुंबईकर वर्ल्ड चॅम्पियन्सच्या स्वागतासाठी सज्ज झालेत... 2007 साली पहिल्यांदा टी २० वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईकरांनी मोठ्या जल्लोषात टीम इंडियाचं स्वागत केलं होतं... यंदा बार्बाडोसमध्ये टीम इंडियानं दुस-यांदा टी 20 वर्ल्डकप जिंकला.. आता त्याच विश्वविजेत्यांच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरिन ड्राईव्हवर तोबा गर्दी केलीय...

     

  • पुणे: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी अडवल्या प्रकरणी ग्रामस्थांवर कारवाई

    सरपंच आणि उपसरपंचासह उरुळी कांचन ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल

    संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या उरुळीकांचन विसाव्यादरम्यान पालखी नियोजनावरून सोहळ्याचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्यात झाला होता वाद

    विश्वस्तांकडून विसाव्याचे ठिकाण बदलण्यात आल्यामुळे ग्रामस्थांनी अडवला होता नगाऱ्याचा गाडा

    मंदिरामध्ये पादुका ठेवण्याऐवजी महात्मा गांधी विद्यालयात विसावा घेण्यास ग्रामस्थांचा विरोध

    विरोधात रूपांतर वादात झाल्याने पोलिसांचा हस्तक्षेप आणि गुन्हा दाखल

  • भारतीय संघाचं स्वागत करतो, पण बस गुजरातमधून का आणली? आदित्य ठाकरेंची विचारणा

  • भारतीय क्रिकेट संघ टी २० वर्ल्ड कप घेऊन मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर साडे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास पोहचणार

  • मुंबई विकली जात आहे.भूखंड अदानीला दिले जात आहेत, असा आरोप विजय वड्डेटीवार यांनी केलाय.
    कुर्ल्यातील दुग्धविकास विभागाची जमीन स्वस्त दरात देण्यात आली.कोण आहे हा एवढं मेहरभान का होताय?
    मिठाग्रहाची जागा एक इंच देणार नाही असं भाजपचा एक नेता बोलला होता. ही जागा देण्यात आली.अदानी मुंबई लुटत आहे. हिंमत असेल सरकारने उत्तर द्यावं. मुलूंडचाही भूखंड अदानीला दिला जातोय विरोधकांनी आक्रमक होत सभात्याग केला

  • परिषदेच्या महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना कळविण्यात येते की, दिनांक ०७ व २७ जुलै, २०२४ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे खालील १५ सदस्य निवृत्त होणार आहेत :-

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    १) विलास विनायक पोतनीस

    २) . निरंजन वसंत डावखरे

    ३) किशोर भिकाजी दराडे

    ४) कपिल हरिश्चंद्र पाटील

    ५) अॅङ अनिल दत्तात्रय परब

    ६) महादेव जगन्नाथ जानकर

    ७) डॉ. मनिषा श्यामसुंदर कायंदे

    ८) विजय ऊर्फ भाई विठ्ठल गिरकर

    ९) अब्दुल्ला खान अ.लतिफ खान ऊर्फ बाबाजानी दुर्राणी

    १०) . निलय मधुकर नाईक

    ११) रमेश नारायण पाटील

    १२) रामराव बालाजीराव पाटील

    १३) डॉ. मिर्झा वजाहत मिर्झा अथर

    १४) डॉ. प्रज्ञा राजीव सातव

    १५) जयंत प्रभाकर पाटील

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 जुलै महिन्यात मुंबई दौऱ्यावर
    लोकसभा निकालानंतर मोदींचा पहिलाच मुंबई दौरा
    पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गोरेगांव मुलुंड लिंक रोड आणि बोरिवली ठाणे लिंक रोड या भुयारी मार्गांचे भूमिपूजन
    विविध विकासकांच्या भूमीपूजनासाठी नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार
    लोकसभा निकालानंतर आता केंद्रिय नेत्यांचं विधानसभा होणाऱ्या राज्यांकडे लक्ष
    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व

  • सुनील केदार यांना दिलासा नाही, उच्च न्यायालयाचा  शिक्षेला स्थगिती देण्यास नकार

  • वसंत मोरे आज उद्धव ठाकरे यांची भेट घेणार..दुपारी साडेबारा वाजता वसंत मोरे उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     वसंत मोरे यांच्यासोबत संजय राऊत आणि  शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते  हे सुद्धा मातोश्रीवर  उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी येणार आहेत

    लवकरच शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे 

     त्याआधी आज उद्धव ठाकरे यांच्यासोबत वसंत मोरे मातोश्रीवर चर्चा करतील

     लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा  आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी  वसंत मोरे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली होती

     मात्र काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उमेदवार दिल्याने  वसंत मोरे यांना उमेदवारी मिळू शकली नाही

     त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कडून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती 

     आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करता  वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करतील अशी माहिती

  • Breaking News Live Updates: भारतीय क्रिकेट संघाचे आज दिल्ली विमानतळावर आगमन झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन करण्यात आलं

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री शंभूराज देसाई हे बेपत्ता झाले असून त्यांना शोधून आणणाऱ्यास कोंबड्याच बक्षीस देण्यात येईल अशा आशयाचे बॅनर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथे भर बाजारात लावण्यात आलाय

  • अजित पवारांवरील भ्रष्टाचा-याच्या आरोपांवर उत्तर महाविकासआघाडीनं नाही तर महायुतीनंच द्यावं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय. 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अजितदादांच्या व्हिडिओवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

    'अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप फडणवीसांनी केलेत'
    'भ्रष्टाचाराच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर द्यावं',अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलीय.

  • पावसाळा सुरू झाल्यानंतर डेंगूसह साथीचे रोग पसरण्याला सुरुवात होते. छत्रपती संभाजी नगर शहरातही डेंग्यूचा रुग्ण आढळून आल्याने महापालिकेची आरोग्य यंत्रणा चांगलीच सतर्क झालीय.डेंग्यूची साथ रोखण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या तपासणी मोहिमेत 142 घरांमध्ये डासांची अंडी आढळून आली त्यामुळे आरोग्य विभागाकडून साथीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम सुरू आहे. तर औषध फवारणी करून ही अंडी नष्ट करण्यात आली असून आतापर्यंत शहरातील 7705 घरांची तपासणी केली आहे. सद्यस्थितीला शहरात डेंग्यूचे दोन संशयित रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे डासांची अंडी आढळलेल्या भागावर महापालिकेकडून विशेष लक्ष दिल जात असल्याच प्रशासनाने सांगितलय.
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आमली पदार्थ सापडल्याच्या घटनेची सरकारकडून गांभीर्याने दखल

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात हे पर्याय नोंदविण्यात आला आहे कुलगुरूंनी चार सदस्य समिती स्थापन केल्याची चंद्रकांत पाटलांची माहिती

    समितीचे कामकाज सुरू असून अहवाल आल्यानंतर तात्काळ दोषीवर कारवाई करणार.

  • कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आजरा तालुक्यातील साळगाव इथल्या बंधाऱ्यावर पाणी आल्याने रस्ता बंद

    वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू

    तर चंदगड तालुक्यातील हिंडगाव इथल्या इब्राहीमपूर पुलावर घटप्रभा नदीचे पाणी आल्याने वाहतूक बंद

    या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू करण्यात आलेली आहे

  • ड्रग माफिया ललीत पाटील याला ससून हाँस्पीटलमध्ये एक्स रे साठी घेऊन जाणारे आणि ललीत पाटील पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षास तीन तास उशीरा देणार्या दोन पोलीसांना शासकीय सेवेतून काढून टाकण्याचे आदेश.(removal from gov.service) पोलीस हवालदार आदेश शिवणकर आणि पिराप्पा बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. हे दोघे ललीत पाटील सोबत एक्सरे साठी गेलेच नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.

  • गुणरत्न सदावर्ते आणि आणि जयश्री पाटील यांच्या अटकेच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेचा पुण्यात आक्रोश मोर्चा, 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पुण्यातल्या सहकार आयुक्त कार्यालयावर आज निघणार निघणार आक्रोश मोर्चा 

    एसटी को-ऑप बँकेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटकेची मागणी

    संचालक पद रद्द करूनही सदावर्ते पती-पत्नीचा बँकेत हस्तक्षेप असल्याचा आरोप

  • टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टीम इंडिया आज सकाळी विशेष विमानानं दिल्लीत दाखल झाली. भारतीय संघानं 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस इथं रंगलेल्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलंय.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

     

    वर्ल्डकप जिंकल्यापासून टीम इंडिया भारतात कधी दाखल होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर टीम इंडियाचं आज सकाळी 6 वाजता दिल्ली विमानतळावर आगमन झालं. दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर एक-एक करुन भारतीय संघाचे खेळाडू बाहेर आले.

     

    त्यावेळी भारताचा कर्णधार रोहित शर्मानं तमाम भारतीय क्रिकेटप्रेमींचे डोळे जी गोष्ट पाहण्यासाठी आसुसले होते, तो वर्ल्डकप दाखवला.

     

    वर्ल्डकप पाहून विमानतळावरील क्रिकेटप्रेमींनी एकच जल्लोष केला. त्यानंतर टीम इंडियाचं दिल्लीच्या आयटीसी मौर्य हॉटेलमध्येही जल्लोषात स्वागत झालं. चाहत्यांच्या गराड्यात खेळाडूंनी हॉटेलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियासाठी इथं एक खास केक देखील तयार करण्यात आलाय. 

  • श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचाऱ्यांचे उद्या देवाचे नित्योपचार काळ वगळून काम बंद आंदोलन

    महाराष्ट्र नव निर्माण सेना तालुका अध्यक्षाने भक्त निवास मधील कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याचा आरोप

  • राज्यातील धरणांचा पाणीसाठा अद्यापही तळाला; पुणे, औरंगाबादमध्ये कमी साठा..अमरावती, विदर्भात तुलनेने जास्त, तर पुणे आणि औरंगाबाद विभागांत सर्वांत कमी पाणीसाठा आहे.

  • सासवडचा मुक्काम आटोपून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुढे प्रस्थान झालीये. सासवडकरांचा पाहुणचार घेऊन माऊली पंढरी कडे निघालेत. टाळ मृदुंगाच्या गजरात, अभंग गवळणी गात लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसह पंढरी कडे निघालेत. आज जेजुरीत माऊलींच्या पालखीचा मुक्काम असणार आहे. दरवर्षी खंडोबा नगरी जेजुरीत माऊलींच्या पालखीचं भंडाऱ्याची मुक्त उधळण करून स्वागत केले जाते. भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीने अवघा आसमंत न्हाऊन निघतो. तो क्षण याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांचा मेळा आज जेजुरी नगरीत दाखल होणार आहे.

  • पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विविध यंत्रणांच्या सक्रिय सहभागाच्या माध्यमातून उपाययोजना राबवण्यात याव्यात. तसेच मोठ्या प्रमाणात रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे विलगीकरण करत तात्काळ उपचार करण्याला प्राधान्य द्यावे. यासाठी सर्व यंत्रणांनी पावसाळी आजारांच्या प्रतिबंधासाठी एकत्रित पद्धतीने प्रयत्न करावेत, असे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link