Bike Loan News : आर्थिक वर्ष संपायला काही दिवस असल्याने बँके तसेच कर्ज देणाऱ्यांकडून वसुलीचा तगादा लावण्यात येतो. मात्र, एखादा हप्ता मागेपुढे झाला तर पेनल्टीबरोबर मोठी कारवाई करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.  एका शेतकऱ्यांने दुचाकी हप्ते न फेडल्याने फायनान्स कंपनीने चक्क बाईक जप्त केली. ही जप्त केलेली बाईक दुसऱ्या वाहनाने नाही तर जे कारवाई करण्यासाठी ज्या बाईकवरुन आले होते. त्याच बाईकवर मध्ये टाकून घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संभाजीनगरात कर्जाने घेतलेल्या बाईकचे हफ्ते थकवल्याने कर्ज देणाऱ्या कंपनीने ग्राहकावर थेट कारवाई केली आहे. कर्जाचे हफ्ते थकवल्याने कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी बाईकच उचलून नेली आहे. ही बाईक कारवाईसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या बाईकवरूनच उचलून नेली. रोटेगाव येथील कर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून बाईकच्या कर्जापोटी साधारणतः दहा हजार रुपये संस्थेचे बाकी होते. त्यावर व्याजाची रक्कमही आकारण्यात आली.


मात्र, कर्जाच्या परतफेडीची मुदत संपल्यानंतर संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित कर्जदाराकडे तगादा सुरू केला. संबंधित कर्जदाराने प्रतिसाद न दिल्याने वित्तीय संस्थेने कर्मचाऱ्यांना दुचाकी जप्त करुन आणण्याचे आदेश दिले. त्यानंतर कर्मचारी दुचाकीवरून कर्जदाराच्या घरी गेले असता तेथे कर्जावर घेतलेली दुचाकी उभी होती. कर्मचाऱ्यांनी मागचा पुढचा विचार न करता ती दुचाकी उचलून थेट त्यांनी आणलेल्या दुचाकीवर ठेवून वैजापूर येथे संस्थेच्या कार्यालयात आणली