नागपूर : शेतकरी कर्जमाफीच्या रकमा आजपासून बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सरकारनं जाहीर केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतरं 18 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फ़डणवीसांच्या हस्तेकर्जमाफीची प्रमाणपत्र देऊन मुंबईसह राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कागदोपत्री पहिल्या टप्प्यात 8 लाख 40 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली. 


प्रत्यक्षात मात्र अद्याप एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. आज सकाळपर्यंत जिल्हा बँकांमध्ये पैसे जमा झालेले नसल्याचं राज्याच्या अनेक भागातून पुढे येतय. 


आज सकाळी बँकांचे व्यवहार सुरू होऊन आता जवळपास एक ते दीड तास उलटलाय. पण अद्याप खाती रिकामीचं असल्याचं पुढे आलंय.