मुंबई : राज्यात लॉकडाऊनचा पावचा टप्पा १ जून पासून सुरू होणार आहे. हा लॉकडाऊन ३० जूनपर्यंत असणार आहे. या लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली जाणार आहे. ३,५ आणि ८ जून रोजी वेगवेगळे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. शालेय विभागाने देखील शाळांबाबत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ३० जूनपर्यंत राज्यात कुठेही शाळा सुरू होणार नाही. मात्र जून महिन्यात शाळेचं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. त्यामुळे शाळांनी त्यांना जमेल त्या स्वरूपात म्हणजे ऑनलाईन अथवा ऑफलाईन शिक्षण सुरू करायचे आहे. लॉकडाऊनमध्ये शिक्षण सुरू होणार आहे पण शाळा नाही, असा महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.


मुख्यमंत्र्यांनी शालेय विभागाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. जून पासून शिक्षण सुरू करावे. मात्र त्याकरता शाळाच सुरू कराव्यात असे नाही.


२. ऑनलाइन, ऑफलाइन  अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे.


३. मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.


४. शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये. 


५. ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल. 


६. ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी  इतर पर्याय तसेच ऑनलाइन  शिक्षण सुरू करावे.


हे देखील वाचा - असा असणार राज्यातला लॉकडाऊन ५.०


७. जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेणं महत्वाचे आहे. त्यामुळे जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. 


८. कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.



९. गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र  स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी  विकसित करावी असेही ते म्हणाले.