मुंबई : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर महाराष्ट्रातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता राज्यातील लॉकडाऊन २ आठवडे म्हणजे ३० एप्रिलपर्यंत वाढवणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महत्वाचे मुद्दे


महाराष्ट्रात ३३ हजार चाचण्या झाल्या. यातील मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या..यामध्ये १००० जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले. ६० ते ७० टक्के कोरोना पॉझिटीव्हपैकींची लक्षणे ही सौम्य आहेत. 


मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. पण यामध्ये देखील वयोमान, प्रकृती पाहता हा धोका पोहोचतो आहे. 


हृदयविकार, रक्तदाब असे आजार असलेल्या व्यक्ती तसेच शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण यात येते.


घराबाहेर पडू नका. घरातील वयस्कर नातेवाईकांना जपा. त्यांच्यापासून अंतर बाळगा असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.


परिस्थिती नियंत्रणात असली तर गाफील राहून चालणार नाही 


मला कोरोनाचे प्रमाण शुन्यावर आणायचे आहे. 


आपण घरोघरी जाऊन चाचणी करतोय. 


पुढे संक्रमित होणारी चाचणी आपण तोडतोय. ही तोडायला वेळ लागेल. 


१४ तारखेनंतरही मी लॉकडाऊन कायम ठेवणार असे मी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सांगितले. त्यानुसार हे लॉकाडाऊन किमान ३० एप्रिलपर्यत सुरु ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 


दरम्यान प्रत्येक गोष्टीची माहिती मी वेळोवेळी देत जाईन असेही त्यांनी स्पष्ट केले.