उस्मानाबाद : कोरोनाचे संकट असल्याने सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनमुळे काही लोक अनेक ठिकाणी अडकले आहेत. तर  काहींच्या घरचा किराणा संपला आहे. उस्मानाबादेत अशीच एक घटना एका कुटुंबाची पुढे आली आहे. किराणा संपलाय हो, आम्ही उपाशी आहोत, आम्हालाहीण धान्य द्याना, अशी आर्त हाक हतबल कुटुंबाने दिली आहे. त्यांनी फोन करुन आपल्या भागातील एका नगरसवेकाला सांगितली. आता आई या जगात नाही हो, आम्ही दोघेच घरात आहोत. घरातील किराणा संपला आहे. आम्ही उपाशी आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उस्मानाबाद शहराचे नगरसेवक यांना ह्दय पिळवणारा एक कॉल आला. तो कॉल होता घरातील किराणा संपलेल्या हतबल एका विकलांग मुलीचा. आम्ही उपाशी आहोत, आम्हाला ही धान्य द्या. आम्ही कसे तरी दिवसाआड स्वयंपाक करीत आहोत. आमची आई देवाघरी गेली आहे. मी आणि माझा भाऊ दोघेच घरात आहोत.आई जाण्यापूर्वी किराणा भरला होता. आता तो संपलाय, अशा मोडक्या भाषेत तिने आपली व्यथा नगरसेवक युवराज नळे यांच्याकडे मांडली. 


एक महिन्यापूर्वी घरात करती असलेली आई अचानक गेली आणि भाऊ बहिणीवर उपासमारीची वेळ आली. कुटुंबात दोघेच आहेत, मुलगा विकलांग आहे आणि मुलगी पण काहीशी विकलांग आहे. या कॉलनंतर युवराज नळे यांनी त्यांच्या घरातील सध्याचा तरी प्रश्न मिटवला आहे. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.