नाशिक : कोरोनाचे संकट असल्याने संचारबंदी आणि लॉकडाऊन करण्यात आले आहे. जेणेकरुन नागरिक आपल्या घरात राहतील आणि कोरोनाचा होणारा फैलाव रोखला जाईल. मात्र, नाशिकमध्ये एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. लॉकडाऊनमध्ये गुंडांनी दंगा घातला आहे. या गुंडाना चौकात बसायला विरोध केल्याने नागरिकांच्या घरांवर त्यांनी जोरदार दगडफेक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्ये गावगुंडांना काही पोलिसांची भीती राहिली आहे की नाही असा प्रश्न आता पडलायला गाल आहे. चौकात बसायला विरोध केल्याने नागरिकांच्या घरांवर दगडफेक करण्यात आली. १४ ते १५ जणांच्या टोळक्याने सर्वसामान्यांच्या घरांवर जोरदार दगडफेक केली. या गावगुंडांची दगडफेक सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात  लॉकडाऊन सुरू असताना सिडको भागात मात्र टवाळखोर गुंडांचा उपद्रव सुरु आहे. चौकात बसायला विरोध केला म्हणून १४ ते १५ जणांच्या टोळक्याने थेट परिसरातील नागरिकांच्या घरावर दगडफेक करीत अनेक दुचाकी सायकल रस्त्यावर पाडून दहशद निर्माण केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून कारवाईची मागणी करण्यात केली जात आहे.