भिवंडी : भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठीची मतदानयंत्र ठेवलेल्या शाळेबाहेर एका इनोव्हा कारमध्ये चक्क होमहवन सुरू असल्याच्या बातमीनं एकच खळबळ उडालीय. इथल्या एलकुंदे प्रेसिडेंन्सी स्कूलच्या स्ट्राँग रुममध्ये सध्या मतदानयंत्रं ठेवलीत. मात्र शाळेबाहेर होमहवन सुरू असल्याची बातमी समजताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी होमहवन करण्यास आक्षेप घेतला. एवढ्यात पोलीसही घटनास्थळी पोहोचले. 


मतदानयंत्रात हेराफेरी करण्यासाठी होमहवन सुरू असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. तर सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी होम करत असल्याची माहिती श्रीकांत पंदिरे यांनी दिली. आपण या शाळेचेच कर्मचारी असल्याचा दावाही त्यांनी केलाय. त्यामुळं ही नेमकी काय भानगड आहे? याचा तपास आता पोलीस करत आहेत.