जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : आज मतमोजणीचा दिवस असला तरी धाकधूक वाढली नसून माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास नागपूरचे कॉंग्रेस उमेदवार नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. प्रचारासाठी कमी वेळ मिळाला तरीही शक्य तेवढ्या मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी 'झी 24 तास' शी बोलताना सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपुरातील मतदान पार पडल्यावर देशातील १५ राज्यात प्रचारासाठी  फिरण्याची संधी मिळाली. त्यामध्ये देशात मोदी सरकारविरोधात संतापाची लाट असल्याचे दिसून आले आहे. यंदा विदर्भासह राज्यात वंचित आणि तिसऱ्या आघाडीचा प्रभाव नव्हता. नागपुरात ५ लाखांच्या मताधिक्याने निवडून येईन तर सेक्युलर मतांमुळे आम्ही विदर्भातील दहाही जागा जिंकणार असा दावाही नाना पटोले यांनी केला आहे.



२००४ मध्ये भाजप सरकार येईल तसेच दिल्ली विधानसभ निवडणुकीत देखील भाजप सरकार येईल असे भाकीत एक्झिट पोलने दिले होते. मात्र ते सपेशल खोटे ठरले तसेच यावेळचे एक्झिट पोलचे अंदाज देखील चुकतील आणि देशात पुन्हा युपीएचे सरकार येईल असा दावा नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.