पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तसे चांगले आहेत पण निवडणुकी दरम्यान ते उन्माद दाखवतात असे पवार म्हणाले. व्यक्तीगत हल्ला आणि आरोपांपासून दूर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ही जबाबदारी पंतप्रधान मोदींनी घेतल्याचा टोलाही त्यांनी लगावला. कोणावरही व्यक्तीगत हल्ला करु नका असे त्यांनी कार्यकर्त्यांना म्हटले. अहमदनगरमधील शेगावमधील एका प्रचार सभेत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आपल्या परिवारात वाद आहेत असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांवर शरद पवारांनी निशाणा साधला. असे व्यक्ती परिवार वादावर आरोप करताहेत ज्यांना परिवाराचा अनुभव नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नियंत्रण सुटत चालले आहे. पवारांच्या घरातच वाद सुरू आहेत. अजित पवारांचेच घरात ऐकले जाते. पवार आता एकत्र नाही आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला होता. आम्ही संस्कारी वातावरणात लहानाचे मोठे झाले आहोत आणि आम्हाला आमच्या आईने मूल्य शिकवल्याचे पंतप्रधान म्हणाले. 



प्रत्येक ऐऱ्या-गैऱ्याच्या टीकांची पर्वा मी करत नसल्याचे पवारांनी पंतप्रधानांचे नाव न घेता म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्याची झोप उडाली आहे. कारण त्यांची झोप दिल्लीतील तिहाडमध्ये कैद आहे. असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. पण हे वक्तव्य कोणाला उद्देशून आहे हे त्यांनी स्पष्ट केले नव्हते. व्यावसायिक दीपक तलवारकडे त्यांचा निशाणा होता. ज्याला या वर्षाच्या सुरूवातीस अटक करण्यात आली आहे.