लातूर : औसामध्ये आज युतीची सभा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ३ वर्षाने एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी काँग्रेसवर टीका करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. काँग्रेस ही पाकिस्तानच्या बाजुने बोलत आहे. काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान बनावा या विचाराच्या बाजुने काँग्रेस आहे. काँग्रेसने देशाची फाळणी केली. नाहीतर पाकिस्तान झालाच नसता. काँग्रेस देशविरोधी गोष्टींचं समर्थन करते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'आमची संस्कृती आणि पंरपरेची रक्षा करण्यासाठी आणि राष्ट्रसुरक्षेचा आमचा संकल्प आहे. काँग्रेस आणि विरोधक देशविरोधी विचारांचे आहे. धारा ३७० काढू नये म्हणून काँग्रेस विरोध करते. काश्मीरमध्ये त्यांना हिंचा पसरवण्यासोबत चर्चा करायची आहे. पाकिस्तानपण हेच म्हणतो आहे. काँग्रेसमध्ये अक्कल असती तर त्यांनी फाळणीच होऊ दिली नसती. त्यामुळे पाकिस्तानच तयार झाला नसतो. देशद्रोहाचा कायदा हटवण्याची घोषणा काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसने आरशात जावून तोंड पाहावं. याच काँग्रेसने बाळासाहेबांचं नागरिकत्व काढून घेतलं होतं. त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला होता. काँग्रेसमुळेच देशात इतक्या वर्षात सुरक्षेचा प्रश्न तयार झाला.'


'काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे. शरदराव तुम्ही अशा लोकांसोबत उभे आहेत. काँग्रेसकडून देशाला कोणतीच अपक्षा नाही. शरद पवारांना हे शोभतं का? राजकारण आपल्या जागी आहे, पण शरद पवारांना हे शोभत नाही.' अशी टीका पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर केली आहे.