सोलापूर : भाजपात गेला तरी संघाची हाफ चड्डी घालू नका, असा सल्ला शरद पवारांनी विजयसिंह मोहिते पाटलांना दिला होता. पवारांच्या याच वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला आहे. चड्डीवाल्यांचा पाठिंबा घेऊन पहिल्यांदा मुख्यमंत्री कसे झालात? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी पवारांना विचारला आहे. संघवाले आता हाफ चड्ड्या नाही तर फुल पॅण्ट घालतात, पण त्यावेळी पवारांना हाफ पॅण्टवाले कसे चालले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस कुर्डुवाडीमध्ये आले होते. 'शरद पवार माढामध्ये निवडणूक लढवण्यासाठी आले होते, पण त्यांनी माघार घेतली. मी मॅच खेळणार नाही, तर बारावा गडी म्हणून मॅच पाहणार, अशी भूमिका पवारांनी घेतली. पण ज्याला आम्ही बारावा गडी म्हणूनही खेळायला तयार नव्हतो, अशाला मैदानात उतरवले. असली टीम कोण आणि नकली कोण? याचा फैसला २३ तारखेलाच होईल, नकली टीमच्या भरवशावर मॅच जिंकू शकत नाही,' अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.