Solapur LokSabha Constituency : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections) भाजपने दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी देखील महायुतीकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाहीये. भाजपने दुसरी यादी जाहीर केली अन् राज्यातील 20 जागेवर उमेदवार निश्चित झाले. तर येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीकडून देखील पहिली यादी समोर येण्याची शक्यता आहे. एकीकडे माढाच्या जागेवरून वाद सुरू असताना भाजपने सोलापूरात (Solapur LokSabha) सावध खेळी केल्याचं पहायला मिळतंय. सोलापूरच्या जागेवर राम सातपुते (Ram Satpute) या युवा तरुण आमदाराला जागा मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र, आता नव्या नावाचा खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून पद्मश्री आणि उद्योजक मिलिंद कांबळे (Milind Kamble) यांचे नाव जवळपास निश्चित असल्याची माहिती झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. मिलिंद कांबळे हे प्रणिती शिंदे यांच्याविरोधात रणशिंग फुकणार असल्याचं जवळजवळ निश्चित झालंय. सोलापूरमधून मी लोकसभा लढवणार आहे. माझ्या उमेदवारीची घोषणा ही केवळ औपचारिकता आहे. काही दिवसांत माझी उमेदवारी जाहीर होईल, असं स्वत: प्रणिती शिंदे यांनी म्हटलं होतं. अशातच आता सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदे विरुद्ध मिलिंद कांबळे (Praniti Shinde vs Milind Kamble) यांच्यात थेट मुकबला होणार हे जवळजवळ निश्चित झालंय.


कोण आहेत मिलिंद कांबळे ?


मिलिंद कांबळे हे डिक्की अर्थात दलित चेंबर ऑफ कॉमर्सचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर 2013 साली त्यांना राष्ट्रपती प्रवण मुखर्जी यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मिलिंद कांबळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील रहिवासी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात काम करत आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना टक्कर देण्यासाठी एक प्रतिष्ठित आणि उच्चशिक्षित चेहरा भाजपकडून मिलिंद कांबळे यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जात असल्याची माहिती समोर आली आहे.


सुशीलकुमार शिंदेंचा गौप्यस्फोट


सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला. मात्र प्रणितीने (Praniti shinde) विचार केला की मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे आणि राहिल, असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. ऑफर देणाऱ्या नेत्याचे नाव मी उघड करणार नाही, असंही ते म्हणाले.  काँग्रेससाठी प्रामाणिकपणे कार्य करणारे बरेच कार्यकर्ते देशभरात आहेत, मात्र ज्यांना जायचे आहे ते जातील, असंही सुशीलकुमार शिंदे म्हणाले.