Vijay Shivtare On Ajit Pawar: शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या महायुतीत मिठाचा खडा पडलाय. शिंदे गटाचे पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्षाने आपली बांधणी पक्की करायला सुरुवात केली असताना शिवतारेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केलेय. मी निवडणुकीत लढलो नाही तरी अजित पवार गटाचा पराभव होणार, असे शिवतारेंनी स्पष्टपण सांगितले. युती धर्म पाळायला हवा, मी शिंदेंच्या शब्दाबाहेर नाही पण ही लढाई पवार विरुद्ध जनता अशी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी लहान नेता आहे म्हणत अजित पवारांनी माजी लायकी काढली होती. मग आता मला घाबरता कशाला? अजित दादांना घमेंड होती मग आता का तडफडताय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. जनतेचे पैसे वापरून पक्ष वाढवतायत. निव्वळ निवडणूक म्हणून एकाला 25 कोटी दिल्याचा आरोपही शिवतारेंनी यावेळी केला.


पिण्याचे पाणी नाही मग कसला विकास?


बारामतीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.शेतीला पाणी नाही मग कसला विकास केलाय? असा टोला त्यांनी अजित पवारांना केलाय. मी उभा नाही राहिलो तरी अजित पवार गटाचा पराभव होणार असल्याचे ते म्हणाले. जनतेच्या हितासाठी आणि राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड ठोपाटले असल्याचे शिवतारेंनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील हे द्वंद्व किती टोकाला जाणार हे येणाऱ्या निवडणुकीत दिसणार आहे.


सगळे प्रकल्प बारामतीतच का जातात? 


मी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिलीय. त्यांनी मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छाय. ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार, असे शिवतारे म्हणाले. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे. ज्याला मरायचंय त्याला मरू देत. माझी तब्येत काही दिवस खराब आहे. चेकअप करून मी परत पुण्याला जाईन मग निर्णय घेईन. बारामतीत एअरपोर्टसारखं  एसटी स्टँड हवय. सगळे प्रकल्प बारामतीतच का जातात? इतर आसपासच्या प्रदेशावर अन्याय का? बारामतीच्या आसपास लोकांना पिण्यासाठी पाणी नाहीय. सर्वांना सगळं माहितीय, पण आवाज कोण उठवत नाही. मी हा आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले. 


अजितदादांना माझा आवाका कळेल


शिंदेंना माझा विरोध नाही, ते तळागळातून आलेले आमचे नेते आहेत.जे मी बोललो की, हा नालायक आहे, उर्मट आहे तेच त्यांचे बंधू बोललेत. इतकं सगळं होऊनही, अजितदादांनी मला साधा फोन केला नाही. ही अहंकाराची लढाईच नाही. अजित पवारांनी कारखाने, बँका सारं काही ताब्यत घेतलं. अजितदादांना आता माझा आवाका काय तो कळेल, असेही ते म्हणाले.