लोकसभा निवडणूक २०१९: अपक्ष आणि बंडखोरांचं आव्हान
लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम
१. भिवंडीमध्ये लोकसभेसाठी अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरले. सुहास बोंड यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. पॉवरलूम व्यवसाय आणि बेरोजगारी हा मुद्दा हाताशी धरत ते या निवडणूक रिंगणात उतरलेत.
२. जालना लोकसभा मतदार संघातून यावेळच्या निवडणुकीत २० उमेदवार रिंगणात उतरले आहेत. ९ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे २० उमेदवार नशीब अजमावणार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, काँग्रेकडून विलास औताडे, बहुजन वंचित आघाडीकडून डॉ. शरदचंद्र वानखेडे, सपा-बसपाकडून महेंद्र सोनावणे, तर संभाजी ब्रिगेड पुरस्कृत शाम शिरसाट रिंगणात आहेत. तर ११ अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
३. रिपाई आठवले गटाचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांनी पदाचा राजीनामा देत आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिगणेंना आपला जाहीर पाठिंबा दिला. महायुतीला हा मोठा झटका मानला जात आहे.
४. मातोश्रीसह नितेश राणेंच्या मर्जीतील व्यक्तींना खंबाटामधून पगार मिळत होता असा खळबळजनक आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. राजकारण करणाऱ्या राणे आणि राऊतांना मतदान न करण्याचं आवाहन यावेळी त्यांनी केलं.
५. काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर यांचे निकटवर्तीय आमदार धवलसिंह जाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे आमदार अल्पेश ठाकोरही लवकर भाजपमध्ये प्रवेश करणार का या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.