Vanchit Bahujan Aghadi Candidates list : महाराष्ट्रात येत्या 19 एप्रिलपासून लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात वंचित बहुजन आघाडीकडून 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने रायगड, उस्मानाबाद, जळगाव, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वंचित बहुजन आघाडीने काही मिनिटांपूर्वी ट्वीटरवर लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत 10 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या यादीत आधीच्या यादींप्रमाणेच समाजातील सर्व जाती-जमातींना स्थान देण्यात आले आहे. तसेच या यादीतील लोकसभा उमेदवारांच्या नावापुढे त्यांची जात नमूद करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. 



वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीतील लोकसभेचे उमेदवार


रायगड - कुमुदिनी रविंद्र चव्हाण
उस्मानाबाद- भाऊसाहेब रावसाहेब अढळकर
नंदूरबार - हनुमंत कुमार मनराम सुर्यवंशी
जळगाव - प्रफुल्ल कुमार रायचंद लोढा
दिंडोरी - गुलाब मोहन बर्डे
पालघर - विजया दहिकर म्हात्रे
भिवंडी - निलेश सांबरे
मुंबई उत्तर - बीना रामकुबेर सिंग
मुंबई उत्तर पश्चिम - संजीव कुमार अप्पाराव कलोकोरी
मुंबई दक्षिण मध्य - अब्दुल हसन खान 


यातील पहिल्या यादी 8 लोकसभा उमेदवारांच्या नावांचा समावेश होता. त्यानंतर दुसऱ्या यादीत त्यांनी 11 जागांवरील लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यानंतर तिसऱ्या यादीत 5 आणि चौथ्या यादीत 1 अशा उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. यानंतर आता पाचव्या यादीत तब्बल 10 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यात मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम  आणि मुंबई दक्षिण मध्य या तीन मतदारसंघांचा समावेश आहे.