माजी मंत्री गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात ?
माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे.
ठाणे : माजी मंत्री गणेश नाईक यांनी ठाणे लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली आहे. वयाची 69 वर्ष गाठली असून आजही मी ठाण्यापर्यंत जाऊ शकतो.. असे सूचक वक्तव्य नाईकांनी आज नवी मुंबईतील आयोजित सायक्लोथॉनच्या वेळी केले आहे. त्यामुळे राजकारला आता नवे वळण येणार का ? अशी चर्चा सुरू आहे.
स्वच्छ पर्यावरण पूरक आणि आरोग्यमय मुंबई चा संदेश देण्यासाठी आज नवी मुंबई महासायकलेथॉन चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी या वयातही आपण ठाण्यापर्यंत जाऊ शकतो असे सूचक वक्तव्य केले. या वक्तव्याबाबत त्यांनी अधिक स्पष्टीकरण दिले नसले तरी आगामी लोकसभा निवडणूकीची ही तयारी असल्याचे म्हटले जात आहे. ठाणे लोकसभेसाठी ठाणे मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा खुद्द शरद पवारांनीचं केली होती. या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांच्या वक्तव्याला महत्त प्राप्त झाले आहे.
ठाणे लोकसभा मतदार संघातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नाईक कुटुंब लोकसभा निवडणूक लढवणार का ? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.. मात्र आता नाईकांच्या या सूचक वक्तव्या नंतर स्वतः गणेश नाईक ठाण्याच्या निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. नाईक निवडणूक लढवणार का ? त्याचा राष्ट्रवादीला किती फायदा होईल ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.