Loksabha 2024​ : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरुन शिवसेना ठाकरे पक्ष (Shivsena UBT)-काँग्रेसमध्ये (Congress) जुंपलीय. त्याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जातोय. काँग्रेस नेते आणि सांगलीतून (Sangli) इच्छुक उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांना राज्यसभेवर पाठवण्यात येईल असा प्रस्ताव शिवसेना ठाकरे गटाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विशाल पाटलांना संसदेत पाठवण्याची जबाबदारी आमची असं सूचक वक्तव्य संजय राऊतांनी केलंय. त्यामुळे ठाकरे गट काँग्रेसची नाराजी दूर करणार का याची चर्चा सुरु झालीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजय राऊत यांनी वक्तव्य केल्यानंतर विश्वजीत कदम आणि विशाल पाटील तातडीने दिल्लीकडे रवाना झालेत.. काँग्रेस पक्षश्रेष्ठींची आज पुन्हा भेट घेणार आहेत. विशाल पाटील यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याची चर्चा खोटी असल्याचा दावा कदम यांनी केलाय. सांगलीच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही असून उमेदवारीवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षात संघर्ष सुरूये. आमदार विश्वजीत कदम अजूनही भूमिकेवर ठाम आहेत. 


सांगली दौऱ्याकडे पाठ
दरम्यान, संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेसनं पाठ फिरवलीय. शिवसेना ठाकरे पक्षाकडून कोणतंही निमंत्रण देण्यात आलेलं नाही असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी म्हटलंय. तर राऊतांच्या दौऱ्याचा पहिला दिवस हा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या भेटींसाठी आहे. तर शनिवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत राऊत चर्चा करतील असं शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय विभूते यांनी स्पष्ट केलंय.