LokSabha Election: आमच्या विरोधकांना वाटते ही ग्रामपंचायत ची निवडणूक वाटते, त्यांची तीच लायकी आहे म्हणून त्यानुसार बोलतात. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, विधानसभा नव्हे तर आपल्या देशाचा नेता कोण असेल आणि पुढील 5 वर्ष हा देश कुणाच्या हातात द्यायचा याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत. जळगावात भाजपा उमेदवार स्मिताताई वाघ व रावेर लोकसभा भाजपा उमेदवार रक्षाताई खडसे यांच्यासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"या निवडणुकीत देशात दोनच पर्याय आहेत. एकीकडे नरेंद्र मोदी आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत. महाराष्ट्रात तर आमची मोठी युती आहे. तिथे राहुल गांधीच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे. आपल्या युतीचं इंजिन नरेंद्र मोदी असून एकदम पॉवरफूल आहे. त्याच्यात वेगवेगळ्या पक्षाचे डबे आहेत. यात आदिवासी, शेतकरी, महिला, अल्पसंख्यांक सर्वांना जागा आहे. आणि तिकडे प्रत्येकजण स्वत:ला इजिन समजतात. तिथे बोगीच नाही. इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो. तिथे सर्वसामान्यांना जागा नसते," असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला. 


राहुल गांधीच्या इंजिनमध्ये सोनिया आणि प्रियंका गांधी यांना जागा आहे. शरद पवार यांच्या इंजींनमध्ये सुप्रिया सुळे आहेत असं फडणवीस म्हणाले. तसं तर उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये असं बोलत असतानाच एका कार्यकर्त्याने संजय राऊत असं म्हटलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी हाताने लादी पुसताना दाखवत हे एकच आहे असं इशाऱ्यात म्हटलं. त्यावर कार्यकर्त्याने घऱ पुसायचं काम असा आवाज दिला. ते ऐकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मी नाही म्हटलं ते म्हटले असं म्हणताच हशा पिकला. यानंतर त्यांनी वाक्य पूर्ण करत उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे असं म्हटलं. 



"यांच्या इंजिनमध्ये फक्त कुटुंबाला जागा आहे. यांच्यासाठी फक्त आपलं कुटुंबच परिवार आहे, पण मोदींसाठी संपूर्ण देश परिवार आहे. शरद पवार बारामती, राहुल गांधी दिल्लीत आणि उद्धव ठाकरे मुंबईच्या दिशेने इंजिन ओढत आहेत. सर्व दिशेकडे नेते इंजिन ओढत असल्याने इंजिन एकाच ठिकाणी ठप्प आहे," असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 


"देशाच्या विकासाची ही निवडणूक आहे. विरोधकांच्या भाषणात विकासाचा एकही मुद्दा नसून फक्त शिवीगाळ केली जात आहे. नरेंद्र मोदींनी 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबी रेषेच्या बाहेर काढले, ह विश्व रेकॉर्ड आहे. विविध योजनांचा माध्यमातून कोट्यवधी लोकांना दिलासा देण्याचे काम मोदींनी केले आहे. मुद्रा लोनची मर्यादा वाढविली, तर बचत गटांना वस्तू विक्रीसाठी जागा आरक्षित केली जाईल. महिला सक्षमीकरणासाठी भाजपाचे जोरदार काम सुरू आहे. विविध योजनांचा लाभ देण्याचे काम सुरू आहे. आपल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही म्हणून भाव कमी झाले असले तरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातील असा निर्णय घेतला. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. 



मनमोहन सिंग सरकारच्या काळात किती बॉम्बस्फोट झाले. पण मोदींची सत्ता आल्यानंतर एक तरी बॉम्ब स्फोट झाला आहे का? अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली. मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे मजबूर नाही असा टोलाही त्यांनी लगावला. कोविडमध्ये लससाठी आम्हाला भीक मागावी लागली असती, मात्र देशातील शास्त्रज्ञांना एकत्र करून लस बनवली. 
आज आपण मोदींनी लस बनवली, मोफत दिली म्हणून जिवंत आहोत असंही ते म्हणाले.