लोकसभा निवडणूक २०१९ : अमरावती मतदारसंघातील `रणसंग्राम`
लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.
अमरावती : लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यामध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे. राज्यामध्ये भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातून भाजप-शिवसेना युतीने सगळ्या १० जागांवर विजय मिळवला होता.
या निवडणुकीत अमरावती मतदारसंघात शिवसेनेने आनंदराव अडसुळ यांना उमेदवारी दिली आली आहे. आनंदराव अडसुळ यांचा सामना महाआघाडीतला घटकपक्ष असलेल्या युवा स्वाभिमान पक्षाच्या नवनीत राणा यांच्याशी होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून गुणवंत देवपारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१४ निवडणुकीचे निकाल
२०१४ सालच्या निवडणुकीमध्ये अमरावतीतून शिवसेनेच्या आनंदराव अडसुळ यांचा यांनी नवनीत राणा यांचा १,३७,९३२ मतांनी पराभव केला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मिळालेली मतं |
आनंदराव अडसुळ | शिवसेना | ४,६७,२१२ |
नवनीत राणा | राष्ट्रवादी काँग्रेस | ३,२९,२८० |
गुणवंत देवपारे | बसपा | ९८,२०० |
राजेंद्र गवई | आरपीआय | ५४,२७८ |
राजू सोनोने | अपक्ष | १०,०५२ |