पुणे : पुणं तिथं काय उणं, असं का म्हणतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एकीकडे काँग्रेसच्या पुण्याच्या लोकसभा उमेदवाराचा तिढा कायम आहे. उमेदवाराचं नाव अजून जाहीर झालेलं नाही. तर दुसरीकडे पुणे काँग्रेसने मात्र लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला आहे. ग्रामदैवत कसबा गणपतीच्या दर्शनाने काँग्रेसने पुण्यातील प्रचाराची सुरूवात केली. त्यानंतर रॅली काढण्यात आली. मात्र मतं कुणासाठी मागणार आणि प्रचार कुणाचा चाललाय? हा प्रश्न कार्यकर्त्यांसमोर होता. इच्छुक उमेदवार अरविंद शिंदे, प्रवीण गायकडवाड या रॅलीत सहभागी झाले होते. उमेदवार ठरला नसला तरी आमचे ध्येय ठरलेलं आहे, असं काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितलं.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते देखील यावेळी उपस्थित होते. उमेदवार ठरला नसला तरी आमचे ध्येय ठरलेले आहे. भाजपचा पराभव करण्याचे ध्येय आहे. असे काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले.