सचिन कसबे / सोलापूर : भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर स्वामी पुन्हा वादात सापडले आहेत. स्वतःला देव म्हणविणाऱ्या जयसिद्धेश्वर यांनी प्रशांत परिचारक यांची तुलना विठ्ठूमाऊलींशी केली. जयसिद्धेश्वर स्वामींच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका त्यांना महागात पडण्याची शक्यता आहे. जयसिद्धेश्वर महास्वामी यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका संपता संपत नाही. निवडणुकीला उभे राहिल्यानंतर त्यांनी स्वतःच देव असल्याचे सांगून टाकले. या वादाचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच आता त्यांनी निलंबित आमदार प्रशांत परिचारक यांची तुलना थेट विठ्ठूमाऊलींशी करून टाकली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोपाळपूरमधील प्रचारसभेत जयसिद्धेश्वेर यांचं भाषण सुरू असताना एक स्थानिक तरूण समस्या मांडू लागला. त्याला थांबवताना जयसिद्धेश्वर यांनी परिचारक यांना समस्या सांगितल्या, म्हणजे विठ्ठूरायाला सांगितल्यासारखे होईल, असे म्हटले आहे.


सैनिकांच्या पत्नींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अगोदरच परिचारक निलंबित आहेत. वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केलेल्या परिचारक यांना थेट विठ्ठूमाऊलींच्या पंक्तीत नेऊन बसवणाऱ्या जयसिद्धेश्वर महास्वामींवर विरोधकांकडून टीका होत आहे.