मुंबई : गेले दोन महिने आरोप्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडल्यावर आज संध्याकाळी महाराष्ट्रात निवडणुकीचा जाहीर प्रचार संपणार आहे. येत्या सोमवारी लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातली १७ मतदारसंघात मतदान होणार आहे. या सर्वच ठिकाणी आज प्रचार संपणार आहे. मतदारांपर्यंत पोहचण्याची अखेरची संधी असल्याने आज सगळ्या पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या स्टार प्रचारकांना मैदानात उतरवण्याचा कार्यक्रम आखला आहे. यापैकी मुंबईतली मुख्यमंत्र्यांच्या रोड शो कडे साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी एकत्र सभा घेण्याची संधी हुकवली आहे. शेवटच्या काही तासात पवार-राहुल गांधी एका मंचावर येण्याचा कुठलाही कार्यक्रम झाला नाही. काल संध्याकाळी राहुल गांधींनी संगमनेरमध्ये जाहीर सभा घेऊन महाराष्ट्रात आपल्या प्रचार सभांचा शेवट केला. तर शरद पवार आज मावळ मतदारसंघात प्रचार करणार आहेत.