अरूण मेहेत्रे, झी २४ तास, पुणे : पुण्यात काँग्रेसचा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स कायम आहे. त्यातच गेल्या आठवड्यापासून आयारामाला काँग्रेसची उमेदवारी मिळणार, अशी चर्चा सुरू झालीय. त्यामुळं काँग्रेसमधील निष्ठावंत अस्वस्थ झालेत. आयारामांना उमेदवारीच नको, असं साकडंच निष्ठावंतांनी राहुल गांधींना घातलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसचा पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अनेक नावं चर्चेत आल्यानंतर आता संजय काकडे आणि प्रवीण गायकवाड यांच्या भोवती काँग्रेस उमेदवारीची चर्चा केंद्रीत झालीय. पण काँग्रेसमधील निष्ठावंतांचा या दोन्ही उमेदवारांना विरोध आहे. निष्ठावंतांपैकी कुणालाही उमेदवारी द्या पण आयारामांना उमेदवारी नको असं साकडंच त्यांनी राहुल गांधींना लिहलंय.


पुण्यात निष्ठावंतांमध्येही अनेक दावेदार आहेत. पण निष्ठावंतातल्या कोणत्याही एका नावावर पक्षात मतैक्य नाही. त्यामुळं आयाराम नको पण पर्याय कोण? हे मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.