पिंपरी चिंचवड : होळीच्या निमित्ताने पार्थ आणि रोहित पवार बंधूंनी एकत्रित येत त्यांच्याबद्दलच्या वायफळ चर्चाचं दहन केलं. पिंपरी चिंचवडमध्ये संत तुकारामनगर येथे पार्थ आणि रोहित यांनी होळीचं पूजन केलं. माढा लोकसभा मतदारसंघातून आजोबा शरद पवार यांनी माघार घेत, पार्थ यांच्या मावळमधील उमेदवारीचा मार्ग मोकळा केला होता. तेव्हा आजोबांनी पुनर्विचार करण्याची जाहीर विनंती रोहित यांनी केली होती. रोहित यांच्या फेसबुक पोस्टमधील विनंतीमुळे पार्थ-रोहितमध्ये वादाचा रंग असल्याची चर्चा राज्यभर रंगली होती. 


फोटो सौजन्य - रोहित पवार, फेसबुक

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


उल्लेखनीय म्हणजे आज (२१ मार्च) पार्थ अजित पवार यांचा वाढदिवस... याच निमित्तानं रोहित पवार यांनी आपल्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात.


फोटो सौजन्य - रोहित पवार, फेसबुक

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचं जाहीर केल्यानंतर अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. 'एकाच घरातील दोघे जण आधीच निवडणूक लढवत आहेत, त्यात आता तिसरा नको... त्यामुळे मी स्वत: निवडणुकीला उभे न राहता नव्या पिढीतील उमेदवारांना संधी देणार' असल्याचं सांगत शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मावळमधून पार्थ पवार लढणार असल्यानं नातवाला जागा देण्यासाठी पवारांनी हा निर्णय घेतला असल्याचं पवारांनी सांगितलं जात होतं. यावर शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी मात्र आपली नाराजी सोशल मीडियातून जाहिरपणे व्यक्त केली होती. 'कार्यकर्त्यांच्या प्रेमाचा विचार करून निर्णय बदलावा' असं आवाहन नातू रोहित पवार यांनी फेसबुकद्वारे आजोबांना केलं होतं. यानंतर पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्यात सर्वकाही ठिक नसल्याची चर्चा सुरू झाली होती.