पुणे : देशात काय होईल हे मला माहित नाही, पण साताऱ्याच आपणच विजयी होऊ असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलाय. निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्यानंतर त्यांनी सर्वात आधी पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर दर्ग्याचं दर्शन घेतलं. या निवडणुकीत शरद पवार हे पंतप्रधान व्हायला पाहिजे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी साताऱ्यातील उमेदवारीवरून सर्व गटातटांत मनोमिलन झाल्याचा दावाही त्यांनी केला.  


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सातारा मतदारसंघातून नुकतंच उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.


व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा