रत्नागिरी : शिवसेनेच्या खासदारांचा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. तसेच युती झाल्यामुळे शिवसेनेला येथे फायदा होऊ शकतो. येथे ६ पैकी पाच आमदार युतीचे आहेत. या मतदारसंघात काँग्रेसकडे सक्षम उमेदवार नाही. त्यामुळे येथे राणेंचा स्वाभिमानी पक्ष विरुद्ध शिवसेना अशीच लढत होणार आहे. दुसरीकडे स्वाभिमानला राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा असल्याची देखील चर्चा आहे. त्यामुळे येथे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेसकडून नवीनचंद्र बांदिवडेकर निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर शिवसेनेने विनायक राऊत यांना उमेदवारी दिली आहे. वंचित बहुजन आघाडीने मारुती जोशी यांना उमेदवारी दिली आहे.


२०१४ निवडणुकीचा निकाल


२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकांनी निवडून आले होते. त्यांनी काँग्रेसचे निलेश राणे यांचा पराभव केला होता.


२००९ निवडणुकीचा निकाल


२००९ मध्ये निलेश राणे यांनी शिवसेनेकडून मैदानात असलेले सुरेभ प्रभू यांचा पराभव केला होता. निलेश राणे यांना ३ लाख ५३ हजार ९१५ मते तर सुरेश प्रभू यांना ३ लाख ६ हजार १६५ मतं मिळाली होती.


२०१४ निवडणुकीची आकडेवारी


उमेदवार

 पक्ष

 मतदान

विनायक राऊत शिवसेना 493088
निलेश राणे काँग्रेस 343037
राजेंद्र आयरे बसपा 13088
अभिजीत हेगशेट्ये बसपा 12700
नोटा नोटा 12393