लोकसभा निवडणूक २०१९ : सातारा लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम
साताऱ्यामध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे.
सातारा : साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीकडे उदयनराजे भोसले यांच्या सारखा सक्षम उमेदवार आहे. शिवसेनेने उदयनराजे यांच्या विरोधात माजी आमदार नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. भाजपमधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. उदयनराजे भोसले यांनी २००९ आणि २०१४ मध्ये सलग दोन वेळा विजय मिळवला. त्यामुळे तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. काही दिवसांपूर्वी ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पण राष्ट्रवादीकडूनच ते पुन्हा उमेदवार असणार आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून सहदेव एवळे मैदानात आहेत. २३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
उदयनराजे भोसले | राष्ट्रवादी | 522531 |
पुरुषोत्तम जाधव | अपक्ष | 155937 |
राजेंद्र चोरगे | आप | 82489 |
अशोक गायकवाड | आरपीआय | 71808 |
संदीप मोझर | अपक्ष | 18215 |