कराड : कराडमध्ये महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटला. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी सभेत साऱ्यांची मनं जिंकली. आपल्या चीरपरिचित अंदाजात कॉलर उडवत आणि डायलॉगबाजी करत उदयनराजेंनी उपस्थितांची मनं जिंकलीच. मात्र उदयनराजेंची ही स्टाईल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भावली. त्यामुळेच काही काय उदयनराजे भाषण संपवून आपल्या जागेवर बसत होते, त्यावेळी पवारांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. पवार एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी त्यांच्या हाताने उदयनराजेंची कॉलर उडवली आणि साऱ्यांची मनं जिंकली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मी या सगळ्या नेत्यांचा पाठिंबा असल्याशिवाय उगाच बोलणार नाही. शरद पवार यांचा सगळ्यात जास्त पाठिंबा आहेच, पण रामराजेंचा पाठिंबा मला कॉलेजच्या दिवसांपासून आहे. त्यावेळपासून आजपर्यंत कोणावरही अन्याय झालेला सहन केला नाही. आजही अन्याय सहन करत नाही आणि भविष्यातही करू देणार नाही. एक बार मैने कमिटमेंट करदी तो मै खुद की भी नही सुनता... स्टाईल इज स्टाईल', असं म्हणत उदयनराजेंनी कॉलर उडवली. हे बोलल्यानंतर उदयनराजे शरद पवार यांच्या बाजूला जाऊन बसले. शरद पवार यांनाही उदयनराजेंची ही स्टाईल आवडली, मग त्यांनीच पुन्हा उदयनराजेंची कॉलर उडवली.