लोकसभा निवडणूक २०१९ : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील `रणसंग्राम`
सोलापूरमध्ये १८ एप्रिलला मतदान होणार आहे.
सोलापूर : सोलापूर मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व आहे. हा सुशीलकुमार शिंदे यांचा गड मानला जातो. विद्यमान भाजप खासदाराची कामगिरी असमाधानकारक असल्याने तसेच राष्ट्रवादीची भक्कम साथ मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे निवडणूक तिरंगी होणार आहे. काँग्रेसच्या पोटात मात्र यामुळे गोळा आला आहे. सोलापुरा प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन केल्यामुळे काँग्रेसच्या मनात धडकी भरली आहे. सुशीलकुमार शिंदे पुन्हा एकदा सोलापुरातून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी अत्यंत साधेपणानं अर्ज भरला आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्यासोबत गाजावाजा न करता त्यांनी अर्ज भरला. १८ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
२०१४ निवडणुकीचा निकाल
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा १,४९,६७४ मतांनी पराभव झाला होता.
२०१४ निवडणुकीची आकडेवारी
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
शरद बनसोडे | भाजप | 517879 |
सुशीलकुमार शिंदे | काँग्रेस | 368205 |
संजीव सदाफुले | बसपा | 19041 |
नोटा | नोटा | 13778 |
ललीत बाबर | आप | 9261 |