PM Narendra Modi On New Home: 5 वर्षात गरीबांसाठी 3 कोटी नवीन घर बांधणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वर्ध्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. देशातील 11 कोटी लोकांना पाण्याचं कनेक्शन दिलं.  4 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिलं. देशात वंदे भारत एक्सप्रेस धावत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बारशाला गेला आणि बाराव्याला आला अशी मराठीत म्हण असल्याचे सांगत त्यांनी कॉंग्रेसला टोला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदी यांनी वर्ध्यातील आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. 70 वर्षावरील नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


कॉंग्रेसच्या पापांचा घडा भरलाय. कॉंग्रेसला मत म्हणजे मत वाया जाणे असे त्यांनी सांगितले.